बुद्धिबळाचे नियम..

  बुद्धिबळ हा एक प्राचीन आणि जगप्रसिद्ध खेळ आहे, जो दोन खेळाडूंमध्ये 64 घरांच्या पटावर खेळला जातो. या खेळामध्ये प्रत्येक खेळाडूकडे 16 मोहरे असतात. बुद्धिबळ खेळण्याचे नियम खालीलप्रमाणे आहेत:

बुद्धिबळ पटाची मांडणी:

 * बुद्धिबळ पट 8x8 च्या चौरसांमध्ये विभागलेला असतो.

 * प्रत्येक खेळाडूकडे 16 मोहरे असतात, ज्यात 1 राजा, 1 वजीर, 2 हत्ती, 2 घोडे, 2 उंट आणि 8 प्यादे असतात.

 * मोहरे विशिष्ट पद्धतीने पटावर मांडलेले असतात.

मोहरांची चाल:

 * राजा: राजा कोणत्याही दिशेने एक घर चालू शकतो.

 * वजीर: वजीर कोणत्याही दिशेने कितीही घरे चालू शकतो.

 * हत्ती: हत्ती फक्त सरळ रेषेत कितीही घरे चालू शकतो.

 * घोडा: घोडा 'एल' आकारात चालतो, म्हणजे दोन घरे एका दिशेने आणि एक घर दुसऱ्या दिशेने.

 * उंट: उंट फक्त तिरकस रेषेत कितीही घरे चालू शकतो.

 * प्यादे: प्यादे फक्त पुढे एक घर चालू शकतात, पण पहिल्या चालीत दोन घरे चालू शकतात. प्यादे तिरकस रेषेत शत्रूचे मोहरे मारू शकतात.

विशेष नियम:

 * शह (चेक): जेव्हा राजा शत्रूच्या मोहरांच्या हल्ल्यात असतो, तेव्हा त्याला शह म्हणतात.

 * शह काटणे (चेक मेट): जेव्हा राजाला वाचवण्याचा कोणताही मार्ग नसतो, तेव्हा त्याला शह काटणे म्हणतात आणि तो खेळाडू हरतो.

 * कास्टलिंग: राजा आणि हत्ती यांच्यातील एक विशेष चाल, ज्यात राजा दोन घरे हत्तीच्या दिशेने चालतो आणि हत्ती राजाच्या बाजूला येतो.

 * प्याद्याचे रूपांतर: जेव्हा प्यादे पटाच्या शेवटच्या रांगेत पोहोचते, तेव्हा ते वजीर, हत्ती, घोडा किंवा उंट यांपैकी कोणत्याही एका मोहरात रूपांतरित होऊ शकते.

खेळाचा उद्देश:

 * शत्रूच्या राजाला शह देऊन त्याला शह काटणे हा खेळाचा मुख्य उद्देश असतो.

इतर महत्वाचे मुद्दे:

 * बुद्धिबळ खेळामध्ये अनेक डावपेच आणि युक्त्या असतात.

 * हा खेळ विचारशक्ती आणि रणनीती विकसित करण्यास मदत करतो.

 * बुद्धिबळ खेळण्यासाठी अनेक ऑनलाईन आणि ऑफलाईन संसाधने उपलब्ध आहेत.

मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल.

स्वा.विनायक दामोदर सावरकर विशेष राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

                                       

*स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर*                                                                               (महान क्रांतिकारक, उत्कट देशभक्त, प्रतिभासंपन्न कवी, नाटककार, प्रभावी वक्ते व लेखक) 

         *जन्म : २८ मे १८८३*

(भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत)

     *मृत्यू : २६ फेब्रुवारी १९६६*

      (दादर, मुंबई, महाराष्ट्र,भारत)

चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना : अभिनव भारत,

अखिल भारतीय हिंदू महासभा

प्रमुख स्मारके : मुंबई, पुणे, बिहार, दिल्ली, अंदमान

धर्म : हिंदू

प्रभाव : शिवाजी महाराज, जोसेफ मॅझिनी

वडील : दामोदर विनायक सावरकर

आई : राधाबाई दामोदर सावरकर 

पत्नी : यमुनाबाई विनायक सावरकर (माई)

अपत्ये : प्रभाकर, प्रभा, शालिनी, विश्वास

*भाषाशुद्धीचा आग्रह धरून सावरकरांनी मराठी भाषेला ४५ शब्द दिले आहेत.*

           विनायक दामोदर सावरकर  हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते.

⚜️ *चरित्र*

           सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या शहरात झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव सावरकर हे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई, ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्‍नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील इ.स. १८९९ च्या प्लेगला बळी पडले.


सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली. मार्च, इ.स. १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर इ.स. १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इ.स. १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.

                       राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले.  इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. सावरकरांनी पुण्यामध्ये इ.स. १९०५ साली विदेशी कापडाची होळी केली . श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.

                    इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले. राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा बदला म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली (इ.स. १९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (इ.स. १९११). मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.

           अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. अंदमानमध्ये असतांना सावरकरांनी Essentials of Hindutva हा ग्रंथ लिहिला. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लीम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्‍नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली. (दिनांक ६ जानेवारी १९२४).

                 अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर - असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजक्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्‍न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर - अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात.


♨️ *सावरकरांचे जात्युच्छेदन*

              अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्‍नागिरीत स्थानबद्ध केले (१९२४ जाने.६). हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्‍नागिरीत राहून कार्य केले. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य (१९३० नोव्हें ) जबाबदार आहे, हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले. हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. स्वकीयांतील जातीयतेवरपण निर्भीड टीका केली. त्यांनी रत्‍नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले. जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्‍नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले. या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले.


🐄 *गाय हा एक उपयुक्त पशू*

             ‘मायासृष्टीत जोवर मनुष्य आहे आणि गाय व बैल हे पशू आहेत, तोवर माणसाने त्याच्याहून सर्व गुणांत हीन असलेल्या पशूस देव मानणे म्हणजे मनुष्यास पशूहून नीच मानण्यासारखे आहे. गाढवाने पाहिजे तर त्याहून श्रेष्ठ पशू असलेल्या गाईस देव मानावे; मनुष्याने तसे मानण्याचा गाढवपणा करू नये. ..कोणत्याही गोष्टीत ती धर्म आहे असे पोथीत सांगितले आहे, म्हणूनच तसे डोळे मिटून मानण्याची पोथीनिष्ठ आंधळी भावना आता झपाट्याने मावळत आहे आणि ती मावळत जावी हेच आता मनुष्याच्या प्रगतीस अत्यंत आवश्यक आहे.

                  एक वेळ राष्ट्रात थोडी गोहत्या झाली तरी चालेल, पण उभ्या राष्ट्राची बुद्धिहत्या होता कामा नये. यास्तव गाय वा बैल हे पशू आपल्या कृषिप्रधान देशात मनुष्यहितास अत्यंत उपकारक आहेत इतकेच सिद्ध करून, व त्या पशूचा उपयोग राष्ट्रास ज्या प्रमाणात, नि ज्या प्रकारे होईल, त्या प्रमाणात नि त्या प्रकारे पशू म्हणूनच जोपासना करू म्हणाल, तरच ते राष्ट्राच्या निर्भेळ हिताचे होईल. पण त्या हेतूने गाय ही देव आहे कारण पोथीत तिची पूजा करणे हा धर्म आहे, इत्यादी थापा माराल, तर त्यावर जरी राष्ट्राने यापुढेही विश्वास ठेवला नि गोरक्षण थोडेसे अधिक झाले, तरीही त्या पोथीजात प्रवृत्तीला उत्तेजन देण्याचे जे अपकार्य त्यायोगे करावे लागते त्याचे परिणाम राष्ट्राची शतपटीने अधिक हानी करील.(संपादित लेख – ‘गाय- एक उपयुक्त पशू’: वि. दा. सावरकर )


⛓️ *सात बेड्या*

           सावरकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात जातिव्यवस्थेवर हल्ला केला. अनुवंशात जातीचे मूळ आहे. त्या मुळावरच सावरकरांनी हल्ला चढवत अनुवंश हा आचरटपणा आहे, जर ब्राह्मणाच्या घरी 'ढ' जन्मला तर त्याला 'ढ'च म्हटले पाहिजे आणि जर शूद्रांत 'ज्ञ' निघाला तर त्याला 'ज्ञ'च म्हटले पाहिजे, मग त्याचा बाप, आजा अथवा पणजा 'ढ' असो की 'ज्ञ' असो. सावरकरांनी हल्ला करताना 'आपले हिंदुत्वाचे समर्थक दुखावतील' वगैरे फाजील भीती न बाळगता त्यांचे प्रबोधन केले. सावरकर म्हणतात की 'आज आमच्या हिंदू समाजात पोथीत तसे लिहिले आहे ते सोडून इतर कोणत्याही लक्षणाने सहज विभिन्नत्व विविध जातींमध्ये दिसून येत नाही. जात मानणे ही मूळ चूक! त्यात महादेवाच्या जटेपासून ही जात निघाली आणि ब्रह्मदेवाच्या बेंबीपासून अमुक जात निघाली इत्यादी उपरत्या अक्षरशः खऱ्या मानून त्या त्या जातींच्या अंगी ते गुण उपजतच आहेत हे मानणे ही घोडचूक!! अन् तो गुण त्या जातीच्या संतानात प्रकट झाला नसला तरी तो आहेच समजून तशी उच्च-नीचता त्या संतानास भोगावयास लावणे ही पहाड चूक.

         जातिव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले. त्या लेखात ते म्हणतात, पोथीजात जातिभेद हा मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो. त्यानंतर त्या सात बेड्या म्हणजे १) वेदोक्तबंदी {स्वतःच्या क्षत्रियादिक धर्मबंधूंनासुद्धा वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे चालणार नाही.-सावरकर} २) व्यवसायबंदी ३) स्पर्शबंदी ४) सिंधूबंदी ५) शुद्धीबंदी ६) रोटीबंदी ७) बेटीबंदी. आपल्याकडे अजूनही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात आहे. सावरकरांनी आंतरजातीय विवाहांना समर्थनच दिले नाही तर स्वतः आंतरजातीय विवाह लावले.


🛕 *हिंदू महासभेचे कार्य*

          रत्‍नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. इ.स. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला.

                        एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला.

                   सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इ.स. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. १ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.


🗽 *सावरकर स्मारके*

                     पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृह क्रमांक १ मधील १७व्या क्रमांकाच्या खोलीत सावरकरांचे इ.स. १९०२ ते १९०५ या काळात वास्तव्य होते. सावरकर जयंतीच्या दिवशी ही एरवी बंद असलेली खोली जनतेला पाहण्यासाठी खुली केली जाते.

सावरकरांना अंदमानमधील तुरुंगातल्या ज्या कोठडीत ठेवले होते, ती खोली सावरकरांचे स्मारक म्हणून सांभाळली जाते. पोर्ट ब्लेयरमधील स्वातंत्र्यज्योती स्तंभावर सावरकरांची वचने कोरलेल्या धातूच्या पट्ट्या बसवल्या होत्या. ही वचने ताम्रपट्ट्यांवर कोरण्याचे काम मुंबईच्या गणेश एन्ग्रेव्हरने केले होते. तत्कालीन पेट्रोलमंत्री मणिशंकर अय्यर यांनी ९ ऑगस्ट २००४ रोजी ती वचने हटवली. २०१६ साली ती वचने पुन्हा प्रस्थापित करण्याचे काम चालू आहे.

पुण्यात कर्वे रोडवर एक, एस.एम जोशी पुलानजीक एक आणि शिवराम म्हात्रे रोडवर एक अशी सावरकरांची तीन स्मारके आहेत.

गोसावीवाडा (भगूर) येथील स्मारक

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क (मुंबई)

स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क (मुंबई)

🏤 *संस्था*

          सावरकरांचे कार्य जनेतुपुढे आणणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत. त्यांतील काही संस्थांची ही नावे :-


नादब्रह्म (चिंचवड-पुणे) : डॉ.रवींद्र घांगुर्डे,डॉ.वंदना घांगुर्डे आणि सावनी रवींद्र - यांनी चालविलेली ही संस्था सावरकरांच्या वाङ्‌मयावर आधारित अनेक कार्यक्रम रंगमंचावर सादर करते.

वीर सावरकर फाउंडेशन (कलकता)

वीर सावरकर मित्र मंडळ ()

वीर सावरकर स्मृती केंद्र (बडोदा)

समग्र सावरकर वाङ्मय प्रकाशन समिती

सावरकर दर्शन प्रतिष्ठान (मुंबई)

सावरकर रुग्ण सेवा मंडळ (लातूर)

स्वातंत्र्यवीर सावरकर गणेश मंडळ 

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ (निगडी-पुणे जिल्हा)

स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (डोंबिवली-ठाणे जिल्हा)

स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (मुंबई). ही संस्था सावरकर साहित्य संमेलने भरविते.

✍️ *मृत्युपत्र*

                       ‘माझे प्रेत शक्यतो विद्युत-चितेवरच जाळण्यात यावे. जुन्या पद्धतीप्रमाणे ते शक्यतो माणसांनी खांद्यावरून नेऊ नये, किंवा कोणत्याही प्राण्याच्या गाडीमधून नेऊ नये, तर ते यांत्रिक शववाहिकेतूनच विद्युत – स्मशानात नेले जावे.. माझ्या मृत्यूनिमित्त कोणीही आपली दुकाने किंवा व्यवसाय बंद ठेवू नयेत. कारण त्याने समाजाला फार त्रास होतो. घरोघरीच्या संसारासाठी दैनिक आवश्यकतेच्या वस्तू न मिळाल्याने अडथळा होतो. माझ्या निधनानिमित्त कोणीही सुतक, विटाळ, किंवा ज्यायोगे कुटुंबीयांना किंवा समाजाला निष्कारण त्रास होतो अश्या पिंडदानासारख्या कोणत्याही जुन्या रूढी पाळू नयेत. त्या पिंडांना काकस्पर्श होईतो वाट पाहत बसणे इत्यादी कालबाह्य गोष्टी पाळू नयेत.’ वगैरे.


📚 *ग्रंथ आणि पुस्तके*

           वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", "हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते", "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.'सागरा प्राण तळमळला' या कवितेला २००९ साली १०० वर्षे पूर्ण झालेली आहेत.


स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ४१ पुस्तकांचा संच बाजारात उपलब्ध आहे, त्यातील पुस्तके अशी :


अखंड सावधान असावे

१८५७ चे स्वातंत्र्यसमर

अंदमानच्या अंधेरीतून

अंधश्रद्धा भाग १

अंधश्रद्धा भाग २

संगीत उत्तरक्रिया

संगीत उ:शाप

ऐतिहासिक निवेदने

काळे पाणी

क्रांतिघोष

गरमा गरम चिवडा

गांधी आणि गोंधळ

जात्युच्छेदक निबंध

जोसेफ मॅझिनी

तेजस्वी तारे

नागरी लिपीशुद्धीचे आंदोलन

प्राचीन अर्वाचीन महिला

भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने

भाषा शुद्धी

महाकाव्य कमला

महाकाव्य गोमांतक

माझी जन्मठेप

माझ्या आठवणी - नाशिक

माझ्या आठवणी - पूर्वपीठिका

माझ्या आठवणी - भगूर

मोपल्यांचे बंड

रणशिंग

लंडनची बातमीपत्रे

विविध भाषणे

विविध लेख

विज्ञाननिष्ठ निबंध

शत्रूच्या शिबिरात

संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष

सावरकरांची पत्रे

सावरकरांच्या कविता

स्फुट लेख

हिंदुत्व

हिंदुत्वाचे पंचप्राण

हिंदुपदपादशाही

हिंदुराष्ट्र दर्शन

क्ष - किरणें


📕 *इतिहासविषयावरील पुस्तके*

            १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाद्वारे, (इ.स. १८५७च्या युद्धाचा 'पहिले स्वातंत्र्यसमर' असा उल्लेख करून तो लढा त्यांनी पहिल्यांदा भारतीय स्वातंत्र्यलढ्यास जोडला)

भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने

हिंदुपदपादशाही

📙 *कथा*

सावरकरांच्या गोष्टी भाग - १

सावरकरांच्या गोष्टी भाग - २

📚 *कादंबऱ्या*

काळेपाणी

मोपल्यांचे बंड अर्थात्‌ मला काय त्याचे -मल्हार प्रॉडक्शन्सने या कादंबरीची ऑडियो आवृत्ती काढली आहे.


सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. त्यांचा शिखांचा इतिहास अप्रकाशित राहिला. सावरकरांनी विचारप्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, कीलक राष्ट, टपाल, दूरध्वनी, नभोवाणी, ध्वनिक्षेपक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, तारण, संचलन, गतिमान नेतृत्व, क्रीडांगण, सेवानिवृत्तिवेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे शतावधी समर्पक शब्द सावरकरांनी सुचविलेले आहेत.


वि.दा. सावरकर हे मुंबई येथे इ.स. १९३८ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.


चाफेकरांचा फटका

१८ एप्रिल १८९८ रोजी दामोदर चाफेकर फासावर गेले. त्यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे त्यांची टिळकांशी भेट घडवून आणली गेली. टिळकांनी चाफेकरांना भगवद्‌गीतेची एक प्रत दिली, ती हातात धरूनच दामोदर फासावर गेले. त्या रात्री विनायक दामोदर चाफेकर कितीतेरी वेळ रडत होते. त्यांनंतर सावरकरांनी चाफेकरांचा फटका नावाची काव्यकृती रचली. त्यातील दोन ओळी अशा :-


भक्ष्य रँड बहुमस्त देखता ‘सिंह’ धावले बग्गीकडे गोळी सुटली, गडबड मिटली, दुष्ट नराधम चीत पडे॥


📜 *पुरस्कार*

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात. उदा.

                     ’निनाद’ तर्फे दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर ध्येयवादी पुरस्कार

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे *स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार, विज्ञान पुरस्कार, समाजसेवा पुरस्कार आणि शौर्य पुरस्कार

वीर सावरकर फाउंडेशनचा वीर सावरकर पुरस्कार

टिळकनगर (डोंबिवली) शिक्षण प्रसारक मंडळाच्या सावरकर अभ्यास मंडळाचे वीर सावरकर सेवा पुरस्कार

✍️ *सावरकरांवर लिहिलेली पुस्तके*

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिलेली पुस्तके आणि त्याचे लेखक/प्रकाशक खालीलप्रमाणे:


अत्रे, प्रभाकर १९८५. वसा वादळाचा | स्नेहल प्रकाशन, पुणे

अंदूरकर, व्यं.गो. १९७०. शत्रूच्या गोटात सावरकर । सुरस ग्रंथमाला, सोलापूर

अधिकारी, गोपाळ गोविंद १९३७. बॅ. सावरकर यांचे चरित्र | महाराष्ट्र प्रकाशन संस्था, मुंबई

ओगले, अनंत | पहिला हिंदुहृदयसम्राट

आचार्य अत्रे, मालशे, स.गं.(संपादक) १९८३. क्रांतिकारकांचे कुलपुरुष सावरकर | परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई

आठवले, रा.म. १९३८. बॅ. विनायक दामोदर सावरकर

आफळे, गोविंदस्वामी (लेखक व प्रकाशक) १९६७. सावरकर गाथा

उत्पात, वा.ना., सावरकर - एक धगधगते यज्ञकुंड

उपाध्ये, संजय २००२. विनायक विजय . चंद्रकला प्रकाशन, पुणे

ओगले, अनंत शंकर : होय ! मी सावरकर बोलतोय (नाटक)

करंदीकर, डॉ. विद्याधर : कवी-नाटककार सावरकर

करंदीकर, शि.ल. १९६६. असे होते वीर सावरकर । सीताबाई करंदीकर, पुणे

करंदीकर, सीताबाई १९४३. सावरकर-चरित्र (कथन) | सीताबाई करंदीकर, पुणे

१९४७. सावरकरांचे सहकारी | गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई

करंदीकर, विद्याधर (लेखक, जानेवारी, २०१६) : कवी, नाटककार सावरकर

कऱ्हाडे, शंकर १९८३. गोष्टीरूप सावरकर , विजय प्रकाशन, नागपूर

कानिटकर, सचिन. माझे सावरकर

किर्लोस्कर, मुकुंदराव (संपादक) १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजस्वी जीवनावरील अलौकिक विशेषांक | सावरकर दर्शन प्रतिष्ठान, पुणे

कीर, धनंजय १९५०. सावरकर ॲन्ड हिज टाइम्स

कुळकर्णी, श्यामकांत २०००. गाथा थोर क्रांतिभास्कराची, विजय प्रकाशन, नागपूर

केळकर, भा.कृ. १९५२. सावरकर-दर्शन व्यक्ति नि विचार, गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई

खाडिलकर, नीळकंठ १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि प्रॅक्टिकल सोशॅलिझम, दैनिक नवाकाळ प्रकाशन, मुंबई

खांबेटे, द.पां. (अनुवाद), १९७२. स्वातंत्र्यवीर सावरकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

गद्रे, अनुराधा अ. २००५. स्वातंत्र्यवीर सावरकर, मनोरमा प्रकाशन, मुंबई

गोखले, द.न. १९८९. स्वातंत्र्यवीर सावरकर : एक रहस्य, मौज प्रकाशन गृह, मुंबई

गोखले, मो.शी. १९४०. वीर सावरकर

गोखले, विद्याधर २००५. झंझावात, मनोरमा प्रकाशन, मुंबई

गोखले, श्री.पु. १९६९. अशी गर्जली वीरवाणी, लोकमान्य प्रकाशन, पुणे

१९८३. सावरकरांशी सुखसंवाद, मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई

गोडसे, गोपाळ १९६९. जय मृत्युंजय (स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील कविता), केसरी प्रकाशन, पुणे

गोडबोले, अ.मा. १९९७. क्रांतदर्शी सावरकर, साहित्यसेवा प्रकाशन, औरंगाबाद

गोविंदमित्र १९५७. स्वातंत्र्यवीर श्री. विनायक दामोदर सावरकर यांचे काव्यमय चरित्र | गं.वि.परचुरे, कल्याण

घाणेकर, ऋचा २००३. स्वातंत्र्यवीर सावरकर, महाजन ब्रदर्स, पुणे

चौगुले, सरोज : क्रान्तिवीर: सावरकर: अन्यरूपकाणि च : सावरकर, मदनलाल धिंग्रा वगैरे नावांच्या एकूण चार संस्कृत नाटिका

जोगळेकर, ज.द. १९८३. स्वातंत्र्यवीर सावरकर वादळी जीवन | उत्कर्ष प्रकाशन, पुणे

जोगळेकर, ज.द. १९८३. पुनरुत्थान | पंडित बखले, मुंबई

जोशी, विष्णू श्रीधर १९८५. क्रांतिकल्लोळ | मनोरमा प्रकाशन, मुंबई

१९९२. अखेर उजाडलं, पण देश रक्तबंबाळ । मनोरमा प्रकाशन, मुंबई

१९९२, झुंज सावरकरांची । मनोरमा प्रकाशन, मुंबई

ताटके, अरविंद १९७३. युगप्रवर्तक सावरकर । स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई

दुगल, न.दि. १९८३. देशप्रेमा... तुझे नाव सावरकर । अजब पुस्तकालय, कोल्हापूर

देशपांडे, बालशंकर १९५८. क्रांतिकारकांचे मुकुटमणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर

देशपांडे, भास्कर गंगाधर १९७४. क्रांतिसूर्य सावरकर, अजय प्रकाशन, औरंगाबाद

देसाई, हरिश्चंद्र त्र्यंबक १९८३. शतपैलू सावरकर । प्रबोधन, मुंबई

नातू, र.वि. १९९७. समग्र सावरकर खंड १० , पृष्ठे ६००० ची संदर्भसूची, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई

पळसुले गजानन बाळकृष्ण-वैनायकम-( संस्कृत महाकाव्य)

परांजपे कृ.भा.. शत जन्म शोधिताना

पेठे, मंगला कृ. १९८४. सावरकर गौरव गान

फडके, य.दि. १९८४. शोध सावरकरांचा, श्रीविद्या प्रकाशन, पुणे

बखले पंडित (संपादक) १९६०. मृत्युंजय सावरकर

बर्वे, शंकर नारायण १९४७. स्वातंत्र्यवीर (बॅ.सावरकर यांच्या चरित्रातील काही पद्यमय प्रसंग), विष्णू सि. चितळे, पुणे

बोडस, आनंद ज. २००७. सावरकरांची तिसरी जन्मठेप, मनोरमा प्रकाशन, मुंबई

भट, रा.स. १९७२. सावरकरांचे जीवनदर्शन , वोरा अँड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि., मुंबई

भागवत, अ.गो. (अनुवाद) १९४७. बॅरिस्टर सावरकर चरित्र अ.गो. भागवत, बडोदा

भालेराव, सुधाकर सोवनी १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंथन , प्रमोद प्रकाशन, नागपूर

भावे, पु.भा. १९८२. सावरकर नावाची ज्योत, सन पब्लिकेशन्स, पुणे

भिडे, ग.र. १९४२. सावरकरांची सूत्रे, कोल्हापूर

भिडे, गोविंद १९७३. सागरा प्राण तळमळलाः स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्दरूप

 (वर्ष?). जीवनदर्शन । जोशी ब्रदर्स बुकसेलर्स अँड पब्लिशर्स, पुणे

भोपे, रघुनाथ गणेश १९३८. स्वातंत्र्यवीर बॅ.विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनचरित्र । भोपे प्रकाशन, अहमदनगर

मालशे, सखाराम गंगाधर. सावरकरांच्या अप्रसिद्ध कविता

मेहरूणकर, प्रभाकर १९९३. तेजोनिधी सावरकर । मोरया प्रकाशन, डोंबिवली

मोडक, डॉ. अशोक २०१५. वीर सावरकर - विवेकानंदांचे वारसदार

मोने, प्रभाकर २००४. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - एक शिवधनुष्य । परचुरे प्रकाशन

मोरे शेषराव. (सावरकरांसंबंधी) सत्य आणि विपर्यास; सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद (राजहंस प्रकाशन); सावरकरांचे समाजकारण; सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग (राजहंस प्रकाशन)

रानडे, सदाशिव राजाराम १९२४. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर ह्यांचे संक्षिप्त चरित्र । लोकमान्य छापखाना, मुंबई

रायकर, गजानन १९६६. महापुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र

वर्तक, श्रीधर रघुनाथ १९७०. क्रांतदर्शी सावरकर, संग्राहक काळ, प्रकाशन, पुणे

वऱ्हाडपांडे, व.कृ. (संपादक), १९८३. गरुडझेप (सावरकर गौरवग्रंथ), विजय प्रकाशन, नागपूर

वाळिंबे, वि.स. १९६७. स्वातंत्र्यवीर सावरकर, केसरी प्रकाशन, पुणे

१९८३. सावरकर , मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई

शिंदे, वि.म. १९९९. आठवणींची बकुळ फुले | नवचैतन्य प्रकाशन, मुंबई

शिदोरे, प्रभाकर गोविंद १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर | न.पा. साने, मुंबई

साटम, दौलत मुरारी १९७०. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर | साटम प्रकाशन, मुंबई

साठे, डॉ. शुभा. त्या तिघी (कादंबरी)

सावरकर, बाळाराव. सावरकरांचे चारखंडी चरित्र, पुनःप्रकाशन - २६ फेब्रुवारी २०२०. खंडांची नावे १. २. हिंदू महासभा पर्व (१९३७ ते १९४०), ३. ४.सावरकर,  बाळाराव (संकलक)                            १९६९. वीर सावरकर आणि गांधीजी | वीर सावरकर प्रकाशन, मुंबई

१९७२. हिंदुसमाज संरक्षक स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर (रत्‍नागिरी पर्व) | वीर सावरकर प्रकाशन, मुंबई

१९७५. स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु महासभापर्व भाग-१ (जून १९३७ ते डिसेंबर १९४०) । वीर सावरकर प्रकाशन, मुंबई

१९७६. स्वातंत्र्यवीर सावरकर अखंड हिंदुस्थान लढा पर्व

१९९७. योगी योद्धा वि.दा.सावरकर । वीर सावरकर प्रकाशन, मुंबई

(जानेवारी १९४१ ते १५ ऑगस्ट १९४७) वीर सावरकर प्रकाशन, मुंबई

सावरकर, विश्वास विनायक १९८६. आठवणी अंगाराच्या (स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणी) । स्नेहल प्रकाशन, पुणे

सावरकर, शां.शि. १९९२. अथांग (श्री. वि.दा. सावरकर आत्मचरित्र प्रारंभ) | ?,मुंबई

सावरकरांची तिसरी जन्मठेप (डॉ. आनंद जयराम बोडस)

सोनपाटकी, मुकुंद १९८०. दर्यापार | पुरंदरे प्रकाशन, पुणे

सोवनी, म.वि. १९६७. मृत्युंजय सावरकरः चित्रमय चरित्र | चित्रसाधन प्रकाशन, पुणे

हर्षे, द.स. १९६६. सावरकर-दर्शन | द.स. हर्षे प्रकाशन, सातारा

क्षीरसागर, प्रकाश १९८९. तेजोमय दाहक ते । स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर,

श्रीवास्तव, हरीन्द्र, खोत, अनुराधा (अनुवाद) १९९६. एक झंझावात-शत्रूच्या शिबिरात । सावरकर स्मृती केंद्र, बडोदे

१९५७. आत्मवृत्त । व्हीनस प्रकाशन, पुणे

१९५८. सावरकर विविध दर्शन । व्हीनस प्रकाशन, पुणे

१९६२, सावरकर यांच्या आठवणी । अधिकारी प्रकाशन, पुणे

१९६९, महायोगी वीर सावरकर, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई

१९७३, सावरकर आत्मचरित्र (पूर्वपीठिका) ।, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई

१९७२, सावरकर आत्मचरित्र (भगूर) | मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई

१९७८, स्वातंत्र्यवीर सावरकर विषयक वक्ते नि लेखक यांची सूची | स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई

सावरकरांवरील मृ्त्युलेख (आचार्य अत्रे)

ज्वालामुखीचे अग्निनृत्य - वि.श्री. जोशी

शोध सावरकरांचा - य.दि. फडके

क्रांतिकारकांचे कुलपुरुष - आचार्य अत्रे

सावरकरांचे समाजकार्य सत्य आणि विपर्यास - शेषराव मोरे

सावरकरांचा बुद्धिवाद एक चिकित्सक अभ्यास - शेषराव मोरे

रत्‍नागिरी पर्व - आचार्य बाळाराव सावरकर

हिंदुसभा पर्व (खंड १ व २) - आचार्य बाळाराव सावरकर

सांगता पर्व - आचार्य बाळाराव सावरकर

सावरकर चरित्र - धनंजय कीर

सावरकर नावाची ज्योत - पु.भा. भावे

सावरकर चरित्र - शि.ल. करंदीकर

दर्यापार - मुकुंद सोनपाटकी

गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी – शेषराव मोरे

🎭🎞️ *सावरकरांवरील मराठी चित्रपट, नाटके, कार्यक्रम*

अनादि मी अनंत मी (सावरकरांच्या जीवनावर प्रतीकात्मक सांगीतिक नाट्याविष्कार : लेखक-दिग्दर्शक माधव खाडिलकर, संगीत आशा खाडिलकर, कलावंत ओंकार-प्राजक्ता खाडिलकर आणि इतर अनेकजण.)

मी विनायक दामोदर सावरकर (एकपात्री, सादरकर्ते : योगेश सोमण)

यशोयुतां वंदे (संकल्पन/दिग्दर्शन- सारंग कुलकर्णी. संहिता - दीपा सातव सपकाळ)

व्हॉट अबाऊट सावरकर? (चित्रपट, दिग्दर्शक - रूपेश केतकर आणि नितीन गावडे, २०१५)

स्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट, निर्माते सुधीर फडके)

 

         

अशोक कामटे



              *अशोक कामटे*

     (अतिरिक्त पोलीस कमीश्नर, मुंबई)

   *जन्म: २३ फेब्रुवारी १९६५*

           (चांबळी, महाराष्ट्र)

   *मृत्यू : २७ नोव्हेंबर २००८*

          (चौपाटी , मुंबई)


पुरस्कार : अशोक चक्र(२००९)

धर्म : हिंदू

वडील : मारुतीराव


      मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस कमिशनर पैलवान अशोक कामटे यांची आज जयंती . त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1965 रोजी झाला . ते एक कर्तव्य कठोर पोलीस अधिकारी होते आणि त्यांना मुंबईचे रक्षण करताना वीरगती मिळाली . पण फार थोड्या लोकांना माहिती आहे की ते उत्कृष्ट पैलवानही होते . जेथे मुरारबाजीसारखा वाघ छत्रपती शिवरायांना पुरंदरावर मिळाला त्या पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या चांबळी गावचे हे सुपुत्र.


            या गावात कुस्तीची परंपरा आहे. कामटे याचे वडील कर्नत होते व ते कुस्तीच्या खेळातूनच लष्करात भरती झाले होते. तर आजोबा पोलीस अधिकारी होते . अशोक कामटे यानी अनेक नामाकित पैलवानांना अस्मान दाखविले होते . कोडाईकनातव्या इंटरनेशनल स्कूलमधून कामटे याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले , तर पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार महाविद्यालयात झाते . त्याना आतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीही मिळाली होती , मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयातून त्यानी पदवी प्राप्त केली , तर दिल्लीच्या सेंट स्टीफन महाविद्यालयात एमए पूर्ण केले . त्याना कॅम्प रायझिंग सन मधून आतराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली व ते 1992 मध्ये उत्तीर्ण झाले . पेरू येथे झालेल्या ज्युनिअर पॉवर लिफ्टींग स्पर्धेत 1978 मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते .

              अशोक कामटे हे पोलीस दलामध्ये बॉडी बिल्डर म्हणून प्रसिद्ध होते . त्यांनी बंधकांना दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठीचे विशेष प्रशिक्षण घेतले होते . मुंबई हल्ल्याच्या वेळी ते मुंबईच्या पूर्व विभागात ड्युटीवर होते . त्यामुळे त्यांना कामा हॉस्पिटल कारवाईसाठी इमारतींमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. कामटे हे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते . त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून भंडारा , सातारा , ठाणे ग्रामीण येथे काम केले . वर्ष 1999 ते 2000 या कालावधीत युएनमिशन बोस्निया येथे प्रतिनियुक्तीवर होते . वर्ष 2000 मधे डेपुटी कमिशनर पोलीस मुंबई म्हणून नेमणूक झाली . त्यानंतर कोल्हापूर सांगली आणि सोलापूर येथे जिल्हा पोलीस प्रमुख पदावर नेमणूक झाली . त्यांनी वर्ष 2008 मधे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून मुंबई येथे कार्यभार स्वीकारला आणि पाचच महिन्यात 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आले .


त्यांच्या पत्नी विनिता कामटे ( सहलेखिका विनिता देशमुख ) यांनी " टु द लास्ट बुलेट ' या पुस्तकात त्यांच्या आठवणी लिहिल्या आहेत , अखेरचा प्रवास या प्रकरणात अशोक कामटे यांच्या अंतिम यात्रेचे अत्यंत हृदयद्रावक वर्णन केले आहे . विनीता कामटे लिहितात - माझे सासरे तर दुःखाने पूर्ण कोलमडले होते . पण तेही एक लष्करी अधिकारी होते अखेरच्या क्षणी त्यांच्या मनातला सैनिक जागा झाला आणि अखेरची मानवंदना चालू असताना त्यांनीही खाडकन सॅल्यूट ठोकत वीरमरण प्राप्त केलेल्या आपल्या पुत्राला अखेरची सलामी दिली . तो जसा जगला तसच त्याला बघणं मला आवडेल . अशा कर्तव्य दक्ष अशोकास 2009 मध्ये त्यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.


          *जयहिंद* 



बँक ऑफ बडौदा (BOB) ने 4000 पदांवर अप्रेंटिसची भरती

 






नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली बातमी आहे. बँक ऑफ बडौदा (BOB) ने 4000 पदांवर अप्रेंटिसची भरती जाहीर केली आहे. 

बँकाच्या अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in वर अर्ज करण्याची प्रक्रिया 19 फेब्रुवारी 2025 अर्ज सुरू झाली आहे. 


अर्ज भरण्याची प्रक्रिया सूर झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2025 आहे. 

बँक ऑफ बडोदा च्या या भर्तीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी (ग्रॅज्युएशन) संपन्न केलेली असावी.


तसेच, उमेदवारांना NAPS किंवा NATS मध्ये नोंदणी करणे देखील आवश्यक आहे. BOB Apprentice Recruitment 2025 Notification PDF उमेदवार योग्यता संबंधित संपूर्ण माहिती तपासू शकतात.

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विशेष प्रश्नमंजुषा

मराठी राजभाषा दिनानिमित्त विशेष प्रश्नमंजुषा

राणी चेन्नम्मा

 


        🏇 *राणी चेन्नम्मा* 🤺


  *जन्म :  23 आॕक्टोबर 1778*

          *(बेलगाम, कर्नाटक)*


*वीरमरण : 21 फेब्रुवारी 1829*

      *(बैलहोंगल)*


             कित्तूरची राणी चेन्नम्मा दक्षिण भारतातील झाशीची राणी लक्ष्मीबाईच समजली जाते. राणी लक्ष्मीबाई इतकाच तिचा देशाभिमान जाज्ज्वल्य होता. या अत्यंत सुदंरीचा जन्म काकतीय वंशातील देसाई घराण्यात झाला होता. तिच्या वडिलांचे नाव धुलाप्पा देसाई व आईचे नाव पदमावती होते. ती अपरूप सुंदरी असल्यानेच त्या अर्थाचे तिचे नाव चेन्नम्मा असे ठेवण्यात आले. बालपणापासूनच  ती अत्यंत स्वाभिमानी बाणेदार होती. शिक्षणातही तिला अत्यंत रस होता. कन्नड, मराठी, उर्दू व संस्कृत या चार भाषांचे ज्ञान तिने किशोर वयात येण्या आधीच प्राप्त करून घेतले होते. त्याचप्रमाणे घोडेस्वारी व शस्त्रविद्येतही ती प्रवीण झाली होती. कित्तूरचा राजा मल्लराज एकदा शिकारीला गेला असताना त्याने चेन्नम्माला वाघाची शिकार करतना पाहिले. तिचा पराक्रम व रूपलावण्य पाहून त्याने धुलाप्पा देसाई यांच्याकडे चेन्नम्माशी विवाह करण्याची मागणी घातली. मल्लसर्जचा विवाह आधी रुद्रव्वा हिच्याशी झालेला होता. धुल्लाप्पा देसाईना हे स्थळ आवडले व त्यांनी चेन्नम्माचा विवाह मल्लसर्ज राजाशी करून दिला. विवाहानंतर चेन्नम्मा ही बुद्धिमान, विद्वान, चतुर व धोरणी असल्याचे राजा मल्लसर्जांच्या लक्षात आले. तो राज्यकारभाराविषयी चेन्नम्माशी विचारविनिमय करू लागला.

             पुणे - बंगलोर मार्गावर बेळगावपासून पाच मैल अंतरावर कित्तूरनगर व कित्तूरचा किल्ला आहे. राजा मल्लसर्च्या कारकीर्दीत कित्तूर राज्य वैभवसंपन्न होते. राज्यात ७२ किल्ले व ३५८ गावे होती. कित्तूर नगरी व्यापाराचे मोठे केंद्र होती. सोने, चांदी, जड-जवाहीरांचा व्यापार तेथे चालायचा. दूर-दूरचे व्यापारी कित्तूरला यायचे. राज्यातील जमीनही अत्यंत सुपीक असल्याने शेतीचे उत्पन्नही फार मोठे होते. 

            राजा मलसर्ज मोठा वीर, पराक्रमी व मानी होता. प्रजेवर त्याचे अत्यंत प्रेम होते, त्याच्या राज्यात प्रजा सुखासमाधाने व आनंदाने जगत होती. तो विद्याप्रेमी व कलासक्त होता. त्याच्या दरबारी नेहमी मोठमोठे पंडित व कलावंत येत असत. त्यांचा मान तो ठेवीत असे व त्यांना भरघोस बिदागीही देत असे. 

           राजा मल्लसर्जचे आपल्या दोन्ही राण्यांवर प्रेम होते. तो त्यांचा मान ठेवूनच त्यांच्याशी वागायचा . रूद्रव्वा ही धार्मिक वृत्तीची, शांत स्वभावाची व समंजस होती. राणी चेन्नन्मा तिला आपली मोठी बहीणच मानायची. दोन्ही राण्यांनी एक एक पुत्राला जन्म दिला होता. पण चेन्नम्माचा पुत्र बालपणीच वारला. रुद्रव्वाच्या पुत्राचे नाव शिवालिंग रुद्रसर्ज होते. राणी चेन्नमाचे त्याच्यावर पुत्रवत प्रेम होते. 

          राजा मल्लसर्जचा प्रधान गुरुसिद्दप्पा हा मोठा विचारी, धोरणी व राजव्यवहारकुशल होता. आपल्या राज्याचा हिताचा विचार करूनच तो राजाला सल्ला द्यायचा. त्याची सत्तरी उलटून गेली होती. तरीही तो आपल्या राज्याचा काराभार चोखपणे बजवायचा पण मल्लप्पाशेट्टी व वेंकटराय हे दोन्ही मंत्री कारस्थानी होते. मल्लप्पाशेट्टीचा डोळा राज्याच्या प्रधानपदावर होता. गुरुसिद्दप्पा प्रधानपदावरून निवृत्त कधी होतो व त्याचे प्रधानपद आपल्याला केव्हा मिळते, असा विचार त्याच्या मनात सतत घोळत असायचा पण गुरुसिद्दप्पावर कितूरच्या प्रजेची श्रद्धा होती. त्यामुळे हे दोघे मंत्री काहीही करु शकत नव्हते.

             दुसरा बाजीराव पेशवा याने १८०२ साली वसईला इंग्रजांशी तह करून मराठा राज्य इंग्रजांकडे गहाण टाकले व तो इंग्रजांच्या अधीन होऊन कारभार करु लागला. तो अतिशय कामुक व लोभी होता. त्याने जनतेवर अत्याचार करून सरदारांना त्रासवून सोडून संपत्ती गोळा करण्याचे सत्रच सुरु केले होते. आता त्याची नजर कितूरच्या संपन्न राज्याकडे वळली, तो आपले सैन्य घेऊन कृष्णा नदीकाठी यडूर येथे आपली छावणी देऊन राहिला होता. त्याने राजा मल्लसर्ज याला आपल्या भेटीसाठी निरोप पाठविला. त्याप्रमाणे राजा मल्लसर्ज गुरूसिद्दप्पाच्या सल्ल्याने त्याच्या भेटीस गेला. बाजीराव त्याच्यासह पुण्यास गेला व त्याने राजा मल्लसर्ज यालाही पुण्यास नेऊन कैदेत ठेवले. 

          एक आठवडा होऊन गेला तरीही राजा मल्लसर्ज कित्तूरला परत आला नाही. म्हणून राणी चेन्नम्माने गुरसिद्दप्पाला येडूरला पाठविले. गुरुसिद्दप्पा येडूरला पोचला, तेव्हा तेथे पेशव्यांची छावणी नव्हती. त्याला समजले की, बाजीराव मल्लसर्जला घेऊन पुण्यास निघून गेला आहे. गुरुसिद्दप्पा पुण्याला गेला. त्याने बाजीरावाशी बोलणी केली. पेशव्यांना दरवर्षी १ लाख ७५ हजार रूपये खंडणी देण्याच्या अटीवर बाजीरावने राजा मल्लसर्ज याला कैदेतून सोडून गुरुसिद्दप्पा याच्या हवाली केले. त्यावेळी राजा मल्लसर्ज याची प्रकृती अतिशय खंगलेली होती. तो कैदेत असताना  बाजीरावाने त्याचे खूप हाल केले होते व त्याला अन्नातून विषही चारले होते. त्यामुळे राजा मल्लसर्ज अतिशय दुर्बल झाला होता. वास्तविक पाहता मल्लसंर्जाने पेशव्यांविरूद्ध काहीही केलेले नव्हते. पण धनलोभापायी बाजीरावाने हे नीचकर्म केले होते.

             कितूरला आल्यावर मल्लसर्जची तब्येत अधिकच खालावली. त्याचे वय त्यावेळी अवघे ३४ वर्षांचे होते. आता त्याला जगण्याची आशा वाटत नव्हती, त्याने गुरुसिद्दप्पाला बोलावून तसे सांगितले व राज्याचा भार त्याच्यावर व राणी चेन्नम्मावर सोपवून त्याने डोळे मिटले. राज्यातील प्रजा दुःखाने 'हाय हाय' करू लागली. दोन्ही राण्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. गुरुसिद्दप्पाने दोन्ही राण्यांचे सांत्वन केले. राणी चेन्नम्मा हिने रुद्रव्वाचा पुत्र शिवलिंग रूद्रसर्ज याला युवराजपदी बसवून राज्याचा कारभार आपल्या हाती घेतला. गुरुसिद्दप्पाने कठीण प्रसंग ओळखून राणी चेन्नम्माला चांगली साथ दिली. परंतु ११ सप्टेंबर १८२४ साली शिवलिंग रुद्रसर्ज याचे दुर्दैवाने निधन झाले. राजवाड्यावर शोककळा पसरली.

             राणी चेन्नमाने राजाच्या संबंधातील मास्त मरडीगोंडा याच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे नाव 

'गुरूलिंग मल्लसर्ज ' असे ठेवले. मल्लप्पाशेट्टी याच्या दृष्ट बुध्दीला हे मानवले नाही. त्याने धारवाड येथे जाऊन तेथला इंग्रज कलेक्टर थॕकरे यांची भेट घेतली व राणी चेन्नम्माने दत्तक घेणे बेकायदेशीर आहे, असे त्याला सांगितले. कारण आता त्याचा हेतू कित्तूरचे राज्य बळकावण्याचा होता. वास्तविक पाहता दत्तक समारंभाच्या वेळी कित्तूर येथील इंग्रज प्रतिनिधींनाही राणी चेन्नम्मा व गुरुसिद्दप्पा यांनी उपस्थित ठेवले नव्हते. तेव्हा त्यांनी दत्तक घेण्याबद्दल कसलाही आक्षेप घेतला नव्हता. 

          आता थॕकरेच्या मनात कित्तूरचे राज्य बळकावण्याचा विचार घर करून बसला. त्याला माहीत होते की, कित्तुरला अलोट संपत्ती आहे. मल्लप्पा शेट्टी व वेंकटराय हे कित्तूरचे मंत्री त्याला साथ देऊ लागले. या दोघांनी थॕकरे याला सर्व सहाय्य  करण्याचे वचन दिले आणि त्यांनी थॕकरे याला असेही सांगितले की, " जोपर्यंत राणी चेन्नम्मा जिवंत आहे, तो पर्यंत कित्तूरवर कब्जा करणे शक्य नाही." म्हणजे हे दोघे देशद्रोही राणी चेन्नम्माच्या जिवावरच उठले होते, हे यावरून स्पष्टपणे दिसून येते. 

          थॕकरे याने एका पत्रान्वये राणीला कळविले की, '"तुम्ही आमच्या परवानगीशिवाय दत्तक का घेतला ? आम्ही तुमच्या या दत्तकाला परवानगी देणार नाही. असे तुमचा मंत्री मल्लप्पाशेट्टी याने तुम्हाला सांगितले असतांनाही तुम्ही दत्तक घेतला. तो आम्हास मंजूर नाही. तुम्ही राज्याचा कारभार मल्लप्पाशेट्टीकडे सोपवावा." 

            राणीने थॕकरेच्या या पत्राला कवडीइतकीही किंमत दिली नाही, आता युद्ध अटळ आहे, हे तिला व गुरुसिद्दप्पाला कळून चुकले. त्यांनी युद्धाची तयारी सुरु केली. आपल्या राज्यातील जनतेला युद्धासाठी सज्ज राहण्याचे व सैन्यात तरुण वीरांनी सामील होण्याचे आवाहन केले. शेकडो तरूण वीर युद्धासाठी तयार झाले. राणीच्या पाठीशी प्रधान गुरूसिद्दप्पा तसेच रायण्णा, बालण्णा, गजवीर आणि चेन्नबसप्पा असे अनेक वीर उभे  राहिले. राणीने गुरूसिद्दप्पाशी विचार-विनिमय करून थॕकरेला एक पत्र देऊन कळविले

की, "कित्तूर एक स्वतंत्र  राज्य आहे व ते स्वतंत्रच राहील. याची जाणीव ठेवावी. जर तुम्हाला युद्ध करायचे असेल, तर आम्हीही युध्दासाठी तयार आहोत. अशी तुमच्यासारख्यांचे गुलाम होण्यापेक्षा मरण पत्करु, पण शरण जाणार नाही."

     राणीचे हे बाणेदार उत्तर वाचताच थॕकरेच्या तळपायाची आग मस्तकात शिरली आणि त्याने युद्धाची तयारी सुरू केली. आपले सैन्य घेऊन तो कित्तूरच्या किल्ल्याबाहेर येऊन ठाकला. २१ ऑक्टोबर  १८२४ रोजी त्याने राणीला निरोप पाठविला की, "तुम्ही तुमच्या प्रधानांसह आम्हास येऊन भेटावे, 

"राणीने भेटण्यास नकार दिला व किल्ल्याचे सर्व दरवाजे बंद करून प्रत्येक दरवाजावर कडा पहारे बसविले. प्रत्येक बुरुजांवर तोफांची मोर्चेबांधणी केली. राणीची सगळी युद्धाची तयारी व किल्ल्याची सर्व माहिती मल्लप्पाशेट्टी व वेंकटराय यांनी थॕकरेला सांगितली. मल्लप्पा शेट्टीने राणीच्या पाकशाळेच्या प्रमुख बाईला पैशांची लालूच दाखवून आपल्याकडे वळवून घेतले आणि राणीला खिरीतून विष देण्यास सांगितले. राणीला हे आपल्या गुप्तहेरांकरवी आदल्या दिवशीच कळले होते. दुस-या दिवशी राणी जेवायला बसली, तेव्हा तिने त्या बाईचे पानही आपल्यासमोर वाढायला सांगितले व माझ्याबरोबर तू ही जेव, अशी आज्ञा तिला केली. ती बाई लटलटा कापू लागली. तिचा चेहरा पांढराफटक पडला व ती जेवायला नकार देऊ लागली. तेव्हा राणीने आपल्या स्त्री सैनिकांकरवी ती खीर तिला खायला लावली. थोडयाच वेळात तिचे शरीर काळे निळे पडले, तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितले की, ‘मल्लप्पाशेट्टीने मला हे कृत्य  करायला लावले.'

           युद्ध सुरू झाले. दोन्ही बाजूंनी तोफांचा मारा सुरु झाला. बंदुकीच्या गोळीबारांनी आकाश दुमदुमून गेले. कित्तूरचा प्रत्येक सैनिक प्राणपणाने लढत होता. पहिल्या दिवशी इंग्रजांना माघार घ्यावी लागली. इंग्रजाकडचे अनेक युद्धकैदी पकडले गेले. त्यात मल्लप्पा शेट्टी व वेंकटराय हे सुद्धा होते, त्यांना तुरूंगात डांबण्यात येऊन तुरूंगावर विश्वासू सैनिकांचा कडक पहारा बसविला. दुस-या दिवशी पुन्हा युद्ध अधिक जोमाने सुरू झाले. थॕकरेला आपल्या पराभवाची कल्पना येऊ लागली. राणी स्वतः लढत होती. ती जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत आपला विजय होणं अशक्य आहे,  हे त्याने हेरले व अचुक नेम धरून राणीवर बंदुकीने गोळी झाडली. तिच्या अंगरक्षकाने ती गोळी आपल्या छातीवर घेतली व तो धाडकन खाली पडला. हे पाहताच राणीने एकाच गोळीत थॕकरेला त्याच्या घोड्यावरून उडवून लावले. थॕकरे ठार झाल्यावर इंग्रजांच्या सैन्याची दाणादाण  उडाली. अनेक इंग्रज सैनिक कित्तूरच्या वीरांनी कापून काढले. अनेक वाट फुटेल तिकडे पळून गेले .

देशद्रोही मल्लप्पाशेट्टी व वेंकटराय यांना बेड्या घालून राणीने दरबारात आणविले. मंत्री मंडळाच्या सल्ल्यावरुन त्यांना हत्तींच्या पायी तुडविण्यात आले. त्यांच्याबरोबरच स्टिव्हनसन व  इलियट हे दोन इंग्रज अधिकारी पकडले होते." युद्ध पूर्णपणे बंद कराल, तर या दोन्ही अधिका-यांना सोडून देण्यात येईल, असा निरोप राणीने इंग्रजकडे पाठविला. या दोघांना सोडून दिले, तर युद्ध करणार नाही, असे प्रत्युत्तर छावणीतील इंग्रज अधिका-यांनी राणीकडे पाठविले. त्यावर विश्वास ठेवून राणीने त्या दोन्ही इंग्रज कैद्यांना सोडून दिले. इंग्रज हे विश्वासघातकी व शब्दाला न जागणारी जमात आहे, हे राणीला माहित नव्हते.

             कित्तूरच्या पराभवाचे वृत्त समजताच दक्षिण हिंदुस्थानचा कमिशनर चॕपलिन, कॕ.जेम्सन व  कॕ. स्पिलर घोडेस्वारांची मोठी सेना घेऊन ३० नोव्हेंबर १८२४ रोजी कित्तूरच्या किल्ल्यावर चालून आले. त्यांनी किल्ल्याला वेढा दिला. त्याच रात्री कित्तूरचा किल्लेदार शिवबसप्पा कमिशनरला भेटला व त्याने या युद्धात मदत करण्याचे आश्वासन चॕपलिनला दिले. तेव्हा "याच्या मोबदल्यात तुला काय हवे आहे ?" असा प्रश्न चॅपलीनने त्याला केला. शिवबसप्पाने उत्तर दिले, 

"कित्तूरचे राज्य" 'ठिक आहे', असे म्हणून चॅपलीनने त्याला निरोप दिला. शिवबसप्पाने लगेच कित्तूरच्या किल्ल्याचा नकाशा व किल्ल्याची सर्व माहिती चॕपलिनला दिली. व तो परत किल्ल्यात आला. 

            स्टिव्हनसन व इलियट इंग्रज छावणीत परतले. लगेच २ डिसेंबर १८२४ रोजी चॕपलीनने युद्धाची घोषणा केली. कर्नल वॉकर व कर्नल डिकन्स हे आपल्या फौजा घेऊन कित्तूरच्या राज्यात शिरले. आणि कित्तूरच्या आसपासचा प्रदेश त्यांनी आपल्या ताब्यात घेतला. कित्तुरवर इंग्रजांनी चहुबाजुनी हल्ला केला. पहिल्या दिवशी इंग्रजांना माघार घ्यावी लागली. ४ डिसेंबरला इंग्रजांनी कित्तूरच्या तटावर तोफगोळयांचा मारा सातत्याने केला. तटाला भगदाड पडले. राणीकडे १८ पौंडी व ६ पौंडी गोळे फेकणा-या उत्तम तोफा होत्या. पण त्या तोफांतून दारुगोळाच उडेना. गुरुसिद्दप्पांनी तपास केला. किल्लेदार शिवबसप्पाने दारुच्या कोठारातील दारुत बाजरी व शेण मिसळून ठेवले होते. तो  दारुगोळा त्यामुळे निकामा झाला होता.  गुरुसिद्दप्पाने राणीला सल्ला दिला की, 

"आता किल्ला सोडून जाणेच श्रेयस्कर आहे ." पण राणी माघार घ्यायला तयार नव्हती. तरीही स्वामिभक्त गुरुसिद्दपाने तिला किल्ल्याबाहेर पडण्यारा राजी केले. तिलाही ते पटले. त्याच रात्री गुप्तमागनि राणी चेनम्मा, राणी रुद्रव्वा, छोटा राजा, वीरव्वा आणि शिवलिंगव्वा किल्ल्याबाहेर पडले. त्यांना तात्काळ इंग्रज सैन्याने गिरप्तार केले. युद्ध बंद झाले. कित्तूरच्या किल्ल्यावर इंग्रजांचे

युनियन जॅक फडकू लागले. गुरुसिद्दप्पा, सैदनसाहेब पकडले गेले. इंग्रजांनी त्यांना कित्तूरच्या चौकात फाशी दिली.

             राणी चेन्नम्माला व तिच्या राज परिवाराला बैलहोंगलच्या किल्ल्यातील तुरुंगात ठेवण्यात आले. त्या तुरुंगातून कित्तूरवर फडकणारे इंग्रजांचे युनियन जैक पाहून तिच्या अंतःकरणात भयंकर वेदना उठत असत. कित्तूर परतंत्र झाल्याचे भयानक दुःख सहन करीत ती जगायचे म्हणून जगत होती. राज परिवाराचे लोक तिच्या सोबतीला होते. हाच फक्त तिला दिलासा होता. इंग्रजांनी तोही हिरावून घेतला. राणी रुद्रव्वासह सगळया राज परिवाराला कुसुगलच्या तुरुंगात इंग्रजांनी पाठवून दिले. राणी आता बैलहोंगलच्या किल्ल्यात एकटीच कडक पहा-यात होती. एकांतातले जिणे तिला असहय झाले. तेव्हा तिचा वेळ शिवलिंगाची पूजा करण्यातच व्यतीत होऊ लागला. तिने आपला आहारही कमी करुन टाकला. 

          शेवटच्या युद्धात कित्तूरचे स्वामिभक्त वीर रायण्णा व  बालण्णा हे निसटून जंगलात निघून गेले होते. त्यांनी कित्तूर जिंकण्याचा चंग बांधला. कित्तूर राज्यातील गावागावातून तरुण वीर गोळा करुन आपले सैन्य उभारले. सुरपूरच्या व शिवगुत्तीच्या राजांनाही रायण्णाने पटवून दिले की, "कित्तूर इंग्रजांच्या ताब्यात राहिले , तर तुमचे राज्यही इंग्रज बळकावतील. म्हणून तुम्ही आपल्या सैन्यासह या व कित्तूर स्वतंत्र करण्यास मदत करा." त्या राजांनाही ते पटले. आपल्या सैन्यासह ते रायण्णाला येऊन मिळाले. ते सैन्य चार मैलापर्यंत पसरले पाहून इंग्रजच्या पोटात भीतीचा गोळा उठला. त्यांनी काही फितूर मिळविले. त्या फितुरांनी रायण्णा नदीत आंघोळ करीत असतांना त्याला पकडले व इंग्रजांच्या हवाली केले. रायण्णाला धारवाड येथे नेऊन फाशी देण्यात आले. कित्तूरवर चालून आलेल्या सैन्यातही इंग्रजांनी फूट पाडली व तिचा पराभव केला. 

          कित्तूरचा किल्लेदार इंग्रज कमिशनरला मोठया आशेने भेटला व त्याने ठरल्याप्रमाणे कित्तूरच्या राज्याची मागणी चॕपलीनकडे केली. तेव्हा चॕपलीन त्याला म्हणाला, "ठीक आहे. इंग्लंडमध्ये देशद्रोह करणा-यांना जे बक्षीस देण्यात येते, तेच तुम्हांला देऊ" लगेच शिवबसप्पाच्या हातात बेड्या ठोकण्यात आल्या. कित्तूरमध्ये गाढवावरुन त्याची धिंड इंग्रजांनी काढली व नंतर त्याला तोफेच्या तोंडी देण्यात आले.

           रायण्णाला फाशी दिल्याची बातमी राणी चेन्नमाला समजली. ती ऐकताच ती मुर्च्छित झाली. डॉक्टरला बोलावण्यात आले. आधीच तिने अन्नत्याग केला होता. डाॕक्टर म्हणाला,

 "आता हिच्या जगण्याची आशा नाही." थोड्याच वेळात स्वातंत्र्यासाठी तडफणारा राणीचा आत्मा अनंतात निघून गेला. कित्तूरचा प्राणच नाहीसा झाला. ही बातमी राणी रुद्रव्वा, वीरव्वा आणि नवा दत्तकराजा गुरुलिंग मल्लसर्ज यांना कळली. तेव्हा त्यांचा आकांत काय वर्णावा? त्या तिघांनी आपल्या छातीत खंजीर खुपसून घेऊन तुरुंगात प्राणत्याग केला. संपली ! राणी चेन्नम्माच्या स्वातंत्र्य लढण्याची कहाणीची इतिश्री झाली ! त्या थोर क्रांतिकारक राणीला कर्नाटकच काय पण सारा भारत कधीही विसरणार नाही. 

            त्यांच्या सन्मानार्थ २२ ते २४ आॕक्टोबरला कित्तुर येथे दरवर्षी उत्सव साजरा केला जातो. नवी दिल्ली येथिल पार्लमेंट हाऊस मध्ये राणी चेन्नम्मा यांच्या मुर्तीची स्थापना केलेली आहे.

            त्यांचे जीवन नारी शक्तीची प्रतिकच नाही तर प्रेरणास्त्रोत सुध्दा आहे. आपल्या शर्थीनुसार जीवन जगायला कोणतेही मूल्य कमी पडते.


      

न्यायमूर्ती बीआर गवई _ भारत देशाचे 52 वे सरन्यायाधीश

  न्यायमूर्ती बीआर गवई बनले देशाचे ५२ वे सरन्यायाधीश बनले आहेत. 13 मे रोजी भारताचे माजी मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना सेवानिवृत्त झाले. त्यानं...