मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

राष्ट्रपिता महात्मा गांधी आधारित टेस्ट

महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित टेस्ट

महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित टेस्ट

1. महात्मा गांधी यांचा जन्म कोठे झाला?

2. महात्मा गांधी यांनी कोणत्या देशात वकिलीची सुरुवात केली?

3. महात्मा गांधी यांनी कोणत्या चळवळीची सुरुवात 1930 मध्ये केली?

4. महात्मा गांधी यांचे मूळ नाव काय होते?

5. महात्मा गांधी यांनी कोणत्या तत्त्वावर आधारित जीवन जगले?

6. महात्मा गांधी यांचा दक्षिण आफ्रिकेतील पहिला सत्याग्रह कधी झाला?

7. महात्मा गांधी यांनी कोणत्या पुस्तकातून स्वातंत्र्य संग्रामाचे तत्त्व मांडले?

8. महात्मा गांधी यांचे निधन कधी आणि कसे झाले?

9. महात्मा गांधी यांनी कोणत्या चळवळीत खादीला प्रोत्साहन दिले?

10. महात्मा गांधी यांनी कोणत्या वर्षी भारतात सत्याग्रह सुरू केला?

11. महात्मा गांधी यांचा "दोस्त मोहम्मद" कोण होता?

12. महात्मा गांधी यांनी कोणत्या चळवळीत ब्रिटिश कायद्यांचा विरोध केला?

13. महात्मा गांधी यांनी कोणत्या तारखेला स्वातंत्र्य मिळाल्याचे पाहिले?

14. महात्मा गांधी यांनी कोणत्या आंदोलनात उपवासाचा वापर केला?

15. महात्मा गांधी यांचा "साबरमती आश्रम" कोठे आहे?

16. महात्मा गांधी यांनी कोणत्या तत्त्वाला प्राधान्य दिले जे त्यांचे जीवनचरित्रात दिसते?

17. महात्मा गांधी यांनी कोणत्या चळवळीत ब्रिटिश कपडे जाळले?

18. महात्मा गांधी यांचा जयंती दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

19. महात्मा गांधी यांनी कोणत्या आंदोलनात "राम नाम" घेतले?

20. जर महात्मा गांधी 1 ऑक्टोबर 2025 ला जिवंत असते, तर त्यांनी कोणत्या विषयावर भर दिला असता?

बरोबर उत्तरांची यादी

  • प्रश्न 1: अ) पोरबंदर, गुजरात - गांधींचा जन्म.
  • प्रश्न 2: अ) दक्षिण आफ्रिका - वकिलीची सुरुवात.
  • प्रश्न 3: अ) दांडी सत्याग्रह - 1930 मध्ये सुरू.
  • प्रश्न 4: अ) मोहनदास करमचंद गांधी - मूळ नाव.
  • प्रश्न 5: अ) अहिंसा आणि सत्य - जीवन तत्त्व.
  • प्रश्न 6: अ) 1906 - दक्षिण आफ्रिकेतील पहिला सत्याग्रह.
  • प्रश्न 7: अ) हिंद स्वराज - स्वातंत्र्य तत्त्वे.
  • प्रश्न 8: अ) 30 जानेवारी 1948, गोळी झाडून - निधन.
  • प्रश्न 9: अ) स्वदेशी चळवळ - खादी प्रोत्साहन.
  • प्रश्न 10: अ) 1915 - भारतात सत्याग्रह सुरू.
  • प्रश्न 11: अ) त्यांचा जवळचा सहकारी - दोस्त मोहम्मद.
  • प्रश्न 12: अ) असहकार चळवळ - ब्रिटिश कायद्यांचा विरोध.
  • प्रश्न 13: अ) 15 ऑगस्ट 1947 - स्वातंत्र्य पाहिले.
  • प्रश्न 14: अ) दंगली थांबवण्यासाठी - उपवासाचा वापर.
  • प्रश्न 15: अ) अहमदाबाद, गुजरात - साबरमती आश्रम.
  • प्रश्न 16: अ) सत्याग्रह - जीवनचरित्रातील तत्त्व.
  • प्रश्न 17: अ) स्वदेशी चळवळ - ब्रिटिश कपडे जाळले.
  • प्रश्न 18: अ) 2 ऑक्टोबर - जयंती दिन.
  • प्रश्न 19: अ) त्यांच्या मृत्यूच्या वेळी - "राम नाम" घेतले.
  • प्रश्न 20: अ) शांतता आणि पर्यावरण संरक्षण - 1 ऑक्टोबर 2025 चा संभाव्य दृष्टिकोन.

एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) भरती 7267 पदे

 B.Ed. असणार्‍या विद्यार्थ्यां साठी खूप imp आहे. एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS)


मध्ये ७२६७ पदांसाठी मेगा भरती जाहीर


झाली आहे!


अर्जाची शेवटची तारीख: २३ ऑक्टोबर


२०२५


अधिकृत वेबसाईट: tribal.nic.in

पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील

                              

          *पद्मभुषण कर्मवीर*

         *भाऊराव पाटील*


    *जन्म : २२ सप्टेंबर १८८७*

         (कुंभोज, महाराष्ट्र)

     *मृत्यू : ९ मे १९५९*


टोपणनाव : कर्मवीर

पुर्ण नाव : भाऊराव पायगौडा 

                 पाटील

पेशा : समाजसुधारणा, 

                            शिक्षणप्रसार

प्रसिद्ध कामे : रयत शिक्षण संस्था

पुरस्कार : पद्मभूषण (१९५९)


              कर्मवीर भाऊराव पाटील हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' ही योजना सुरू करुन मोठे काम केले. ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला.


कर्मवीर भाऊराव यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौडा पाटील असे होते. आईचे नाव गंगाबाई होते. त्यांचे मूळ गाव कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्यातील मूडब्रिदी गावचे. कर्मवीर यांचे पुर्वज नशीब अजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले. पूर्वीचे त्यांचे आडनाव देसाई होते. पुढे ते एतवडे जि. सांगली येथे स्थिर झाले. पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली त्यामुळे त्यांचे देसाई हे नाव जाऊन पाटील हे नाव रूढ झाले .कोल्हापूर जिल्यात हातकनंगले नावाचा तालुका आहे .या तालुक्यात बाहुबली चा डोंगर आहे. या डोंगरावर पार्श्व्नाथाचे सुंदरभव्य स्मारक आहे. या डोंगराच्या कुशीत कुंभोज नावाचे छोटेशे गाव आहे या गावी २२सप्टेंबर 1887रोजी (आश्विन शुद्ध पंचमी ,ललिता पंचमी ) कर्मवीरांचा जन्म झाला. त्यांचे बालपण कुंभोज या गावी गेले. भाऊरावांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणाची शिवाशिवही चालत नसे, एवढे हे कर्मठ घराणे होते. असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यात , खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा आणि इतरही काही गावांत झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. कर्मवीर लहानपणापासून बेडर वृत्तीचे होते. ते पट्टीचे पोहणारे होते.


🏢 *शिक्षण संस्था*

    पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.


दिनांक ऑक्टोबर ४, इ.स. १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यांनी रयत शिक्षण संस्थेला १,११,१११ रुपयांची देणगी दिली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. संस्थेची काही अशी उद्दिष्टे होती -


*शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.*


*मागासलेल्या वर्गांतील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.*


*निरनिराळ्या जातिधर्मांतील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे*


*अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे.*


*संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.*


*सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.*


*बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.*


ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.


साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. २५ फेब्रुवारी, इ.स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली. जून १६, इ.स. १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी भाऊराव पाटलांना सातार्‍यात हायस्कूल काढण्यासाठी ४००० रुपये दिले, व बडोद्यात महाराजांच्या राज्यारोहणास साठ वर्षे झाल्यानिमित्त होणाऱ्या समारंभाचे आमंत्रण दिले.


त्या देणगीतून भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. इ.स. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर इ.स. १९५४ साली कऱ्हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली, म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे इ.स. १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.


महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती. रयत शिक्षण संस्था हि आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. महाराष्ट्र व कर्नाटक मिळून ६७५ शाखा आहेत.त्यामध्ये २० पूर्वप्राथमिक ,२७ प्राथमिक,४३८ माध्यमिक, ८ अध्यापक विद्यालय,२ आय.टी.आय व ४१ महाविद्यालयांचा समावेश आहे.


ह.रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, इ.स. १९५९ रोजी मालवली. कर्मवीरांचे पूर्ण नाव भाऊसाहेब पायगौंडा पाटील. वडिलांचे नाव पायगौंडा तर आई चे नाव गंगाबाई होते. कर्मवीरांचे मूळ घराणे कर्नाटक राज्यातील,दक्षिण कन्नड जिल्यातील मुडबीद्री गावचे. देसाई हे त्यांचे आडनाव. कर्मवीरांचे पूर्वज नशीब अजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले.व एतवडे बुद्रुक. जि. सांगली येथे स्थिरावले.


📯  *रयतगीत-*


रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. || धृ ||


कर्मवीरांचे ज्ञान पीठ हे शक्तीपीठ हे ठरते आहे. शाहू-फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मुरते आहे. धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.|| १ ||


गरिबांसाठी लेणी मोडून , लक्ष्मी वाहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेऊनि, ज्ञानसाधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. || २||


दिन-दलितांसाठी आण्णा तुमची झिजली चंदन काया अनाथ जीवा सदा लाभली मातृ हृदयी तुमची माया. शून्या मधुनी नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||३||


जीवनातला तिमिर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी, इथे लाभले पंख लेवुनी उंच भरारी नभात घ्यावी प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||४|| ... गीतकार - विठ्ठल वाघ


📚 *पाटीलांची चरित्रे*

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार : कर्मवीर भाऊराव पाटील (प्रा. प्रभाकर नानकर)

कर्मवीर भाऊराव पाटील (बा.ग. पवार)

कर्मवीर भाऊराव पाटील (प्रा.डॉ. रमेश जाधव)

कर्मवीर भाऊराव पाटील (संध्या शिरवाडकर)

कर्मवीर भाऊराव पाटील (सौ. सुधा पेठे)

कर्मवीर भाऊराव पाटील : काल आणि कर्तृत्व (डॉ. रा.अ. कडियाळ)

कुमारांचे कर्मवीर (द.ता भोसले) इंग्रजी अनुवाद Karmaveer Bhauraao Patil)

ग्रामीण महाराष्ट्राची शिक्षण परंपरा - कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षणानंद बापूजी साळुंखे (रा. ना. चव्हाण)

थोर रयतसेवक कर्मवीर भाऊराव पाटील (लीला शांतिकुमार शाह)

समाजसेवक कर्मवीर भाऊराव पाटील (तृप्ती अंतरकर)

माणसातील देव, अजित पाटील


🎖 *सन्मान*

                सन १९५९ : पद्मभूषण

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर

      

        

चुकीचे / गोंधळात टाकणारे शब्द. English word

इंग्रजीमध्ये बरेचसे शब्द विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारे आहे 

उच्चार होता ना काही अक्षरांचा उच्चार होत नाही त्यामुळे स्पेलिंग चुकीचे होते खाली काही महत्वाचे शब्द दिले आहेत याचा सराव करावा..

चुकीचे / गोंधळात टाकणारे शब्द. 

1.  Doubt – (डाउट) – शंका → b मूक आहे.


2.  Debt – (डेट) – कर्ज → b मूक आहे.


3.  Subtle – (सटल) – सूक्ष्म/नाजूक → b मूक आहे.


4.  Comb – (कोम) – कंगवा → b मूक आहे.


5.  Thumb – (थम) – अंगठा → b मूक आहे.


6.  Bomb – (बॉम) – बॉम्ब → b मूक आहे.


7.  Tomb – (टूम) – समाधी → b मूक आहे.


8.  Island – (आयलंड) – बेट → s मूक आहे.


9.  Listen – (लिसन) – ऐकणे → t मूक आहे.


10. Castle – (कॅसल) – किल्ला → t मूक आहे.


11. Fasten – (फासन्) – बांधणे → t मूक आहे.


12. Whistle – (व्हिसल) – शिट्टी → t मूक आहे.


13. Honest – (ऑनेस्ट) – प्रामाणिक → h मूक आहे.


14. Hour – (आवर) – तास → h मूक आहे.


15. Heir – (एअर) – वारस → h मूक आहे.


16. Receipt – (रिसीट) – पावती → p मूक आहे.


17. Cupboard – (कबर्ड) – कपाट → p मूक आहे.


18. Psychology – (सायकोलॉजी) – मानसशास्त्र → p मूक आहे.


19. Sword – (सॉर्ड) – तलवार → w मूक आहे.


20. Answer – (आन्सर) – उत्तर → w मूक आहे.


21. Write – (राइट) – लिहिणे → w मूक आहे.


22. Wrong – (रॉन्ग) – चुकीचे → w मूक आहे.


23. Wrap – (रॅप) – गुंडाळणे → w मूक आहे.


24. Wreck – (रेक) – अपघात/नाश → w मूक आहे.


25. Wrist – (रिस्ट) – मनगट → w मूक आहे.


26. Knob – (नॉब) – बटण → k मूक आहे.


27. Knee – (नी) – गुडघा → k मूक आहे.


28. Knife – (नाइफ) – चाकू → k मूक आहे.


29. Knock – (नॉक) – टकटक करणे → k मूक आहे.


30. Know – (नो) – माहिती असणे → k मूक आहे.


31. Knowledge – (नॉलेज) – ज्ञान → k मूक आहे.


32. Knight – (नाइट) – योद्धा → k मूक आहे.


33. Gnome – (नोम) – परीकथेतील बुटका रक्षक → g मूक आहे.


34. Gnaw – (नॉ) – कुरतडणे → g मूक आहे.


35. Design – (डिजाइन) – रचना → g मूक आहे.


36. Foreign – (फॉरिन) – परदेशी → g मूक आहे.


37. Sign – (साइन) – सही/खूण → g मूक आहे.


38. Reign – (रेन) – कारकीर्द,शासन → g मूक आहे.


39. Campaign – (कॅम्पेन) – मोहिम → g मूक आहे.


40. Plumber – (प्लमर) – नळकाम करणारा → b मूक आहे.


41. Limb – (लिम) – अवयव,फांदी → b मूक आहे.


42. Climb – (क्लाइम) – चढणे → b मूक आहे.


43. Autumn – (ऑटम) – शरद ऋतू → n मूक आहे.


44. Column – (कॉलम) – स्तंभ → n मूक आहे.


45. Damn – (डॅम) – शिवी/शाप → n मूक आहे.


46. Solemn – (सॉलम) – गंभीर → n मूक आहे.


47. Salmon – (सॅमन) – मासा → l मूक आहे.


48. Calf – (काफ) – वासरू → l मूक आहे.


49. Half – (हाफ) – अर्धा → l मूक आहे.


50. Talk – (टॉक) – बोलणे → l मूक आहे.


51.  Walk – (वॉक) – चालणे → l मूक आहे.


52. Could – (कुड) – शक्य होते → l मूक आहे.


53. Should – (शुड) – पाहिजे → l मूक आहे.


54. Would – (वूड) – होईल → l मूक आहे.


55. Folk – (फोक) – लोक → l मूक आहे.


56. Yolk – (योक) – अंड्यातील पिवळ बलक → l मूक आहे.


57. Chalk – (चॉक) – खडू → l मूक आहे.


58. Calm – (काम) – शांत → l मूक आहे.


59. Psalm – (साम) – स्तोत्र → p मूक आहे.


60. Ballet – (बॅले) – नृत्य प्रकार → t मूक आहे.


61. Buffet – (बफे) – जेवण प्रकार → t मूक आहे.


62. Depot – (डिपो) – स्थानक → t मूक आहे.


63. Ballet – (बॅले) – नृत्य प्रकार → t मूक आहे.


64. Gourmet – (गुर्मे) – खाद्यविशेषज्ञ → t मूक आहे.


65. Chalet – (शॅले) – पर्वतीय घर → t मूक आहे.


66. Often – (ऑफन/ऑफ्टन) – बर्‍याचदा → बहुतेकवेळा t मूक.


67. Leopard – (लेपर्ड) – बिबट्या → o मूक आहे.


68. Leopardess – (लेपर्डेस) – बिबटणी → o मूक आहे.


69. Vegetable – (वेजिटेबल) – भाजीपाला → e मूक आहे.


70. Chocolate – (चॉ्कलेट) – चॉकलेट → मधला o मूक आहे.


71. Comfortable – (कम्फर्टेबल/कम्फर्टब्ल) – आरामदायी → मधला or संक्षिप्त.


72. Wednesday – (वेनसडे) – बुधवार → d मूक आहे.


73. February – (फेब्र्युरी/फेब्युरी) – फेब्रुवारी → मधला r सहसा उच्चारला जात नाही.


74. Business – (बिझनेस) – व्यवसाय → मधला i मूक आहे.


75. Clothes – (क्लोझ) – कपडे → th मूक आहे.


76. Vegetables – (वेज्टबल्स) – भाज्या → काही अक्षरे मूक होतात.


77. Comfortable – (कम्फर्टब्ल) – सोयीस्कर → मधली अक्षरे मूक होतात.


78. Iron – (आयरन/आयर्न) – लोखंड → r हलका.


79. Choir – (क्वायर) – गायकांचा समूह → वेगळा उच्चार.


80. Colonel – (कर्नल) – सैनिकी पद → पूर्ण वेगळा उच्चार.


81. Chaos – (केऑस) – गोंधळ,अनागोंदी → ch चा उच्चार= k.


82. Character – (कॅरेक्टर) – स्वभाव → ch चा उच्चार= k.


83. School – (स्कूल) – शाळा → ch चा उच्चार= k.


84. Stomach – (स्टमक) – पोट → ch चा उच्चार= k.


85. Ache – (एक) – दुखणे → chचा उच्चार = k.


86. Technique – (टेकनिक) – पद्धत → ch चा उच्चार= k.


87. Machine – (मशीन) – यंत्र → ch चा उच्चार= श.


88. Champagne – (शॅम्पेन) – दारू → gn चा उच्चार= n.

89. Mortgage – (मॉर्गेज) – कर्ज → t मूक आहे.

90. Rendezvous – (रॉंदेवू) – भेट → फ्रेंच, अनेक अक्षरे मूक.

91.  Aisle – (आयल) – मार्ग ,जायची वाट → s मूक आहे.

92. Answer – (आन्सर) – उत्तर → w मूक आहे.

93. Depot – (डिपो) – स्थानक,आगार → t मूक.

94. Buffet – (बफे) – जेवण → t मूक.

95. Ballets – (बॅलेस्) – नृत्य प्रकार → t मूक.

96. Coup – (कू) – राजकीय उलथापालथ → p मूक.

97.  Corps – (कॉर) – सैनिकी पथक → ps मूक.

98. Psychic – (सायकिक) – मानसिक शक्ती असलेला → p मूक आहे.

99. Debris – (डेब्री) – मोडतोड,कचरा → s मूक.


100.Bourgeois – (बुर्ज्वा/बुर्झ्वा) – मध्यमवर्गीय → फ्रेंच उच्चार

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक ( YCMOU)

 🚨यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक ( YCMOU)


@जुलै 2025 या सत्राकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढविण्यात आलेली आहे.


1.जुलै 2025 सत्राकरिता ज्या शिक्षणक्रमाला ऑनलाईन प्रवेश घ्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या website ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील होमपेजवर जाऊन Admission या टॅबवर Prospectus (माहितीपुस्तिका) शैक्षणिक सत्र जुलै 2025) या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत.


YCMOU च्या संकेतस्थळावर 👉 ycmou.digitaluniversity.ac


Home Page → Admission टॅब → Prospectus (माहितीपुस्तिका) (जुलै 2025 सत्र)


2. प्रवेश अर्ज कसा करायचा?


ऑनलाईन पद्धतीने अर्ज पूर्णपणे व अचूक भरावा.


संबंधित शिक्षणक्रमाचे शुल्क ऑनलाईन भरून अर्ज सादर करावा.


3. महत्त्वाचे निर्देश


दिलेल्या मुदतीतच अर्ज व शुल्क भरून प्रवेश निश्चित करावा.


उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.


तांत्रिक अडचणी आल्यास कार्यालयीन वेळेत (सकाळी 10.30 ते सायं 5.30) संपर्क साधावा.


4. संपर्क क्रमांक (Helpline Numbers):


दूरध्वनी: 0253-2230580, 2230106, 2230714, 2231715


मोबाईल: 9307579874, 9307567182, 9272046725


#YCMOU #OnlineAdmission #जुलै2025सत्र #DistanceEducation #NashikUniversity #AdmissionOpen #विद्यार्थीमाहिती #HigherEducation #MaharashtraEducation

उमाजी नाईक आधारित टेस्ट

उमाजी नाईक आधारित टेस्ट

उमाजी नाईक आधारित टेस्ट

1. उमाजी नाईक यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?

2. उमाजी नाईक यांचा जन्म कोणत्या गावात झाला?

3. उमाजी नाईक कोणत्या समाजाचे होते?

4. उमाजी नाईक यांनी कोणत्या वर्षी ब्रिटिशांविरुद्ध बंड सुरू केले?

5. उमाजी नाईक यांनी कोणत्या कंपनीविरुद्ध लढा दिला?

6. उमाजी नाईक यांच्या बंडाला काय नाव आहे?

7. उमाजी नाईक यांनी कोणत्या किल्ल्याच्या परिसरात कार्य केले?

8. उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी किती रुपये बक्षीस जाहीर केले?

9. उमाजी नाईक यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली?

10. उमाजी नाईक यांच्या बंडाचे प्रेरणास्थान कोण होते?

11. उमाजी नाईक यांच्या बंडाचा कालावधी किती वर्षांचा होता?

12. उमाजी नाईक यांना कोणत्या व्यक्तीने विश्वासघात केला?

13. उमाजी नाईक यांनी कोणत्या वर्षी ब्रिटिशांशी करार केला होता?

14. उमाजी नाईक यांना कोणत्या शहरात फाशी देण्यात आली?

15. उमाजी नाईक यांनी कोणत्या कारणामुळे बंड केले?

16. उमाजी नाईक यांना कोणत्या नावाने संबोधले जाते?

17. उमाजी नाईक यांनी कोणत्या प्रकारच्या लढाईचे नेतृत्व केले?

18. उमाजी नाईक यांनी कोणत्या वर्षी स्वतःला राजा घोषित केले?

19. उमाजी नाईक यांच्या बंडाला कोणत्या समुदायाने समर्थन दिले?

20. उमाजी नाईक यांना कोणत्या वर्षी ब्रिटिशांनी अटक केली?

बरोबर उत्तरांची यादी

  • प्रश्न 1: अ) 1791 - उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 रोजी झाला.
  • [](https://en.wikipedia.org/wiki/Umaji_Naik)
  • प्रश्न 2: अ) भिवडी - उमाजी नाईक यांचा जन्म भिवडी गावात (पुणे जवळ) झाला.
  • [](https://indianblog.co.in/who-was-raje-umaji-naik/)
  • प्रश्न 3: ब) रामोशी - उमाजी नाईक रामोशी समाजाचे होते, जे मराठा काळात गस्त आणि संरक्षणाचे काम करत होते.
  • [](https://en.wikipedia.org/wiki/Umaji_Naik)
  • प्रश्न 4: ब) 1826 - उमाजी नाईक यांनी 1826 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध बंड सुरू केले.
  • [](https://en.wikipedia.org/wiki/Umaji_Naik)
  • प्रश्न 5: ब) ईस्ट इंडिया कंपनी - उमाजी नाईक यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध लढा दिला.
  • [](https://en.wikipedia.org/wiki/Umaji_Naik)
  • प्रश्न 6: अ) रामोशी बंड - त्यांच्या बंडाला रामोशी बंड म्हणतात.
  • [](https://testbook.com/question-answer/ramoshi-rebellion-of-1831-was-led-by-whom--64783d6f5d4a1bd27bd5663b)
  • प्रश्न 7: अ) पुरंदर - उमाजी नाईक यांनी पुरंदर किल्ल्याच्या परिसरात कार्य केले.
  • [](https://www.thenationalistview.com/research-and-reference/umaji-naik-a-forgotten-hero/)
  • प्रश्न 8: ब) 10,000 - ब्रिटिशांनी उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी 10,000 रुपये बक्षीस जाहीर केले.
  • [](https://en.wikipedia.org/wiki/Umaji_Naik)
  • प्रश्न 9: अ) 1832 - उमाजी नाईक यांना 3 फेब्रुवारी 1832 रोजी फाशी देण्यात आली.
  • [](https://en.wikipedia.org/wiki/Umaji_Naik)
  • प्रश्न 10: अ) छत्रपती शिवाजी महाराज - उमाजी नाईक यांनी शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर बंड केले.
  • [](https://www.esamskriti.com/e/History/Indian-History/Umaji-Naik-is-a-freedom-fighter-who-took-on-the-British---1.aspx)
  • प्रश्न 11: अ) 6 वर्षे - उमाजी नाईक यांचे बंड 1826 ते 1832 पर्यंत 6 वर्षे चालले.
  • [](https://en.wikipedia.org/wiki/Umaji_Naik)
  • प्रश्न 12: अ) नाना रघु चव्हाण - नाना रघु चव्हाण यांनी विश्वासघात करून उमाजी नाईक यांना पकडण्यास मदत केली.
  • [](https://en.wikipedia.org/wiki/Umaji_Naik)
  • प्रश्न 13: अ) 1829 - उमाजी नाईक यांनी 1829 मध्ये ब्रिटिशांशी तात्पुरता करार केला.
  • [](https://www.esamskriti.com/e/History/Indian-History/Umaji-Naik-is-a-freedom-fighter-who-took-on-the-British---1.aspx)
  • प्रश्न 14: अ) पुणे - उमाजी नाईक यांना पुण्यात फाशी देण्यात आली.
  • [](https://en.wikipedia.org/wiki/Umaji_Naik)
  • प्रश्न 15: अ) रामोशींचा कर गोळा करण्याचा हक्क रद्द - ब्रिटिशांनी रामोशींचा पारंपरिक कर गोळा करण्याचा हक्क रद्द केल्याने बंड झाले.
  • [](https://testbook.com/question-answer/ramoshi-rebellion-of-1831-was-led-by-whom--64783d6f5d4a1bd27bd5663b)
  • प्रश्न 16: अ) रaje उमाजी नाईक - त्यांना रaje उमाजी नाईक म्हणून संबोधले जाते.
  • [](https://indianblog.co.in/who-was-raje-umaji-naik/)
  • प्रश्न 17: अ) गुरिल्ला युद्ध - उमाजी नाईक यांनी गुरिल्ला युद्ध पद्धतीने लढा दिला.
  • [](https://testbook.com/question-answer/ramoshi-rebellion-of-1831-was-led-by-whom--64783d6f5d4a1bd27bd5663b)
  • प्रश्न 18: अ) 1826 - उमाजी नाईक यांनी 1826 मध्ये स्वतःला राजा घोषित केले.
  • [](https://www.esamskriti.com/e/History/Indian-History/Umaji-Naik-is-a-freedom-fighter-who-took-on-the-British---1.aspx)
  • प्रश्न 19: अ) रामोशी - रामोशी समुदायाने उमाजी नाईक यांच्या बंडाला समर्थन दिले.
  • [](https://testbook.com/question-answer/ramoshi-rebellion-of-1831-was-led-by-whom--64783d6f5d4a1bd27bd5663b)
  • प्रश्न 20: ब) 1832 - उमाजी नाईक यांना 1832 मध्ये ब्रिटिशांनी अटक केली.
  • [](https://en.wikipedia.org/wiki/Umaji_Naik)

शरद पवार इन्सपायर फेलोशिप : शिक्षण सन 2026





 *शरद पवार इन्सपायर फेलोशिप : शिक्षण*


   शिक्षण उद्यासाठी असते. उद्याचे सुजाण, सतर्क, सर्जनशील, कर्तबगार व सुसंस्कृत नागरिक घडविणे हे शिक्षणातून अपेक्षित असते. शिकावे कसे, शिकण्याचा आनंद कसा घ्यावा-द्यावा आणि आजन्म शिकत कसे राहावे हे शिकविते ते खरे शिक्षण. शिकता-शिकता जे उद्याची आव्हाने पेलायला सज्ज करते, उद्याच्या संधींचे सोने करायला शिकवते ते खरे शिक्षण.

     शिक्षण क्षेत्रात नवे काही करु पाहणाऱ्या, ध्येयाने झपाटलेल्या व त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या होतकरु गुणवंत शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्याना हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण काम व्हावे तसेच मुलभूत संशोधनास वाव मिळावा हा या फेलोशीपचा हेतू आहे.यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने २० प्राथमिक शिक्षक आणि १० माध्यमिक शिक्षकांना ही फेलोशिप दिली जाणार आहे. 

       सध्या देशभर आणि राज्यभर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०च्या अंमलबजावणीचे काम सुरू आहे.त्या संदर्भाने या धोरणात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची प्रभावी अंमलबजावणी, त्यामधील साधने व तंत्राचा परिणामकारक रीतीने उपयोग ह्या बाबी अंतर्भूत आहेत. ही मूल्यांकन प्रक्रिया सातत्यपूर्ण आणि आकारिक क्षमता आधारित आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर, शिक्षण विकास मंच यांच्यावतीने यावर्षी शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी शिक्षकांकडून *राष्ट्रीय शिक्षण धोरण -२०२० शालेय शिक्षणातील मूल्यांकन* प्रक्रियेला केंद्रस्थानी मानून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यासाठी- https://www.sharadpawarfellowship.com/fellowships/education-fellowship/education-fellowship-primary-secondary-education या वेबसाईटवर *भूमिका, फेलोशिपचे तपशील, फेलोशिपची नियमावली* यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. 

       २०२६- २७च्या फेलोशिपसाठीची अर्ज प्रक्रिया १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरु झाली आहे. तरी इच्छुक शिक्षकांनी दिनांक १२ऑक्टोबर २०२५ अखेर *https://www.sharadpawarfellowship.com/ या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करताना वेबसाईटवर फेलोशिपबाबत सविस्तर माहितीचे टीपण* दिले आहे.ते टीपण काळजीपूर्वक वाचावे, फार्म भरण्यासाठी,विषय निवडीसाठी त्याचा उपयोग होईल. 


टीप : प्रस्ताव लेखन कसे करावे? याकरिता हा खालील व्हिडिओ पहा- 


*https://youtu.be/agPkuW4MnVI?si=RWZFv8OU3_FRbDKl*

महाराष्ट्रातील महान संत आधारित टेस्ट 3

महाराष्ट्रातील महान संत प्रश्नमंजुषा 3

महाराष्ट्रातील महान संत प्रश्नमंजुषा 3

१. संत चोखामेळा कोणत्या व्यवसायाशी संबंधित होते?

२. संत ज्ञानेश्वरांनी कोणत्या संताला पत्र लिहून मार्गदर्शन केले?

३. संत तुकारामांनी कोणत्या ठिकाणी विठ्ठलाची भक्ती केली?

४. संत रामदासांनी कोणत्या युद्धात शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली?

५. संत एकनाथांनी कोणत्या ग्रंथाचे मराठीत भाषांतर केले?

६. संत नामदेवांनी कोणत्या संप्रदायाला पंजाबमध्ये लोकप्रिय केले?

७. संत जनाबाई कोणत्या गावात राहत होत्या?

८. संत मुक्ताबाई यांचे समाधीस्थळ कोणते आहे?

९. संत ज्ञानेश्वरांचे वडील कोण होते?

१०. संत तुकारामांनी कोणत्या साहित्यिक शैलीत रचना केल्या?

११. संत रामदासांनी कोणत्या व्यायामशाळेची स्थापना केली?

१२. संत एकनाथांनी कोणत्या प्रकारच्या साहित्यावर जोर दिला?

१३. संत चोखामेळा यांचे अभंग कोणत्या विषयावर केंद्रित होते?

१४. संत नामदेवांनी कोणत्या संतासोबत पंढरपूर यात्रा केली?

१५. संत मुक्ताबाई यांचे वय समाधीच्या वेळी किती होते?

१६. संत रामदासांनी कोणत्या ग्रंथात शिवाजी महाराजांचे गुणगान केले?

१७. संत तुकारामांनी कोणत्या नदीच्या किनारी भक्ती केली?

१८. संत ज्ञानेश्वरांनी कोणत्या शतकात कार्य केले?

१९. संत जनाबाई यांचे अभंग कोणत्या देवतेवर केंद्रित होते?

२०. संत चोखामेळा यांचे समाधीस्थळ कोणते आहे?

महाराष्ट्रातील महान संतांच्या जीवनावर आधारित टेस्ट 2

महाराष्ट्रातील महान संत प्रश्नमंजुषा 2

महाराष्ट्रातील महान संत प्रश्नमंजुषा 2

१. संत सोपानदेव कोणाचे भाऊ होते?

२. संत ज्ञानेश्वरांनी कोणत्या भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली?

३. संत तुकारामांचे गुरू कोण होते?

४. संत रामदासांनी कोणत्या छत्रपतींचे मार्गदर्शक म्हणून कार्य केले?

५. संत एकनाथांनी कोणत्या नदीच्या किनारी कार्य केले?

६. संत नामदेवांनी कोणत्या भाषेत अभंग रचले?

७. संत मुक्ताबाई यांनी कोणत्या संताला ‘तात्या’ म्हणून संबोधले?

८. संत ज्ञानेश्वरांनी कोणत्या ग्रंथाचा आधार घेऊन ज्ञानेश्वरी लिहिली?

९. संत तुकारामांचे अभंग कोणत्या देवतेवर आधारित आहेत?

१०. संत रामदासांनी कोणत्या मठाची स्थापना केली?

११. संत एकनाथांनी कोणत्या सामाजिक सुधारणांवर जोर दिला?

१२. संत नामदेवांनी कोणत्या ठिकाणी दीर्घकाळ प्रवास केला?

१३. संत मुक्ताबाई यांचे प्रसिद्ध वचन कोणते आहे?

१४. संत ज्ञानेश्वरांनी कोणत्या ठिकाणी समाधी घेतली?

१५. संत रामदासांनी कोणत्या कालखंडात कार्य केले?

१६. संत तुकारामांचे समाधीस्थळ कोणते आहे?

१७. संत एकनाथांचे प्रसिद्ध साहित्य ‘भावार्थ रामायण’ कोणत्या भाषेत आहे?

१८. संत नामदेवांचे अभंग कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहेत?

१९. संत जनाबाई कोणाच्या शिष्या होत्या?

२०. संत रामदासांनी कोणत्या साहित्यिक शैलीत दासबोध लिहिला?

महाराष्ट्रातील महान संतांच्या जीवनावरआधारित टेस्ट

महाराष्ट्रातील संत प्रश्नमंजुषा

महाराष्ट्रातील संत प्रश्नमंजुषा

१. संत ज्ञानेश्वरांचा जन्म कोणत्या गावात झाला?

२. संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला?

३. संत ज्ञानेश्वरांनी कोणत्या संप्रदायाची स्थापना केली?

४. संत मुक्ताबाई कोणाच्या बहीण होत्या?

५. संत तुकारामांचा जन्म कोणत्या गावात झाला?

६. संत तुकारामांचे प्रमुख साहित्य कोणते आहे?

७. संत रामदास स्वामी यांचे मूळ नाव काय होते?

८. संत रामदासांनी कोणता ग्रंथ लिहिला?

९. संत एकनाथांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला?

१०. संत एकनाथांनी कोणता ग्रंथ लिहिला?

११. संत नामदेवांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला?

१२. संत नामदेव कोणत्या व्यवसायाशी संबंधित होते?

१३. संत निवृत्तीनाथ कोणाचे थोरले बंधू होते?

१४. संत रामदासांनी कोणत्या ठिकाणी मारोती मंदिरांची स्थापना केली?

१५. संत ज्ञानेश्वरांनी कोणत्या वयात समाधी घेतली?

१६. संत रामदासांचे समाधीस्थळ कोणते आहे?

१७. संत तुकाराम कोणत्या संप्रदायाशी संबंधित होते?

१८. संत एकनाथांचे गुरू कोण होते?

१९. संत मुक्ताबाई यांचा प्रमुख साहित्यिक योगदान काय आहे?

२०. संत रामदासांचे आराध्य दैवत कोणते होते?

भारतरत्न इंदिरा गांधी..

          *भारतरत्न इंदिरा गांधी*   (५ वी व ८ वी भारतीय पंतप्रधान)      *जन्म : १९ नोव्हेंबर १९१७*             (मुघलसराई)    *मृत्यू : ३१ ऑक...