पद्मश्री पुरस्कार विजेते 2025 भारत सरकार

 पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन...

पद्मश्री पुरस्कार विजेते

1. आद्वैत चरण गदनायक - कला, ओडिशा
2. अच्युत रामचंद्र पालव - कला, महाराष्ट्र
3. अजय व्ही. भट्ट - विज्ञान आणि अभियांत्रिकी, अमेरिका
4. अनिल कुमार बोरो - साहित्य आणि शिक्षण, आसाम
5. अरिजित सिंग - कला, पश्चिम बंगाल
6. अरुंधती भटाचार्य - व्यापार आणि उद्योग, महाराष्ट्र
7. अरुणोदय साहा - साहित्य आणि शिक्षण, त्रिपुरा
8. अरविंद शर्मा - साहित्य आणि शिक्षण, कॅनडा
9. आशोक कुमार महापात्र - वैद्यकीय, ओडिशा

10. अशोक लक्ष्मण सराफ - कला, महाराष्ट्र

11. आशुतोष शर्मा - विज्ञान आणि अभियांत्रिकी, उत्तर प्रदेश

12. अश्विनी भिदे देशपांडे - कला, महाराष्ट्र

13. बैजनाथ महाराज - इतर - आध्यात्म, राजस्थान

14. बॅरी गॉडफ्रे जॉन - कला, दिल्ली

15. बेगम बटूल - कला, राजस्थान

16. भरत गुप्त - कला, दिल्ली

17. भेरूसिंह चौहान - कला, मध्य प्रदेश

18. भीम सिंग भवेश - सामाजिक कार्य, बिहार

19. भीमाव्वा डोडाबालप्पा शिल्लेकीअथारा - कला, कर्नाटका

20. बधेंद्र कुमार जैन - वैद्यकीय, मध्य प्रदेश

21. सी. एस. वैद्यनाथन - सार्वजनिक कार्य, दिल्ली

22. चैत्राम देवचंद पवार - सामाजिक कार्य, महाराष्ट्र

23. चंद्रकांत शेठ (मरणोत्तर) - साहित्य आणि शिक्षण, गुजरात

24. चंद्रकांत सोमपुरा - इतर - वास्तुकला, गुजरात

25. चेतन ई. चित्रणीस - विज्ञान आणि अभियांत्रिकी, फ्रान्स

26. डेव्हिड आर. स्येमलियह - साहित्य आणि शिक्षण, मेघालय

27. दुर्गाचरण रणबीर - कला, ओडिशा

28. फारूक अहमद मीर - कला, जम्मू आणि काश्मीर

29. गणेश्वर शास्त्री द्रविड - साहित्य आणि शिक्षण, उत्तर प्रदेश

30. गीता उपाध्याय - साहित्य आणि शिक्षण, आसाम

31. गोकुलचंद्र दास - कला, पश्चिम बंगाल

32. गुरुवायूर दोराई - कला, तमिळनाडू

33. हरचंदन सिंह भत्ती - कला, मध्य प्रदेश

34. हरीमण शर्मा - इतर - कृषी, हिमाचल प्रदेश

35. हर्जिंदर सिंह श्रीनगर वाले - कला, पंजाब

36. हरविंदर सिंह - क्रीडा, हरियाणा

37. हसन रघु - कला, कर्नाटका

38. हेमंत कुमार - वैद्यकीय, बिहार

39. हृदय नारायण दीक्षित - साहित्य आणि शिक्षण, उत्तर प्रदेश

40. ह्यूग आणि कॉलिन गॅन्टझर (मरणोत्तर) (विभागून) - साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता, उत्तराखंड

41. इनिवलप्पिल मणी विजय - क्रीडा, केरळ

42. जगदीश जोशिला - साहित्य आणि शिक्षण, मध्य प्रदेश

43. जसबिंदर नरुला - कला, महाराष्ट्र

44. जोनास मसेटी - इतर - आध्यात्म, ब्राझील

45. जोयनाचरण बाथारी - कला, आसाम

46. जुमदे योंगम गॅमलिन - सामाजिक कार्य, अरुणाचल प्रदेश

47. के. दामोदरन - इतर - पाककला, तमिळनाडू

48. के.एल कृष्णा - साहित्य आणि शिक्षण, आंध्रप्रदेश

49. कोमणाकुट्टी अम्मा - कला, केरळ

50. किशोर कुणाल (मरणोत्तर) - नागरी सेवा, बिहार

51. एल. हंगथिंग - इतर - कृषी, नागालँड

52. लक्ष्मिपाथी रामासुब्बैयेर - साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता, तमिळनाडू

54. लामा लोबजंग (मरणोत्तर) - इतर - आध्यात्म, लडाख

55. लिबिया लोबो सरदेसाई - सामाजिक कार्य, गोवा

56. एम.डी. श्रीनिवास - विज्ञान आणि अभियांत्रिकी, तमिळनाडू

57. मदुगुला नागफणी शर्मा - कला, आंध्रप्रदेश

58. महाबीर नायक - कला, झारखंड

59. ममता शंकर - कला, पश्चिम बंगाल

60. मंदा कृष्णा मॅडीगा - सार्वजनिक कार्य, तेलंगणा

61. मारुती भुजंगराव चितांपल्ली - साहित्य आणि शिक्षण, महाराष्ट्र

62. मिरियाला अर्पारो (मरणोत्तर) - कला, आंध्रप्रदेश

63. नागेंद्रनाथ रॉय - साहित्य आणि शिक्षण, पश्चिम बंगाल

64. नारायण (भुलाई भाई) (मरणोत्तर) - सार्वजनिक कार्य, उत्तर प्रदेश

65. नरेन गुरूंग - कला, सिक्कीम

66. नीरजा भटला - वैद्यकीय, दिल्ली

67. निर्मला देवी - कला, बिहार

68. नितीन नोहरिया - साहित्य आणि शिक्षण, अमेरिका

69. ओंकारसिंग पाहवा - व्यापार आणि उद्योग, पंजाब

70. पी. दच्चनमूर्ती - कला, पुद्दूचेरी 

71. पंड़ी राम मंडावी - कला, छत्तीसगड

72. परमल लव्हजीभाई नागजीभाई - कला, गुजरात

73. पवन गोएंका - व्यापार आणि उद्योग, पश्चिम बंगाल

74. प्रशांत प्रकाश - व्यापार आणि उद्योग, कर्नाटक

75. प्रतिभा सत्यपथी - साहित्य आणि शिक्षण, ओडिशा

76. पुरसाई कन्नप्पा सांबंदन - कला, तमिळनाडू

77. आर. अश्विन - क्रीडा, तमिळनाडू

78. आर. जी. चंद्रमोगन - व्यापार आणि उद्योग, तमिळनाडू

79. राधा बाहिन भट - सामाजिक कार्य, उत्तराखंड

80. राधाकृष्णन देवसेनापथी - कला, तमिळनाडू

81. रामदर्श मिश्रा - साहित्य आणि शिक्षण, दिल्ली

82. रणेंद्र भानू मजुमदार - कला, महाराष्ट्र

83. रतन कुमार परीमू - कला, गुजरात

84. रेबाकांत महंता - कला, आसाम

85. रंथलाई लालरावना - साहित्य आणि शिक्षण, मिझोराम

86. रिकी ज्ञान केज - कला, कर्नाटका

87. सज्जन भजनका - व्यापार आणि उद्योग, पश्चिम बंगाल

88. सैली होलकर - व्यापार आणि उद्योग, मध्य प्रदेश

89. संत राम देसवाल - साहित्य आणि शिक्षण, हरियाणा

90. सत्यपाल सिंह - क्रीडा, उत्तर प्रदेश

91. सेनी विश्वनाथन - साहित्य आणि शिक्षण, तमिळनाडू

92. सेथुरामन पचनाथन - विज्ञान आणि अभियांत्रिकी, अमेरिका

93. शेखा शैख अली अल-साबाह - वैद्यकीय, कुवेत

94. शीन काफ निझाम (शिव किशन बिस्सा) - साहित्य आणि शिक्षण, राजस्थान

95. श्याम बिहारी अग्रवाल - कला, उत्तर प्रदेश

96. सोणिया नित्यनंद - वैद्यकीय, उत्तर प्रदेश

97. स्टीफन नॅप - साहित्य आणि शिक्षण, अमेरिका

98. शुभाश खेचुलाल शर्मा - इतर - कृषी, महाराष्ट्र

99. सुरेश हरीलाल सोनी - सामाजिक कार्य, गुजरात

100. सुरिंदर कुमार वासल - विज्ञान आणि अभियांत्रिकी, दिल्ली

101. स्वामी प्रदीप्तानंद (कार्तिक महाराज) - इतर - आध्यात्म, पश्चिम बंगाल

102. सयद ऐनुल हसन - साहित्य आणि शिक्षण, उत्तर प्रदेश

103. तेजेंद्र नारायण मजुमदार - कला, पश्चिम बंगाल

104. थियाम सुर्यमुखी देवी - कला, मणिपुर

105. तुषार दुर्गेशभाई शुक्ला - साहित्य आणि शिक्षण, गुजरात

106. वदीराज राघवेंद्रचाऱ्य पंचमुखी - साहित्य आणि शिक्षण, आंध्रप्रदेश

107. वासुदेव कामत - कला, महाराष्ट्र

108. वेलू आसान - कला, तमिळनाडू

109. वेंकप्पा अंबाजी सुगतेकर - कला, कर्नाटका

110. विजय नित्यानंद सुरीश्वरजी महाराज - इतर - आध्यात्म, बिहार

111. विजयालक्ष्मी देशमाने - वैद्यकीय, कर्नाटका

112. विलास डांगरे - वैद्यकीय, महाराष्ट्र

113. विनायक लोणी - सामाजिक कार्य, पश्चिम बंगाल


संत गाडगेबाबा राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा

अनंत कान्हेरे

                    

               *अनंत कान्हेरे*

(भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारी)


     *जन्म : ७ जानेवारी १८९२*

     *फाशी : १९ एप्रिल १९१०*

(ठाणे, महाराष्ट्र, भारत)

चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना : अभिनव भारत

धर्म : हिंदू

प्रभाव : विनायक दामोदर सावरकर

वडील : लक्ष्मण कान्हेरे                     अनंत लक्ष्मण कान्हेरे  हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. ते गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'अभिनव भारत' या क्रांतिकारक संघटनेचे सदस्य होते. नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदीराम बोस यांच्यानंतरचे सर्वांत तरुण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले.

 👦🏻 *पूर्वायुष्य*

अनंत कान्हेरे यांचा जन्म रत्‍नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील आयनी मेटे या गावात १८९२ मध्ये झाला. त्यांना दोन बहिणी आणि दोन भाऊ होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण इंदूर येथे तर माध्यमिक शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे झाले. त्यांच्या मोठ्या भावाचे नाव गणपतराव आणि धाकट्या भावाचे नाव शंकरराव होते.


💥 *क्रांतीकार्य*

कान्हेरे १९०३ मध्ये आपल्या काकांकडे पुढील शिक्षणासाठी औरंगाबादला गेले. त्यांचे भाऊ गणपतराव बार्शी येथे राहत होते. त्यांच्याकडे काही काळ राहून १९०८ मध्ये ते पुन्हा औरंगाबादला परत गेले. तेव्हा ते गंगाराम रुपचंद श्रॉफ यांच्या घरात भाड्याने राहत असत. गंगाराम यांचा येवल्यात टोणपे नावाचा एक मित्र होता. त्या काळात अनेक गुप्त क्रांतिकारी संस्था कार्यरत होत्या. नाशिकमधील एका गुप्त संस्थेचा टोणपे हे सदस्य होते. गणू वैद्य आणि गंगाराम एकदा नाशिकमधील गुप्त क्रांतिकारी संस्थेसाठी शस्त्रे खरेदी करण्यासाठी केले होते. या वैद्यांशी कान्हेरे यांची ओळख झाली. नंतर कान्हेरे यांनी त्या दिवसातील मैत्रीबद्दल ‘मित्र प्रेम’ नावाची कादंबरी लिहिली. कान्हेरे क्रांतिकारी गटांच्या कार्याकडे आकर्षित झाले. सावरकर बंधूनी नाशिक येथे अभिनव भारत संस्थेची स्थापना केली होती. कृष्णाजी गोपाळ कर्वे यांनी बाबाराव सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली अशाच एका गुप्त गटाची स्थापना केली होती. या संस्थेचे दुसरे सदस्य विनायक नारायण देशपांडे होते. सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले. त्याला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे अशा समवयस्क साथीदारांची जोड मिळाली.


जॅक्सनची मुंबई येथे वरच्या पदावर बदली करण्यात आली. त्याला नाशिक येथेच मारणे जास्त सोपे होते. २१ डिसेंबर १९०९ या दिवशी नाशकातल्या विजयानंद थिएटरमध्ये 'शारदा' या नाटकाचा प्रयोग जॅक्सनच्या निरोप समारंभासाठी ठरला होता. जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने या प्रयोगास येणार होताच. नाटकाचा प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली, सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न होत असताना अनंत कान्हेरे ह्यांनी जॅक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच ठार झाला. अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभे राहिले, त्यांना अटक करण्यात आली. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. २० मार्च इ.स. १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. १९ एप्रिल १९१० या दिवशी तिघांनाही ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आले.


ठाण्याच्या तुरुंगात अनंत कान्हेरे यांचे स्मारक आहे. नाशिकमध्ये 'अनंत कान्हेरे' नावाचे क्रिकेटचे मैदान आहे.                                                                                               

         

राजर्षी शाहू महाराज विशेष प्रश्नमंजुषा

भूगोल दिनानिमित्त विशेष प्रश्नमंजुषा

SSC results 2024-25

    SSC (दहावीचा) निकाल उद्या १३ मे, २०२५ रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे..* खालील वेबसाईटवर निकाल पाहावा   मंडळामार्फ...