सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे 2

 १) कोणत्या तेलबियाला 'गरीब माणसाचे बदाम' असे म्हणतात ?

शेंगदाणे

२) अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?

प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम

३) नुकतीच झालेली ५ कसोटी सामन्यांची 'बॉर्डर - गावस्कर चषक' ऑस्ट्रेलियाने किती फरकाने जिंकली ?

3-1


4) महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केव्हा केली ?

सन 1863

5)37 वे महाराष्ट्र पक्षिमित्र सम्मेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे ?

शेवगाव, जि. अहिल्यानगर

6) राष्ट्रीय पक्षी दिवस केव्हा साजरा केला जातो ?

5 जानेवारी


7) कोणते वर्ष हे भारताचे हवामानाच्या इतिहासात १९०१ नंतरचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे ?

2024

8) कोणता धातू विजेचा सर्वश्रेष्ठ सुवाहक आहे ?

कॉपर (तांबे)


9) महाराष्ट्राच्या नेमबाजी प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे ?

द्रोणाचार्य पुरस्कार

10) कोणत्या देशाने बाल्ड ईगल या पक्ष्याला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले आहे ?

अमेरिका

11)भारतात होणाऱ्या पहिल्या खोखो वर्ल्ड कपसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?

सलमान खान

12) महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री कोण आहेत ?

दादाजी भुसे 2024

13) सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले 'बॉर्डर सोलर व्हीलेज' कोणते ?

मसाली, जि.बनासकांठा, गुजरात

14)भारतात पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती कोणत्या ठिकाणी झाली ?

वाराणसी


 15)क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील चौथ्या क्रमांकाचा खंड कोणता ?

दक्षिण अमेरिका


सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे 1

 महत्त्वपूर्ण सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे


०१) प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान किती सभा होणे बंधनकारक आहे ?

- किमान सहा.


०२) आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती ?

- औरंगजेब.


०३) मानवी शरीरातील सर्वांत मोठे हाड कोणते आहे ?

- मांडीचे हाड.( फिमर )


०४) कोणत्या मंत्रालयात विज्ञान ज्योती कार्यक्रमाची सुरूवात केली ?

- विज्ञान व तंत्रज्ञान विभाग.


०५) कोणत्या दिवशी भारतात राष्ट्रीय उत्पादकता दिन म्हणून साजरा करतात ?

- १२ फेब्रुवारी.



०६) सिंगापूर या देशाचे राष्ट्रीय फूल कोणते ?

- ऑर्किड.


०७) 'महाराष्ट्र एक्सप्रेस' कोणत्या दोन स्टेशन दरम्यान धावते ?

- गोंदिया - कोल्हापूर.


०८) भारतातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता आहे ?

- परमवीर चक्र.


०९) कोणत्या राज्यात सर्वांधिक सहकारी साखर कारखाने आहेत ?

- महाराष्ट्र.


१०) ग्रामसभेची तरतूद महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कोणत्या कलमात दिली आहे ?

- कलम ६.



११) चीन या देशाचे राष्ट्रीय फूल कोणते ?

- ब्लॉसम.


१२) मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ?

- परभणी.


१३) लोकायुक्ताची नेमणूक कोण करतात ?

- राज्यपाल.


१४) कोणास भारताची सुवर्ण कन्या असे म्हणतात ?

- पी.टी.उषा.


१५) ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते ?

- ७ ते १७.


१६) भारत या देशाचे राष्ट्रीय फूल कोणते ?

- कमळ.


१७) कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे ?

- महाबळेश्वर.


१८) अजिंक्यतारा हा प्रसिद्घ किल्ला कोठे आहे ?

- सातारा.


१९) बँक्टेरियालॉजी कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहे ?

- जीवाणू.


२०) ग्रामपंचायतीच्या मतदार संघाला काय म्हणतात ?

- वार्ड.




क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा फुले प्रश्नमंजुषा

 *सामाजिक प्रश्नमंजुषा*


 प्र.१. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आई व वडिलांचे नांव काय होते ?

 उत्तर - चिमनाबाई व गोविंदराव

 प्रश्न २.  महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या दत्तक पुत्राचे नांव काय होते ?

 उत्तर - यशवंत 

 प्रश्न 3.  यशवंत कुणाचा मुलगा होता ?

 उत्तर - विधवा ब्राम्हण काशीबाई चा 

 Q.4.  सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोठे झाला ?

 उत्तर - नायगांव खंडाळा तालुका जिल्हा सातारा

 Q.5.  महात्मा फुले यांचा जन्म कोठे झाला?

 उत्तर - कटगुण सातारा जिल्हा

 प्र.६.  महात्मा फुले यांच्या जिवनावर कोणत्या विचारवंताच्या पुस्तकाचा प्रभाव पडला ?

 उत्तर - थॉमस पेन 

 प्र.७.  महात्मा फुले यांच्या मावस बहिणीचे नांव काय होते?

 उत्तर - सगुणाबाई क्षीरसागर

 प्र.८.  महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या लग्नाच्या वेळेस त्यांचे वय किती होते ?

 उत्तर - 13 व 9 वर्ष 

 प्र.९. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे लग्न कोणत्या तिथीला व इ.स. मध्ये झाले ?

 उत्तर - फाल्गुन वद्य पाच शके १७६२ इ.सन १८४० मध्ये झाले.

 प्र.१०.  सावित्रीबाई फुले यांच्या वडीलाचे नांव काय होते ?

 उत्तर - खंडोजी नेवासे पाटील

 प्र.११.  महात्मा फुले यांचे पूर्वीचे आडनाव काय होते होते ?

 उत्तर - गोर्‍हे

 प्र.१२.  गोविंदराव फुले यांच्या वडीलाचे नांव काय होते ?

 उत्तर - शेटीबा 

 प्र.१३.  शेट्टीबा यांना किती मुले होती ? नांव काय ?

 उत्तर - तीन मुले होती.१) कृष्णाजी गोरे २)राणोजी  गोरे ३) गोविंद गोरे 

 प्र.१४.  शिटीबा यांच्या वडीलाचे नांव काय होते ?

 उत्तर - कोंडाजी 


 प्र.१५. कोंडाजी च्या वडीलाचे नांव काय होते ?

 उत्तर - रानोजी

 प्र.१६. राणोजी च्या वडिलांचे नांव काय होते ?

 उत्तर - बुधोजी 

 प्र.१७.  बुधोजी यांना कोणत्या आडनावाने ओळखले जात होते ?

 उत्तर - चौगुले

 प्र.१८.  गोविंदराव यांचे आडनाव फुले का झाले ?

  उत्तर -  पुणे शहरात शेटीबा फुलांचा व्यवसाय करू लागल्यामुळे त्यांचे आडनाव फुले  झाले.

 प्र.१९.  गोविंदराव फुले यांना किती मुले होती ? नांव काय ?

 उत्तर - तीन मुले होती. १) राजाराम २)धोंडीबा ३)ज्योतिबा 

 प्र.२०.  गोविंदराव यांनी कोणाच्या सांगण्यावरून ज्योतिबा फुले यांना शाळेतून काढले ?

 उत्तर- कृष्ण देव

 प्र.२१.  कोणाच्या सांगण्यावरून गोविंदरावानी जोतिबानां परत शाळेत घातले ?

 उत्तर -  मुस्लीम मित्र मुंशी गफार बेग व मेजर लिजिंट

 प्र.२२.- महात्मा फुले यांचा जन्म केंव्हा झाला ?

 उत्तर - 11 एप्रिल 1827 

 प्र.२३. महात्मा फुले यांचा मृत्यू केंव्हा झाला ?

 उत्तर - 28 नोव्हेंबर 1890 

 प्र.२४.  सावित्रीबाई फुले यांचा जन्म केंव्हा झाला ?

 उत्तर - 3 जानेवारी 1831

 प्र.२५. सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू केव्हा झाला ?

 उत्तर - 10 मार्च 1897

 प्र.२६.  सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कशामुळे झाला?

 उत्तर: प्लेग या साथीच्या रोगाने

 प्र.२७. महात्मा फुले यानां कोणाच्या लग्नात सनातन्याकडून अपमानीत करण्यात झाले होते ?

 उत्तर - परम ब्राम्हण मित्र सखाराम हरी परांजपे

 प्र.2८.  महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी अस्पृश्यानां पाण्यासाठी आपल्या घरातील विहीर  खुली केली ?

 उत्तर- इसवी सन 1849

 प्र.३०. महात्मा  फुले यांनी विधवा महिला आश्रमची स्थापना केंव्हा केली ?

 उत्तर - इसवी सन 1871

 प्र.३१ सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण क्षेत्रातील महिला सहकारी कोण ?

 उत्तर - फातिमा शेख

 प्र.३२.  महात्मा फुले यांचे शस्त्र विद्येतील गुरु कोण होते?

 उत्तर- अद्यक्रांतीगुरु वस्ताद लहुजी साळवे

 प्र.३३.  महात्मा फुले यांना 'महात्मा' ही पदवी समाजाने कोणत्या वर्षी दिली?

 उत्तर - 11 मे 1888

 प्र.३४.  महात्मा फुले यांनी आपला वसीयत नामा केंव्हा लिहिला ?

 उत्तर - 10 जुलै 1871


 प्र.35.  फुले दांपत्ये यांनी आपल्याच शाळेत शिकलेल्या कोणत्या दोन विद्यार्थ्यांना शिक्षक केले ?

 उत्तरः धुराजी आप्पाजी चांभार व रानबा महार

 प्रश्न.36. महात्मा फुले यांनी कोणास ब्राह्मणेत्तरातील  पंडित बनवले होते ?

 उत्तर - धोंडिराम कुंभार

 प्र.३७.  महात्मा फुले यांच्या मावस बहीण सगुनाबाई क्षीरसागर यांचे निधन केंव्हा व कशामुळे झाले ?

 उत्तर - 6 जुलै 1854 कॉलरा साथीचा रोगामुळे

 प्र.३८.  महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक सगुणाबाईला त्यांच्या मृत्यू पश्चात अर्पण केले ?

 उत्तर - "निर्मिकाचा शोध" हे पुस्तक..

 प्र.३९. खादीचा पुरस्कार व प्रसार सर्वप्रथम कोणी केला ?

 उत्तर- सावित्रीबाई फुले

 प्र.४०.  महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चितेला अग्नी कोणी दिला ?

 उत्तर - सावित्रीबाई फुले

 प्र.४१.  परक्याच्या मुलास दत्तक पुत्र म्हणून दत्तक घेणारे पहिले दांपत्य कोण ?

 उत्तर - फुले दांपत्य ( महात्मा फुले व सावित्रीबाई फुले)

 Q.42. सत्यशोधक समाजाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण ?

 उत्तर - सावित्रीबाई फुले

 प्र.43. महात्मा फुले यांच्या जीवनावर कोणत्या पुस्तकाचा प्रभाव पडला ?

 उत्तर - थाॅमस पेन यांचे "राईटस आॅफ द मेन"

 Q.44.   मि.& मिसेस मिचेल यांच्या पहिले अध्यापक प्रशिक्षण केंद्र  व सावित्रीबाई यानी चालवलेल्या"नॉर्मल स्कूल" मधून पहिल्या शिक्षिका होण्याचा मान कोणास जातो ?

  उत्तर - उस्मान शेख यांची बहीण फातिमा शेख

 प्र.४५.  दीडशे- पावनेदोन वर्षांपूर्वी पुणे व परिसरातील 18 शाळांचे संचलन करणाऱ्या पहिल्या शिक्षणतज्ञ पहिल्या मुख्याधिपिका ?

उत्तर - सावित्रीबाई फुले

 प्र.46. देशातील नव्हे आशिया खंडातील पहिली मुंलीची शाळा काढणारे दाम्पत्य  ?

उत्तर- फुले दांपत्य  1 जाने. 1848

 प्र.४७.   सावित्रीबाई फुले यांना किती भाऊ होते व भावांचे नांव काय ?

 उत्तर - 3 भाऊ १) सदूजी २) सखाराम ३) श्रीपती

 प्र.४८.   सावित्रीबाई फुले यांचे वडील खंडोजी नेवासे पाटील यांच्याकडे कारभाराच्या दृष्टीने कोणते महत्त्वाचे पद होते ?

 उत्तर- इनामदार व नायगांवचे पाटील

 प्र.49.  महात्मा फुले यांनी विधवां महिलासाठी आश्रमाची स्थापना केव्हा केली ?

 उत्तर – इसवी सन 1871

 प्र.५०- महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या विधवा महिला आश्रमाचे संयोजक कोण होते ?

 उत्तर - सावित्रीबाई फुले

प्र.५१ - महात्मा फुले यांची पहिली पुण्यतिथी कोठे साजरी करण्यात आली व केव्हा ?

उत्तर -  पुणे शहराजवळ ओतूर येथे 1891 मध्ये

प्र.५२ - सावित्रीबाई फुले यांनी ऑगस्ट 1868 मध्ये कोणत्या दोन समाजातील पहिला अंतर जातीय विवाह घडून आणला 

उत्तर - ब्राम्हण समाजाचा गणेश व महार समाजाची सारजा यांचा

प्र.५३- सावित्रीबाई फुले यांनी 1876 -77 च्या भिषन दुष्काळामध्ये कोणत्या अन्नछत्रेची सुरुवात केली ? कोठे?

उत्तर - व्हिक्टोरिया बालकाश्रम अन्नछत्र धनकवडी येथे

प्र. ५४ - फुले दांपत्य यांच्या दत्तक पुत्र डॉक्टर यशवंत यांच्या पहिल्या पत्नीचे नांव काय ?

उत्तर - राधाबाई

प्र. ५५ - डॉक्टर यशवंत यांच्या पहिली पत्नीचे निधन केंव्हा झाले ?

उत्तर -  1895

प्र.५६ - फुले दांपत्य डॉक्टर यशवंत यांच्या दुसऱ्या पत्नीचे  व मुलीचे नांव काय ?

उत्तर - दुसरी पत्नी- चंद्रभागाबाई

          मुलागी - लक्ष्मी उर्फ सोनी

प्र.५७ -डॉक्टर यशवंत यांची  मुलगी "लक्ष्मी"चा विवाह कोणाशी झाला ?

उत्तर - गंगाराम होले यांचे चिरंजीव बाळू यांच्याशी

प्र.५८ कामगार नेते तथा मुंबई प्रांताचे सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष नारायण मेघाजी लोखंडे यांचा मृत्यू केंव्हा झाला ?

उत्तर - 9 फेब्रुवारी 1897

प्र.५९ - सावित्रीबाई फुले यांनी "पहिला सत्यशोधकीय विवाह" केंव्हा व कोनामध्ये घडवून आणला ? 

उत्तर - 25 डिसेंबर 1873

       सिताराम अल्हाट व राधाबाई निंबळकर या दोघात..

प्र .६०- सावित्रीबाई फुले यांनी दुसरा सत्यशोधकिय विवाह कधी व कोणाच्या दोघात घडवून आनला ?

उत्तर - 7 मे 1874 मध्ये..

    ज्ञानोबा ससाने व काशीबाई शिंदे

प्र.६१ -  फुले दांपत्ये यांनी काशीबाईचा मुलगा यशवंत यास दत्तक घेण्यापूर्वी  अगोदर कोणास दत्तक घेतले होते ?

उत्तर - शांताराम यास..

        पण तो 5-6 वर्षच जगला..

प्र. ६२- महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये स्वतंत्र ग्रंथालयाची स्थापना केव्हा केली  ?

उत्तर -  17 सप्टे. 1882

प्र.६३- महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या "स्वतंत्र ग्रंथालय" ला आज कोणत्या नावाने ओळखले जाते ?

उत्तर - पुणे लायब्ररी  

प्र.६४- सावित्रीबाई फुले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार केव्हा मिळाला ?

उत्तर - 16-11-1852 रोजी

प्र.६५- इंग्रज सरकारने फुले दांपत्य यांचा जाहीर सत्कार केव्हा केला ?

उत्तर - 16 सप्टे. 1852 रोजी



भारतातील 18 रेल्वे विभागांची यादी

 भारतातील 18 रेल्वे विभागांची यादी:


1. मध्य रेल्वे  

   - स्थापना: 1951  

   - मुख्यालय: मुंबई सेंट्रल


2. पश्चिम रेल्वे  

   - स्थापना: 1951  

   - मुख्यालय: मुंबई - चर्चगेट


3. दक्षिण रेल्वे  

   - स्थापना: 1951  

   - मुख्यालय: चेन्नई


4. पूर्व रेल्वे  

   - स्थापना: 1952  

   - मुख्यालय: कोलकाता


5. उत्तर रेल्वे  

   - स्थापना: 1952  

   - मुख्यालय: नवी दिल्ली


6. उत्तर-पूर्व रेल्वे  

   - स्थापना: 1952  

   - मुख्यालय: गोरखपूर (उत्तर प्रदेश)


7. दक्षिण - पूर्व रेल्वे  

   - स्थापना: 1955  

   - मुख्यालय: कोलकाता


8. उत्तर-पूर्व सीमांत रेल्वे  

   - स्थापना: 1950  

   - मुख्यालय: मालेगाव (आसाम)


9. दक्षिण-मध्य रेल्वे  

   - स्थापना: 1966  

   - मुख्यालय: सिकंदराबाद (तेलंगणा)


10. पूर्व-मध्य रेल्वे  

    - स्थापना: 2002  

    - मुख्यालय: हाजीपूर (बिहार)


11. उत्तर-पश्चिम रेल्वे  

    - स्थापना: 2002  

    - मुख्यालय: जयपूर (राजस्थान)


12. पूर्वतटीय रेल्वे  

    - स्थापना: 2003  

    - मुख्यालय: भुवनेश्वर (ओडिशा)


13. उत्तर-मध्य रेल्वे  

    - स्थापना: 2003  

    - मुख्यालय: अलाहाबाद (उत्तर प्रदेश)


14. दक्षिणपूर्व-मध्य रेल्वे  

    - स्थापना: 2003  

    - मुख्यालय: बिलासपूर (छत्तीसगड)


15. दक्षिण-पश्चिम रेल्वे  

    - स्थापना: 2003  

    - मुख्यालय: हुबळी (कर्नाटक)


16. पश्चिम-मध्य रेल्वे  

    - स्थापना: 2003  

    - मुख्यालय: जबलपूर (मध्य प्रदेश)


17. कोलकाता मेट्रो रेल्वे  

    - स्थापना: 2010  

    - मुख्यालय: कोलकाता


18. दक्षिण किनारपट्टी रेल्वे  

    - स्थापना: 27 फेब्रुवारी, 2019  

    - मुख्यालय: विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश)

अर्जुन पुरस्कार खेलरत्न पुरस्कार 2024

 अर्जुन पुरस्कार कोणाला मिळाला ते पहा


1. ज्योती याराजी (ॲथलेटिक्स)

2. अन्नू राणी (ॲथलेटिक्स)

3. नीतू (बॉक्सिंग)

4. स्वीटी (बॉक्सिंग)

5. वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)

६. सलीमा टेटे (हॉकी)

7. अभिषेक (हॉकी)

8. संजय (हॉकी)

९. जर्मनप्रीत सिंग (हॉकी)

१०. सुखजित सिंग (हॉकी)

11. राकेश कुमार (पॅरा तिरंदाजी)

१२. प्रीती पाल (पॅरा ॲथलेटिक्स)

13. जीवनजी दीप्ती (पॅरा ॲथलेटिक्स)

14. अजित सिंग (पॅरा ॲथलेटिक्स)

15. सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा ॲथलेटिक्स)

१६. धरमबीर (पॅरा ॲथलेटिक्स)

17. प्रणव सुरमा (पॅरा ॲथलेटिक्स)

18. एच होकातो सेमा (पॅरा ॲथलेटिक्स)

19. सिमरन जी (पॅरा ॲथलेटिक्स)

20. नवदीप (पॅरा ॲथलेटिक्स)

२१. नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन)

22. तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)

23. नित्य श्री सुमती सिवन (पॅरा बॅडमिंटन)

24. मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)

२५. कपिल परमार (पॅरा ज्युदो)

२६. मोना अग्रवाल (पॅरा नेमबाजी)

२७. रुबिना फ्रान्सिस (पॅरा नेमबाजी)

28. स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)

29. सरबज्योत सिंग (शूटिंग)

30. अभय सिंग (स्क्वॉश)

31. साजन प्रकाश (पोहणे)

32. अमन (कुस्ती)


क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार (आजीवन)

1. सुचा सिंग (ॲथलेटिक्स)

2. मुरलीकांत राजाराम पेटकर (पॅरा-स्विमिंग)


द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी)

1. सुभाष राणा (पॅरा-शूटिंग)

2. दीपाली देशपांडे (शूटिंग)

3.

 संदीप सांगवान (हॉकी)


1. डी गुकेश (बुद्धिबळ)

2. हरमनप्रीत सिंग (हॉकी)

3. प्रवीण कुमार (पॅरा ॲथलेटिक्स)

४. मनू भाकर (शूटिंग)


'खेलरत्न' मिळालेले ते चार खेळाडू


मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये प्रथम पोडियमवर स्थान मिळवले आणि त्यानंतर सरबज्योत सिंगसह 10 मीटर मिश्र सांघिक स्पर्धेत दुसरे कांस्यपदक जिंकले. अशाप्रकारे, क्रीडा महाकुंभाच्या एकाच मोसमात दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

डी गुकेश हा बुद्धिबळाच्या इतिहासातील ज्जेता

डी गुकेश हा बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला. 2024 मध्ये, चेन्नईच्या 18 वर्षांच्या गुकेशच्या रूपाने एक नवीन आदर्श समोर आला आहे. सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून तो जगज्जेता बनला. 14व्या फेरीच्या विजेतेपदाच्या सामन्याआधीही, गुकेश हा प्रबळ दावेदार मानला जात होता, त्यामुळे दबाव निर्माण होणे निश्चितच होते. गुकेशने तिसऱ्या, 11व्या आणि 14व्या फेरीत विजय नोंदवून विश्वविजेतेपदावर ना

व कोरले.

ऑलिम्पिकमध्ये हरमनप्रीत सिंगच्या संघाची शानदार कामगिरी


पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून, हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने हे सिद्ध केले की टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले कांस्यपदक कोणतेही फ्ल्यूक नव्हते, ज्याच्या जोरावर तिला FIH सर्वोत्तम पुरस्कार मिळाला. तिसऱ्यांदा पुरुष खेळाडूचा पुरस्कारही मिळाला. प्रवीण कुमार हा उत्तर प्रदेशचा आहे. प्रवीणने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी-T64 स्पर्धेत आशियाई विक्रम मोडून सुवर्णपदक जिंकले

.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने विविध पदांसाठी भरती जाहीर..

  इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनि...