Main Menu
h 2
Labels
- Exam परीक्षा (2)
- jk (53)
- चालू घडामोडी (23)
- टेस्ट TEST (23)
- नोकरी जाहिरात (5)
- नोकरी जाहिरात.. (41)
- महान / विशेष व्यक्ती (48)
- विज्ञान विषयावर टेस्ट (16)
- विशेष प्रश्नमंजुषा (15)
- सातारा प्रज्ञाशोध परीक्षा (1)
- स्कॉलरशिप नवोदय परीक्षा टेस्ट (8)
शास्त्र आणि त्यांचा अभ्यास आधारित टेस्ट
शास्त्र आणि त्यांचा अभ्यास आधारित टेस्ट
भारतातील राज्ये आणि राजधानी..
भारतातील राज्ये आणि त्यांच्या राजधानी यांची यादी खालीलप्रमाणे आहे (ऑक्टोबर 2025 पर्यंत):
### **भारतातील राज्ये आणि राजधान्या**:
1. **आंध्र प्रदेश** - अमरावती
2. **अरुणाचल प्रदेश** - ईटानगर
3. **आसाम** - दिसपूर
4. **बिहार** - पाटणा
5. **छत्तीसगड** - रायपूर
6. **गोवा** - पणजी
7. **गुजरात** - गांधीनगर
8. **हरियाणा** - चंदीगड
9. **हिमाचल प्रदेश** - शिमला
10. **झारखंड** - रांची
11. **कर्नाटक** - बेंगळुरू
12. **केरळ** - तिरुवनंतपुरम
13. **मध्य प्रदेश** - भोपाळ
14. **महाराष्ट्र** - मुंबई
15. **मणिपूर** - इंफाळ
16. **मेघालय** - शिलॉंग
17. **मिझोरम** - आइझॉल
18. **नागालँड** - कोहिमा
19. **ओडिशा** - भुवनेश्वर
20. **पंजाब** - चंदीगड
21. **राजस्थान** - जयपूर
22. **सिक्कीम** - गंगटोक
23. **तमिळनाडू** - चेन्नई
24. **तेलंगणा** - हैदराबाद
25. **त्रिपुरा** - अगरतळा
26. **उत्तर प्रदेश** - लखनौ
27. **उत्तराखंड** - देहराडून
28. **पश्चिम बंगाल** - कोलकाता
### **केंद्रशासित प्रदेश आणि राजधान्या**:
1. **अंदमान आणि निकोबार बेटे** - पोर्ट ब्लेअर
2. **चंदीगड** - चंदीगड
3. **दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव** - दीव
4. **दिल्ली** - नवी दिल्ली
5. **जम्मू आणि काश्मीर** - श्रीनगर (उन्हाळी), जम्मू (हिवाळी)
6. **लडाख** - लेह
7. **लक्षद्वीप** - कवरत्ती
8. **पुद्दुचेरी** - पुद्दुचेरी
ऑक्टोबर 2025 पर्यंतची आहे. भारतात सध्या 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश!
HSRP नंबर प्लेट बसण्यासाठी मुदत वाढ..
वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने जुन्या वाहनांवर 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (HSRP) बसवण्याची अंतिम तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे.
मुदतवाढ सरकारने चौथ्यांदा दिली असून, अजूनही राज्यातील अनेक वाहनमालकांनी ही आवश्यक नंबर प्लेट बसवलेली नाही. त्यामुळे त्यांच्या गैरसोयीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुदतवाढीचा इतिहास
मूळ अंतिम तारीख: मार्च 2025
पहिली वाढ: एप्रिल 2025 अखेरपर्यंत
दुसरी वाढ: जून 2025 अखेरपर्यंत
तिसरी वाढ: 15 ऑगस्ट 2025 पर्यंत
चौथी आणि सध्याची वाढ: नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंत
केंद्र सरकारच्या आदेशानुसार, देशातील सर्व वाहनांसाठी HSRP बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्रात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व जुन्या वाहनांवर ही प्लेट बसवावी लागेल.
भूमी अभिलेख विभाग भरती 2025
नगर भूमि अभिलेख कार्यालयात भरती निघाली आहे. मराठी शाळेतून शिकलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य आहे. परिक्षा द्या आणि एक चांगली नोकरी मिळवा.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 ऑक्टोबर 2025
इच्छुकांनी अंतिम दिनांक यांच्या अगोदर फार्म भरून घ्यावा..
खालील वेबसाईटवरून फार्म भरावा
https://ibpsreg.ibps.in/gomsep25/
https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहितीसाठी भेट द्या..
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2026..
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा फॉर्म भरणे सुरू
दिनांक 10 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरण्यासाठी मुदत
फॉर्ममध्ये चुकीचे दुरुस्ती 2 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर 2025
फार्मची फी 850
एस सी व एसटी साठी 750 रुपये
फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट ..
https://exams.nta.nic.in/sainik-school-society/https://nta.ac.in/
भारतरत्न नानाजी देशमुख...
*भारतरत्न नानाजी देशमुख*
(चंडिकादास अमृतराव देशमुख)
(सामाजिक कार्यकर्ता)
*जन्म : ११ ऑक्टोबर १९१६*
कडोळी, ता. हिंगोली जि. परभणी, महाराष्ट्र,
(आता - कडोळी, ता. जि. हिंगोली, महाराष्ट्र)
*मृत्यू : २७ फेब्रुवारी २०१०*
राष्ट्रीयत्व : भारतीय
नागरिकत्व : भारतीय
प्रशिक्षणसंस्था : बिर्ला तंत्रशास्त्र संस्था, पिलानी, राजस्थान
धर्म : हिंदू
वडील : अमृतराव देशमुख
पुरस्कार : भारतरत्न- (जाने २०१९) चंडिकादास अमृतराव देशमुख ऊर्फ नानाजी देशमुख हे मराठी सामाजिक कार्यकर्ते होते. भारतीय शासनाने त्यांना त्यांच्या कार्यासाठी आधी पद्मविभूषण आणि नंतर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवले. १९९७ मधे पुणे विद्यापीठाने त्यांना ’डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही पदवी प्रदान केली.
💁🏻♂️ *चरित्र*
हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी जन्मलेल्या नानाजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. लहानपणी भाजी विकून पैसे मिळवून शिक्षण पूर्ण करणारे नानाजी संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या संपर्कात आले व संघाशी कायमचे जोडले गेले. पुढे काही वर्षे त्यांनी देशाच्या राजकारणात प्रमुख भूमिका निभावली. राजकारण किंवा सत्ताकारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन अखेरीस त्यांनी शाश्र्वत विकास साधणारे समाजकार्य करायचे ठरवलेसाचा:स्पष्टीकरण हवे भारतीय संस्कृतीच्या आधारावर मनुष्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो या विचाराला मध्यवर्ती स्थान देऊन रचनात्मक कामाचे अनेक प्रकल्प नानाजी देशमुख यांनी देशभरात उभे केले.
प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व नंतर उत्तर प्रदेशात पूर्णवेळ कार्यकर्ते असलेल्या नानाजींनी संघाचे तत्कालीन प्रमुख (सरसंघचालक) श्री गोळवलकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चारित्र्याच्या आधारावर एक नवीन राजकीय पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केले. यातूनच जनसंघाची स्थापना झाली. दीनदयाळ उपाध्याय, सुंदरलाल भंडारी, अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत नानाजी जनसंघ पक्षाच्या माध्यमातून कार्यरत होते. नंतर जनता पक्षाच्या माध्यमातूनही ते राजकारणात सक्रिय सहभागी झाले. पांचजन्य, राष्ट्रधर्म व स्वदेस या नियतकालिकांचे कामही त्यांनी काही काळ पाहिले. दरम्यानच्या काळात आचार्य विनोबा भावेंच्या भूदान चळवळीतही ते सहभागी झाले होते. सुमारे दोन महिने ते विनोबाजींबरोबर प्रवास करत होते. पण त्यानंतरच्या काळात मनुष्यविकास व सामाजिक विकास याबाबतच्या पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्मिक मानवतावाद या तत्त्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. याच तत्त्वज्ञानाच्या आधारावर रचनात्मक, विधायक कामांची उभारणी करण्याचा ध्यास घेतलेल्या नानाजींनी जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्रिपद नाकारले. त्या काळात राजनीतीतील चाणक्य म्हणून त्यांचा दिल्लीत दबदबा होता, अनेक महत्त्वाची सत्तापदे त्यांच्याकडे सहजगत्या येत होती. पण त्यांनी तो मोह निग्रहाने नाकारून, राजकारण-संन्यास घेऊन अखंडपणे सेवाकार्य करण्याचा निर्णय घेतला. या विचारातूनच त्यांनी दीनदयाळ संशोधन संस्था स्थापन केली.
पुढील काळात त्यांनी दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून सर्वप्रथम उत्तर प्रदेशामधील गोंडा जिल्ह्यात सिंचनाचे कार्य केले. सुमारे ४०,००० कूपनलिकांच्या माध्यामातून त्याठिकाणच्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचे काम केले. त्यानंतर मध्य प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात ८० दुर्गम, पहाडी गावांमधील जनतेला विविध प्रकल्पांद्वारे आत्मनिर्भर व उद्योगशील बनवण्यावर त्यांनी मुख्य लक्ष केंद्रित केले. पाणी अडवा - पाणी जिरवा या योजनेतून सिंचनक्षेत्रात वाढ, गोवंशसंवर्धन, पारंपरिक कृषी पद्धतींचा विकास व प्रसार, गुरुकुल पद्धतीने शालेय शिक्षण, उद्योजकता विद्यापीठाच्या मार्गाने स्वयंरोजगाराला प्राधान्य, आरोग्यधाम योजनेअंतर्गत आयुर्वेदिक वनौषधींविषयी संशोधन व याच पद्धतीचे अनेक प्रकल्प चित्रकूट परिसरात कार्यान्वित केले. येथेच नानाजींनी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय हे भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ स्थापन केले. हे प्रकल्प सक्षमतेने चालवण्यासाठी त्यांनी समाजसेवेची इच्छा असणाऱ्या दांपत्यांना त्यांनी समाजशिल्पी बनवले. या समाजशिल्पींच्या माध्यमातून दीनदयाळ शोध संस्थेची विधायक, विकासात्मक कामे वेगाने, योग्य दिशेने व निष्ठेने चालू आहेत. आर्थिक, औद्योगिक व सामाजिकदृष्ट्या स्वयंपूर्ण गावांची संकल्पना येथे अस्तित्वात आलेली दिसते.
या सर्व कार्याला धर्माचे अधिष्ठान असावे या हेतूने व आपल्या सर्वांच्या जीवनात काय आदर्श असावेत हे सूचित करण्यासाठीच चित्रकूटमध्ये अभूतपूर्व असे श्रीरामदर्शन हे कायमस्वरूपी प्रदर्शन उभे करण्यात आले आहे. रामायणातील घटना डोळ्यासमोर उभ्या करणाऱ्या या प्रदर्शनासह येथे प्राणिसृष्टीही उभी करण्यात आली आहे. वास्तवातील जंगलात प्राण्यांचे हुबेहूब पुतळे बसवण्यात आले आहेत.
चित्रकूट हे त्यांचे कर्मस्थान होते. आरोग्यधाम व गोशाळा उद्यमिता विद्यापीठ, ग्रामोद्योग विद्यालय, आश्रमशाळा गुरुकुल, ग्रंथालय, मातृसदन, दंतचिकित्सा केंद्र इत्यादी त्यांनी तेथे उभारली. ग्रामीण लोकांचे जीवनमान उंचावण्यास व त्यांना स्वावलंबी बनविण्याचा त्यांना ध्यास होता. त्यांनी सुमारे इ.स. १९९० चे दरम्यान मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांतील प्रत्येकी सुमारे २५० गावे दत्तक घेतली व त्या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. शिक्षण, स्त्रियांना गृहोद्योग, स्वच्छता, शुद्ध बोलणे इत्यादी शिकविण्यास त्यांनी कार्यकर्त्यांचा एक चमू उभारून ग्रामविकासाचे काम चालवले. नानाजींच्या याच कामाचे फलित म्हणजे चित्रकूट क्षेत्रातील ८० खेड्यांमधील कोर्टामध्ये चालू असलेले जवळजवळ ६० टक्के खटले लोकांनी मागे घेतले व एकत्र बसून त्यावर निर्णय घेतले. चित्रकूटबरोबरच भारतातील इतर राज्यांमधील सर्वात मागास जिल्हे निवडून त्या ठिकाणी दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून काम सुरू आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील होमरी येथे प्रकल्प कार्यरत आहे. सोनदरा गुरुकुल, कृषिविकास, आरोग्य शिक्षण, योगाभ्यास, कलांचे शिक्षण व औद्योगिक प्रशिक्षण या प्रकल्पांद्वारे येथे काम चालते.
आणीबाणीनंतरच्या काळात (इ.स. १९७७) नानाजी काही काळ लोकसभेचे सदस्य होते. इ.स. १९९९ मध्ये त्यांची राज्यसभेवरही निवड करण्यात आली.
📜 *पुरस्कार*
देशमुखांच्या सामाजिक कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना १९९९ साली पद्मविभूषण हा किताब बहाल केला. २०१९ साली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज..
*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*
(महाराष्ट्रातील समाजसुधारक,
स्वातंत्र्यसेनानी, कवी, गायक)
मूळ नाव : माणिक बंडोजी इंगळे
*जन्म : ३० एप्रिल, १९०९*
(यावली, जि. अमरावती)
*निर्वाण : ११ ऑक्टोबर, १९६८*
(मोझरी, जि. अमरावती)
गुरू : आडकोजी महाराज
भाषा : मराठी, हिंदी
साहित्यरचना : ग्रामगीता,
अनुभव सागर
भजनावली,
सेवास्वधर्म,
राष्ट्रीय भजनावली
कार्य : अंधश्रद्धा निर्मूलन,
जातिभेद निर्मूलन
वडील : बंडोजी
आई : मंजुळाबाई
तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.
तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.
भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.
अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती.
खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले.
सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.
तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत.
महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.
देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला.
ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते.
तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (११ ऑक्टोबर, १९६८) रोजी झाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे केले जाते.
ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेला लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता ग्रंथामधील विचार सर्व सामान्यापर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या १० रुपये या किंमतीत उपलब्ध करून दिला आहे.
📒 *साहित्य संमेलने*
तुकडोजी महाराज यांच्या नावाने (१) तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आणि (२) तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन अशी दोन संमेलने भरतात.
📚 *पुस्तके*
अनुभव सागर भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)
आठवणी (सचित्र) : राष्ट्रसंत जन्मशताब्दीच्या (गंगाधर श्रीखंडे)
ग्रामगीता (कवी - तुकडोजी महाराज)
डंका तुकाडोजींचा (राजाराम कानतोडे)
राष्ट्रसंत तुकडोजी (बालसाहित्य, लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (चरित्र, लेखक - डॉ. भास्कर गिरधारी)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मौलिक विचार (संकलन - लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे). (लोकवाङ्मय प्रकाशन)
राष्ट्रसंताची अमृतधारा : भाग १, २, ३ (तुकडोजी महाराज)
राष्ट्रीय भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)
लहरकी बरखा (हिंदी)
सेवास्वधर्म (कवी - तुकडोजी महाराज)
📙 *ग्रामगीता*
ग्रामगीता या ग्रंथात तुकडोजी महाराज म्हणतात :
संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।
साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।।
संत तुकडोजी महाराज यांनी अनेक भजने/कविता लिहिल्या. त्यातीलच ही एक :
या झोपडीत माझ्या
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥३॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भिती नं यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥
पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एक भजन. हे भजन जपान येथे झालेल्या विश्वधर्म परिषदेत म्हटले होते.
*हे भजन दिल्ली येथील राजघाटावर नियमीत ऐकविले जाते. :-*
हर देश में तू ...
हर देश में तू , हर भेष में तू , तेरे नाम अनेक तू एकही है ।
तेरी रंगभुमि यह विश्वभरा, सब खेलमें, मेलमें तु ही तो है ॥टेक॥
सागर से उठा बादल बनके, बादल से फ़टा जल हो कर के ।
फ़िर नहर बनी नदियाँ गहरी,तेरे भिन्न प्रकार तू एकही है ॥१॥
चींटी से भी अणु-परमाणुबना,सब जीव जगत् का रूप लिया ।
कहिं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा,तू एकही है ॥२॥
यह दिव्य दिखाया है जिसने,वह है गुरुदेवकी पूर्ण दया ।
तुकड्या कहे कोई न और दिखा, बस! मै और तू सब एकही है ॥३॥
डॉ. कुमुद बन्सल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025
राष्ट्रपिता महात्मा गांधी आधारित टेस्ट
महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित टेस्ट
बरोबर उत्तरांची यादी
- प्रश्न 1: अ) पोरबंदर, गुजरात - गांधींचा जन्म.
- प्रश्न 2: अ) दक्षिण आफ्रिका - वकिलीची सुरुवात.
- प्रश्न 3: अ) दांडी सत्याग्रह - 1930 मध्ये सुरू.
- प्रश्न 4: अ) मोहनदास करमचंद गांधी - मूळ नाव.
- प्रश्न 5: अ) अहिंसा आणि सत्य - जीवन तत्त्व.
- प्रश्न 6: अ) 1906 - दक्षिण आफ्रिकेतील पहिला सत्याग्रह.
- प्रश्न 7: अ) हिंद स्वराज - स्वातंत्र्य तत्त्वे.
- प्रश्न 8: अ) 30 जानेवारी 1948, गोळी झाडून - निधन.
- प्रश्न 9: अ) स्वदेशी चळवळ - खादी प्रोत्साहन.
- प्रश्न 10: अ) 1915 - भारतात सत्याग्रह सुरू.
- प्रश्न 11: अ) त्यांचा जवळचा सहकारी - दोस्त मोहम्मद.
- प्रश्न 12: अ) असहकार चळवळ - ब्रिटिश कायद्यांचा विरोध.
- प्रश्न 13: अ) 15 ऑगस्ट 1947 - स्वातंत्र्य पाहिले.
- प्रश्न 14: अ) दंगली थांबवण्यासाठी - उपवासाचा वापर.
- प्रश्न 15: अ) अहमदाबाद, गुजरात - साबरमती आश्रम.
- प्रश्न 16: अ) सत्याग्रह - जीवनचरित्रातील तत्त्व.
- प्रश्न 17: अ) स्वदेशी चळवळ - ब्रिटिश कपडे जाळले.
- प्रश्न 18: अ) 2 ऑक्टोबर - जयंती दिन.
- प्रश्न 19: अ) त्यांच्या मृत्यूच्या वेळी - "राम नाम" घेतले.
- प्रश्न 20: अ) शांतता आणि पर्यावरण संरक्षण - 1 ऑक्टोबर 2025 चा संभाव्य दृष्टिकोन.
भारतरत्न इंदिरा गांधी..
*भारतरत्न इंदिरा गांधी* (५ वी व ८ वी भारतीय पंतप्रधान) *जन्म : १९ नोव्हेंबर १९१७* (मुघलसराई) *मृत्यू : ३१ ऑक...



