मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

भारतरत्न इंदिरा गांधी

 

        *भारतरत्न इंदिरा गांधी*

  (५ वी व ८ वी भारतीय पंतप्रधान)

     *जन्म : १९ नोव्हेंबर १९१७*

            (मुघलसराई)

   *मृत्यू : ३१ ऑक्टोबर  १९८४*

        ( नवी दिल्ली, भारत)

          *कार्यकाळ*

जानेवारी १५ इ.स. १९८० – ऑक्टोबर ३१ इ.स. १९८४


              *राष्ट्रपती*

नीलम संजीव रेड्डी

झैल सिंग

मागील : चौधरी चरण सिंग

पुढील : राजीव गांधी


               *कार्यकाळ*

जानेवारी १९ इ.स. १९६६ – मार्च २४ इ.स. १९७७


                *राष्ट्रपती*

सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन, वराहगिरी वेंकट गिरी, मोहम्मद हिदायत उल्लाह, वराहगिरी वेंकट गिरी आणि फक्रुद्दीन अली अहमद

मागील : गुलजारी लाल नंदा

पुढील : मोरारजी देसाई


*भारतीय परराष्ट्रमंत्री कार्यकाळ*

मार्च ९ इ.स. १९८४ – ऑक्टोबर ३१ इ.स. १९८४

मागील : पी.व्ही. नरसिंहराव

पुढील : राजीव गांधी


            *कार्यकाळ*

ऑगस्ट २१ इ.स. १९६७ – मार्च १४ इ.स. १९६९

मागील : एम.सी. छगला

पुढील : दिनेश सिंह


*भारतीय अर्थमंत्री कार्यकाळ*

जून २६ इ.स. १९७० – एप्रिल २९ इ.स. १९७१

मागील : मोरारजी देसाई

पुढील : यशवंतराव चव्हाण


राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय 

                      कांग्रेस

पती : फिरोज गांधी

अपत्ये : राजीव गांधी आणि 

             संजय गांधी

निवास : १, सफदरजंग रोड, 

              नवी दिल्ली

धर्म : हिंदू

चिरविश्रांती : शक्तीस्थळ


इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता.


लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या प्राप्तीसाठी त्यांना मोरारजी देसाई यांच्याशी सामना करावा लागला. त्या १९६६ मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या. त्यांनी पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली.


इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या काँग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणी मंत्री म्हणून त्यांनी त्यावेळी कार्य केले. लालबहादुर शास्त्री यांचा ताश्कंद येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानंतर कॉँग्रेस अध्यक्ष कामराज याच्या पाठिंब्याने १८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंत्री म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या.


१९७७ साली त्यानी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८० पर्यंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या. १९८० च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांकडून त्यांची हत्या झाली. इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव फिरोजशहा असे होते.


💁🏻‍♀️ *बालपण*

           जवाहरलाल आणि कमला या नेहरु दाम्पत्याचे इंदिरा गांधी हे एकमेव अपत्य होते. १९ नोव्हेंबर १९१७ ला इंदिराचा जन्म झाला. मुळात नेहरु हे काश्मिरीपंडित होते. इंदिरांचे आजोबा मोतीलाल नेहरु व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते. ते स्वरूप राणी यांसोबत विवाह करून अलाहाबाद येथे स्थायिक झाले. जवाहरलाल नेहरोइओ यांचे शिक्षण इंग्लंड मध्ये झाले, पुढे ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले अतिशय लोकप्रिय, महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधानही बनले. इंदिरा गांधींचे बालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संस्कारांतच झाले. पुढे त्यांनी लहान मुलामुलींची वानरसेना चळवळ सुरू केली. निदर्शने, मोर्चे काढणे, बंदी घातलेल्या गोष्टींची वाहतूक करणे वगैरे गोष्टी ही सेना करीत असे.


इंदिरा गांधी ६ वर्षांच्या असतांना त्यांनी दिल्ली येथे केलेले उपोषण

१९३६ मध्ये इंदिरा गांधी यांच्या आई कमला नेहरू यांचे दीर्घ आजाराने देहावसान झाले. यावेळी इंदिरा गांधींचे वय केवळ १८ होते. त्यांचे शिक्षण सोमरविले कॉलेज, ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे झाले. याच दरम्यान त्या लंडनमधील इंडिया लीगच्या सदस्या झाल्या. १९४० च्या दशकात इंदिरा गांधींनी फुप्फुसाच्या आजारातून बरे होण्यासाठी काही काळ स्वित्झर्लंड मध्ये व्यतीत केला. याच दरम्यान जवाहरलाल यांनी इंदिरा गांधींना लिहलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. युरोपातल्या वास्तव्यादरम्यानच त्यांची ओळख फिरोज गांधी या तरुणाशी झाली. ही ओळख नंतर प्रेमात बदलून अखेर त्या दोघांनी विवाह केला.

 

👫 *फिरोज गांधींसोबत विवाह*

             इंदिरा गांधींनी इतक्यातच लग्न करू नये म्हणत जवाहरलाल नेहरु यांनी त्यास विरोध केला. पण इंदिरा ठाम होत्या व त्यांनी मार्च १९४२ मध्ये विवाह केला. फिरोज गांधींसुद्धा राजकारणात सक्रिय होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे फिरोज व इंदिरा दोघे सदस्य होते. १९४२ च्या लढ्यात भाग घेतला म्हणून दोघांना अटक झाली होती. फिरोज गांधीं हे स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशातून संसदेवर निवडून गेले होते. या दांपत्याला राजीव व संजय अशी दोन मुले झाली. पण त्यानंतर दोघात दुरावा वाढत गेला. दरम्यानच्या काळात फिरोज गांधींना हृदयविकाराचा झटका आला. अखेर १९६० मध्ये फिरोज गांधींचा मृत्यू झाला.


💠 *राजकारणातला प्रवास*


*भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पद*

           १९५९ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीत भाग घेतला आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या.


📺 *माहिती व नभोवाणी मंत्री*

                 जवाहरलाल नेहरूंच्या मृत्युनंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नभोवाणीमंत्री हे पद सांभाळले. याचदरम्यान त्यावेळच्या मद्रास राज्यात हिंदीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते, तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. सरकारी अधिकारी, सामाजिक नेते यांची भेट घेउन राग शांत करण्याचा प्रयत्‍न केला. १९६५ चे भारत-पाक युद्ध या दरम्यान त्या श्रीनगर च्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.


पाकचे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात ताश्कंद येथे पाकिस्तानचे अयुब खान आणि लालबहादुर शास्त्री यात शांती समझोता झाला. पण त्यानंतर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धाच सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून इंदिरा गांधीना पाठिंबा दिला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.


👩‍🦰 *पंतप्रधान* ⚜️

                               इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर लगेच काँग्रेसमध्ये फूट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणून संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची दोन शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून त्यांनी सरकार वाचवले.


जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.


💣 *१९७१ चे भारत पाक युद्घ*

                   १९७१ च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जनतेवर अत्याचाराचे सत्र आरंभले. शेख मुजीबुर रेहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे १ कोटी निर्वासित भारतात आले. त्यांचा भार भारतावर पडत होता तरी पाकिस्तान भारतालाच दूषणे देत होता. दरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेऊन जाळले. अखेर १९७१ च्या डिसेंबर मध्ये भारताने युद्धाची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिली, पण इंदिरा गांधी बधल्या नाहीत.


📝 *इंदिरा गांधी यांचे चरित्रलेखक*

इंदर मल्होत्रा

उषा भगत (इंदिराजी थ्रू माय आईज)

कॅथेरीन फ्रँक (मराठी अनुवाद - लीना सोहोनी)

डॉम मोराईस (मिसेस गांधी)

पी.सी. ॲलेक्झांडर (My years with Indira Gandhi; इंदिरा गांधी अंतिम पर्व)

पुपुल जयकर (Indira Gandhi - Biography, मराठी अनुवाद अशोक जैन)

प्रणय गुप्ते (मूळ इंग्रजीत, मदर इंडिया. मराठी अनुवाद : पंढरीनाथ सावंत, रमेश दिघे)

सागरिका घोष (इंग्रजीत, India's Most Powerful Prime Minister)

 

📕 *इंदिरा गांधी यांच्यावरील अन्य पुस्तके*

               अनोखे मैत्र (अनुवादित, अनुवादक - सुजाता गोडबोले; मूळ इंदिरा गांधीलिखित Letters to an American Friend)

इंदिरा गांधी : एक वादळी पर्व (माधव गोडबोले)

दृष्टिआडच्या इंदिरा गांधी (अनुवादित; अनुवादक - सुजाता गोडबोले; मूळ इंग्रजी The Unseen Indira Gandhi; लेखक - डॉ. के.पी. माथुर)


🔲 *टपालाचे तिकीट*

                        इंदिरा गांधी यांची छबी असलेले पाच रुपये किमतीचे टपालाचे तिकीट होते. सप्टेंबर २०१५ पासून त्याची छपाई बंद करण्यात आली.

                      

         

श्रीमंत थोरले माधवराव पेशवे..


  *श्रीमंत थोरले माधवराव पेशवे*


     *जन्म : १६ फेब्रुवारी १७४५*

     *मृत्यू : १८ नोव्हेंबर १७७२*

       (थेऊर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र)


*अधिकारकाळ*

      जुलै २७, १७६१ - 

                    नोव्हेंबर १८, १७७२


अधिकारारोहण : जुलै २७, १७६१

राजधानी : पुणे

पूर्ण नाव : माधवराव बाळाजी भट 

                      (पेशवे)

पूर्वाधिकारी : नानासाहेब पेशवे

उत्तराधिकारी : नारायणराव पेशवे

वडील : नानासाहेब पेशवे

आई : गोपिकाबाई

पत्नी : रमाबाई

       श्रीमंत थोरले माधवराव पेशवे हे मराठी राज्याचे चौथे पेशवे (पंतप्रधान) होते.


बाळाजी बाजीरावास विश्वासराव, माधवराव,व नारायणराव असे तीन पुत्र होते. विश्वासराव हा पानिपतच्या तिसऱ्या युद्धात पडल्यामुळें माधवरावास पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्या वेळी माधवरावाचें वय अवघे सोळा वर्षांचे असल्यामुळे त्याचा चुलता रघुनाथराव हा कारभार पाहू लागला. वास्तविकपणे माधवराव हा जरी अल्पवयीन होता, तरी तो बुद्धिमान असल्यामुळे त्याने पेशवाईतील घडामोडी मोठया सूक्ष्म रितीने अवलोकन केल्या होत्या. म्हणून राज्यकारभार स्वतः चालविण्याची धमक व बुद्धी ही त्याच्या अंगी होती.


🤺 *शत्रूचा उठाव*

               पानिपत येथे मराठयांचा पुष्कळ नाश होऊन नंतर थोडक्याच अवधीत नानासाहेब मरण पावले, तेव्हा ही संधी मराठ्यांवर स्वारी करण्यास उत्कृष्ट आहे असे पाहून निजामाने लढाई सुरू केली. त्यावेळी राघोबा प्रमुख असल्यामुळे सेनापती राघोबाने राक्षसभुवन येथे निजामाच्या सैन्यास गाठून लढाई दिली. त्यात राघोबाचा पराभव व्हावयाचा परंतु ऐनवेळी माधवरावानें आपल्या तुकडीनिशी निजामाच्या सैन्यावर हल्ला करून जय मिळविला. त्या मुळे निजामाचा उद्देश सिद्धीस न जाऊन त्यास पेशव्यांशी तह करावा लागला. परंतु पुढे राघोबा व माधवराव यांच्यांत वैमनस्य आले, ती संधी साधून निजामाने मराठ्यांकडील बराच मुलूख परत घेतला.

निजामाप्रमाणे हैदरानेहि या संधीचा फायदा घेऊन दक्षिणेत मराठ्यांचा बराच मुलूख हस्तगत केला. तेव्हा इ.स. १७६४ मध्ये राघोबाशी समेट केल्यावर माधवरावाने हैदरवर स्वारी केली. या प्रसंगी हैदरने पेशव्यांचा मोड करण्याकरिता आपल्या सर्व प्रयत्नांची शिकस्त करून पाहिली; पण माधवराव पेशव्यांपुढे त्याचा टिकाव लागेना. म्हणून सावनूर व इतर बराच मुलूख, त्याचप्रमाणे लढाईचे खर्चाबद्दल म्हणून ३२ लक्ष रूपये देऊन त्याने पेशव्यांशी तह केला.

या नंतर इ.स. १७७० मध्ये माधवरावांनी पुनः हैदरवर स्वारी केली.

इ.स. १७६० मध्ये म्हैसूरचा नामधारी राजा चिक्ककृष्णराज मरण पावला. त्याच्या जागी हैदरने त्याचा वडील मुलगा नंदराज यास गादीवर बसविले. परंतु पुढे नंदराज स्वतंत्र होण्याची खटपट करीत आह, असे पाहून हैदरने त्यास बंदीखान्यात टाकले व त्याची मालमत्ता आपणाकडे घेतली. या वर्तनाचा माधवराव पेशव्यांस राग येऊन, त्यांनी निजामांशी दोस्ती करून हैदरवर स्वारी केली. तेव्हा हैदरने मुलूख उजाड करून तलाव फोडून व विहिरीत विष टाकून मराठ्यांस अटकाव करण्याची शिकस्त केली. परंतु मराठे पुढे येऊ लागल्यामुळे निरुपाय होऊन त्याने अप्पाजीराव नावाचा वकील तह करण्याकरिता मराठ्यांकडे पाठविला. त्याने पेशव्यांस २६ लक्ष रुपये लढाईचा खर्च म्हणून् व १४ लक्ष दरसाल खंडणी म्हणून देण्याचे कबूल केल्यावरून पेशव्यांनी हैदरशी तह केला.


🚩 *दिल्लीकडील राजकारण*

                पानिपत येथे मराठ्यांस आलेले अपयश धुवून कढण्याची माधवरावास फार इच्छा होती. पण इ.स. १७६८ पर्यंत राज्य कारभाराची सूत्रे राघोबा याजकडे असल्यामुळे माधवरावास विशेष काही करता आले नाही. तदनंतर राघोबास ठिकाणी बसविल्यावर रामचंद्र गणेश व विसाजी कृष्ण यांजबरोबर ५०,००० फौज देऊन माधवरावाने त्यांची उत्तर हिंदुस्थानांत रवानगी केली. तिकडे शिंदे, होळकरांचे सैन्य त्यास मिळाले.

मग त्या सर्वांनी मिळून रजपूत व जाट या लोकांकडून राहिलेली खंडणी वसूल केली व पानिपतमध्यें रोहिल्यांनी त्रास दिल्याबद्दल त्यांचा मुलूख लुटून रोहिलखंडातून पुष्कळशी लूट आणली. त्यात पानिपत येथें मराठ्यांनी गमविलेली काही लूट होती. या वेळेच्या मराठ्यांच्या स्वारीने रोहिले लोकांस एवढी दहशत बसली की, मराठे येतात अशी नुसती हूल उठली की, रोहिले पळत सुटत.

या वेळी मराठ्यांनी दुसरेही एक महत्त्वाचे कारस्थान तडीस नेले. त्यांत महादजी शिंदे प्रमुख होते. इ.स. १७५४ मध्ये निजाम उल्मुल्काचा नातू गाझीउद्दीन याने वजिराचे पद बळकावून दुसरा आलमगीर यास तख्तावर बसविले. त्या वेळी आलमगीरचा पुत्र मिर्झा अबदुल्ला हा दिल्लीतून पळून गेला होता. तो शहाआलम या नावाने प्रसिद्ध होता. त्याने इंग्रजांचा आश्रय करून अलाहाबादेस रहाणे केले होते. त्याला या वेळी मराठ्यांनी दिल्लीस आणून तख्तावर बसविले.


🌀 *त्यावेळच्या किरकोळ संस्मरणीय गोष्टी*

                       इ.स. १७६५ मध्ये मल्हारराव होळकर मरण पावले. तेव्हा त्यांची सून अहिल्याबाई होळकर ह्या जहागिरीची व्यवस्था पाहू लागल्या. त्यांचा कारभार प्रजेस अत्यंत सुखदायक झाल्यामुळे त्यांचे नाव उत्तर हिंदुस्थानात सर्वांच्या तोंडी होते. दुसरी गोष्ट म्हणजे महादजी शिंद्यांची दौलतीवर नेमणूक होणे ही गोष्ट होय. तिसरी संस्मरणीय गोष्ट म्हणजे साडेतीन शहाण्यांची प्रसिद्धी. निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर, भोसल्यांचा दिवाण जिवाजीपंत चोरघडे, व पेशव्यांकडील मुत्सद्दी सखाराम बापू हे त्‍या वेळी तीन शहाणे असे समजले जात. तर नाना फडणवीस हा, लढाया न खेळणारा, म्हणून अर्धा शहाणा मानला जाई. जिवा, सखा, विठा, नाना अशी संक्षिप्त रूपे वापरली जात.


🪔 *माधवरावांचा मृत्यू*

                        इ.स. १७७२ मध्ये हैदरवरील स्वारीत असतानाच माधवराव आजारी पडले. पुढे ते दुखणे क्षयावर जाऊन त्यात त्यांचा अंत झाला. मरणसमयी त्यांचे वय अवघे २८ वर्षाचे होते. या वेळी त्यांची पत्नी रमाबाई ही सती गेली. तिचे वृंदावन थेऊर येथे अद्याप आहे. मराठेशाहीतील हा अखेरचा पेशवा निष्कलंक चारित्र्याचा, कर्तबगार पुरुष होता. अकरा वर्षांच्या कारकीर्दीत त्याने पानिपतच्या पराभवानंतर राज्याची पुन्हा उभारणी केली. हैदर अली, निजाम यांसारखे शत्रू आणि रघुनाथरावसारखा चुलता यांना वठणीवर आणून राज्यात शिस्त व कार्यक्षम प्रशासनव्यवस्था निर्माण केली आणि अल्पावधीत मराठ्यांचा दरारा सर्वत्र निर्माण केला. त्याच्या अकाली मृत्यूनंतर मराठी सत्तेच्या ऱ्हासाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला.


📚 *माधवराव पेशव्यांच्या जीवनावरील पुस्तके*

माधवराव पेशवा (बालसाहित्य, लेखक मदन पाटील)

रमा माधव (ऐतिहासिक चित्रपट. दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी)

श्रीमंत थोरले माधवराव पेशवे (सखाराम अच्युत सहस्रबुद्धे)

स्वामी (कादंबरी, रणजित देसाई)

  

       

आचार्य विनोबा भावे..

 

          

           *आचार्य विनोबा भावे*

(अहिंसा आणि मानवाधिकाराचे भारतीय पुरस्कर्ता, भूदान चळवळीचे प्रवर्तक)


पुर्ण नाव : विनायक नरहरी भावे

        *जन्म : ११ सप्टेंबर १८९५*

         (गागोदे, पेण , जि. रायगड)

        *मृत्यू : १५ नोव्हेंबर १९८२*                           (लक्ष्मीपूजन -दिवाळी)

        (पवनार, महाराष्ट्र, भारत)

चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा,

भूदान चळवळ

पुरस्कार : भारतरत्न पुरस्कार (१९८३)

धर्म : हिंदू

प्रभाव : महात्मा गांधी

वडील : नरहर शंभूराव भावे

आई : रखुमाबाई नरहर भावे

                विनायक नरहरी भावे (आचार्य विनोबा भावे नावाने प्रसिद्ध)  हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४० मध्ये 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२ मध्ये 'छोडो भारत' आंदोलनात झाले. भावे पुढे सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले.

💁🏻‍♂️ *सुरुवातीचे जीवन*

(११ सप्टेंबर १८९५ - १५ नोव्हेंबर १९८२). थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक. कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तहसिलातील गागोदे या गावी विनोबा तथा विनायक नरहर भावे यांचा जन्‍म झाला. आजोबांचे नाव शंभुराव भावे. शंभुराव भावे यांचे जन्मगाव वाई. त्यांच्या अनेक पिढ्यांचे वास्तव्य वाई येथे होते. वाईच्या ब्राम्हणशाही या मोहल्ल्यात कोटेश्वर मंदिर आहे. हे भावे यांच्या मालकीचे असून तेथे शंभुरावांनी अग्‍निहोत्र स्वीकारून अग्‍निहोत्र शाळा स्थापली होती. आजोबा आणि मातुश्रींपासून धर्मपरायणतेचे संस्कार विनोबांना मिळाले. त्यांचे वडील नरहरी शंभुराव भावे व आई रखुमाबाई. वडील नोकरीच्या निमित्ताने बडोदे येथे गेले. विनोबांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले. १९१६ साली महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईस जाण्यास निघाले; परंतु वाटेतच सुरतेस उतरून आईवडिलांना न कळविताच वाराणसी येथे रवाना झाले. त्यांना दोन गोष्टींचे आकर्षण होते. एक हिमालय व दुसरे बंगालचे सशस्त्र क्रांतिकारक, वाराणसी येथे हिंदु विश्वविद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधीचे भाषण झाले. त्याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. हिमालयातील अध्यात्‍म आणि बंगालमधील क्रांती यांच्या दोन्ही प्रेरणा महात्मा गांधीच्या उक्तीत आणि व्यक्तिमत्त्वात त्यांना आढळल्या. त्यांनी महात्मा गांधींशी पत्रव्यवहार केला व गांधींची कोचरब आश्रमात ७ जून १९१६ रोजी भेट घेतली आणि तेथेच त्या सत्याग्रहश्रमात नैष्ठिक ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करून जीवनसाधना सुरू केली. ऑक्टोबर १९१६ रोजी महात्मा गांधींची एक वर्षांची रजा घेऊन ते वाई येथे प्राज्ञपाठशाळेत वेदान्ताच्या अध्ययनाकरिता उपस्थित झाले. ब्रह्यविद्येची साधना त्यांचा जीवनोद्देश होता.


*जीवन कार्य*

🇮🇳 *स्वातंत्र्य लढा*

                     महात्मा गांधींसोबत

ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधींसोबत होते. स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल सन १९३२ मध्ये त्यांना तुरुंगवास घडला.


🔮 *सामाजिक व धार्मिक कार्य*

            वाई येथील प्राज्ञपाठशाळा मंडळाचे संस्थापक व मुख्याध्यापक स्वामी केवलानंद सरस्वती (पूर्वाश्रमीचे नारायणशास्त्री मराठे) यांच्यापाशी विनोबांनी उपनिषदे, ब्रह्मसूत्र शांकरभाष्य, पांतजलयोगसूत्रे इ. विषयांचे अध्ययन केले. माहुली येथील स्वामी कृष्णानंद यांच्या आश्रमातील काही प्रौढ विद्यार्थी-शिवनामे, वि. का. सहस्रबुद्धे इत्यादी मंडळीही त्यांच्याबरोबर सहाध्यायी होती. दिनकरशास्त्री कानडे व महादेवशास्त्री दिवेकर हे प्राज्ञपाठशाळेची व्यवस्थापनाची व अन्य प्रकारची कामे पाहत होते. प्रत्येक सोमवार हा या पाठशाळेचा सुटीचा म्हणजे अनध्ययनाचा दिवस असे. त्या दिवशी पाठशाळेची अंगमेहनतीची कामे शिक्षक-विद्यार्थी उरकत असत आणि प्रज्ञानंदस्वामींच्या समाधिस्थानाच्या सभागृहात विद्यार्थी व शिक्षक यांच्या शास्त्रार्थ चर्चेकरता साप्ताहिक सभा भरत. चर्चेचे विषय सामाजिक, धार्मिक, तात्‍त्‍विक हे असतच; परंतु त्याबरोबर प्रचलित राजकारणाची अनेक बाजूंनी मीमांसाही चालत असे. दिनकरशास्त्री कानडे हे सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर, योगी अरविंद घोष इत्यादी सशस्त्र क्रांतीकारकांच्या मार्गाने चालणाऱ्या एका गुप्त कटाचे सदस्य होते. सशस्त्र क्रांतीच्या तत्त्वज्ञानाचा ते पुरस्कार करीत. विनोबांच्याप्रमाणेच त्यांचेही वक्‍तृत्व अमोघ होते. अहिंसक क्रांताची वैचारिक भूमिका विनोबा मोठ्या परिणामकारक रीतीने या साप्ताहिक सभांमध्ये मांडीत असत. १९१७ साली हिवाळ्यात वाई येथे प्लेगची साथ उद्‍‌भवली. कृष्णेच्या दक्षिण तीरावर राहुट्या आणि पर्णशाला उभारून त्यांत प्राज्ञपाठशाळेचे विद्यार्थी व शिक्षक जवळजवळ ४ महिने राहिले. वेदान्ताचे व इतर शास्त्रांचे पाठ त्यांतील एका विस्तृत पर्णशालेमध्ये चालत असत. विनोबा पर्णशालेबाहेरच्या कृष्णाकाठच्या आम्रवृक्षाच्या छायेखाली उपनिषदांचे व शांकरभाष्याचे उच्च स्वरात वाचन करीत, हळूहळू सावकाश फेऱ्या मारीत असत. त्यांचे ते प्रसन्न वाचन ऐकून स्वामी केवलनंदांच्या मनावर विनोबाजींच्या व्यक्तिमत्त्वाची खूप खोल छाप पडली, विनोबांनी वेदान्ताविषयामध्ये खूप वेगाने १० महिन्यांत प्रगती केली. आपण कोणकोणत्या ग्रंथांचे व विषयांचे अध्ययन केले याचा सविस्तर वृतान्त त्यांनी महात्मा गांधींना कळवला. गांधीं हे वृत्तान्तपत्र वाचून अत्यंत विस्मित झाले. त्या पत्राच्या उत्तरात म. गांधींनी अखेर म्हटले की, " ए गोरख, तूने मच्छिंदरको भी जीत लिया है !".


                    विनोबा वाईहून परत अहमदाबादला फेब्रुवारी १९१८ मध्ये परतले. १९१८ साली एन्फ्ल्यूएंझाची साथ देशभर पसरली. लक्षावधी लोक त्या साथीला बळी पडले. त्यात विनोबांचे वडील, मातुश्री आणि सगळ्यात धाकटा भाऊ दत्तात्रय हे आजारी पडले. ही गोष्ट महात्मा गांधीना कळल्यावर त्यांनी विनोबांना मातुश्रींच्या शुश्रूषेकरता बडोद्यास जाण्याचा आग्रह धरला. विनोबा तयार नव्हते. गांधीनी त्यांचे मन वळवले. आई आणि धाकटा भाऊ या रोगाला बळी पडले. वडील बरे झाले. विनोबा सर्वांत ज्येष्ठ पुत्र, म्हणून आईचा अंत्यविधी त्यांनीच करणे प्राप्त होते. पुरोहिताकडून अंत्यविधीचा संस्कार करवून घेणे विनोबांना मान्य नव्हते. म्हणून ते स्मशानात गेले नाहीत. वडिलांनी पद्धतीप्रमाणे अंत्यविधी उरकून घेतला.


१९२१ साली गांधींचे भक्त शेठ जमनालाल बजाज यांनी साबरमतीच्या सत्याग्रह आश्रमाची शाखा वर्ध्याला काढली. त्या शाखेचे संचालक म्हणून महात्मा गांधीनी विनोबांची रवानगी वर्ध्यास केली. ८ एप्रिल १९२१ रोजी विनोबा वर्ध्याला पोहोचले. आतापर्यंत संबंध आयुष्य -१९५१ ते ७३ पर्यंतची भूदानयात्रा सोडल्यास या वर्ध्याच्या आश्रमातच राहून विनोबांनी तपश्चर्या करीत जीवन घालविले. हा वर्ध्याचा आश्रम क्रमाने मगनवाडी, बजाजवाडी, महिलाश्रम, सेवाग्राम व पवनार ह्या ठिकाणी फिरत राहिला. ही सर्व ठिकाणे वर्ध्याच्या ८ किमी. परिसरातच आहेत. दिवसातले सात-आठ तास सूत कातणे, विणणे आणि शेतकाम यांमध्ये त्यांनी घालविले. रोज नेमाने शरीरश्रम प्रत्येक माणसाने करावे, असा त्यांचा सिद्धान्त होता. 'शरीरश्रमनिष्ठा' हे त्यांच्या जीवन-तत्त्वज्ञानाप्रमाणे महत्त्वाचे व्रत होते. शरीरश्रमांबरोबरच त्यांनी मानसिक, आधात्मिक साधनाही प्रखरतेने केली. १९३० व ३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी कारागृहवास भोगला. १९४० साली महात्मा गांधीनी स्वराज्याकरिता वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन आरंभले. त्यात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. जवाहरलाल नेहरू हे दुसरे निवडले. आध्यात्मिक साधनेला वाहून घेतलला शत्रुमित्रसमभावी तपस्वी मनुष्य सत्याग्रहाला अत्यंत आवश्यक, म्हणून त्यांनी विनोबांची निवड केली. कारण सत्याग्रह हे शत्रूच्या हृदयपरिवर्तनाचे नैतिक शुद्ध साधन होत, अशी महत्मा गांधीची मूलभूत राजकीय भूमिका होती. उच्चतम आध्यात्मिक जीवनसाधनेस वाहिलेला शत्रुमित्रभाव विसरलेला माणूसच असे हृदय-परिवर्तन करू शकतो, अशी गांधींची धारणा होती. २० ऑक्टोबर १९४० रोजी स्वसंपादित हरिजन साप्ताहिकात गांधींनी आपल्या या शिष्याची ओळख करून दिली आहे.


१९३२ सालच्या सविनय कायदेभंगाच्या सामुदायिक आंदोलनात विनोबांनी भाग घेतला. त्यांनी धुळे कारागृहामध्ये शिक्षा भोगली. सुप्रसिद्ध गीताप्रवचने या कारागृहात त्यांनी दिली. शंभरापेक्षा अधिक सत्याग्रही कैदी आणि इतर गुन्ह्यांसाठी शिक्षा झालेले कैदी या प्रवचनांच्या रविवारच्या सभेत उपस्थित असत. त्यांमध्ये शेठ जमनालाल वजाज, गुलजारीलाल नंदा, अण्णासाहेब दास्ताने, साने गुरूजी इ. मंडळी उपस्थित असत.


या प्रवचनांचा मुख्य दृष्टिकोन 'गीता ही साक्षात भगवंताची उक्ति होय', असा होता. त्या उक्तीला पूर्ण प्रमाण मानूनच, त्यासंबंधी कसलीही साधकबाधक चर्चा न करताच त्यांनी ती १८ प्रवचने दिली. लो. टिळकांच्या गीतारहस्याचा मुख्य दृष्टिकोन त्यांनी मानला नाही. आद्य शंकराचार्याचाच मुख्य दृष्टिकोन मान्य केला, असे दिसून येते. मोहनिरास म्हणजे अज्ञाननाश हे गीतेचे मुख्य उद्दिष्ट त्यांनी मानले. अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करणे हा उद्देश गृहीत धरून केलेला कर्मयोगाचाच उपदेश गीतेत आहे, हा टिळकांचा दृष्टिकोन विनोबांनी स्वीकारली नाही. विनोबांनी निष्काम कर्मयोग मान्य केला; परंतु युद्धोपदेशाकडे कानाडोळा केला. महात्मा गांधींच्या मताने गीतेमध्ये युद्धाचा आदेश हा भौतिक सशस्त्र युद्धाचा आदेश नाही. मानवी हृदयात चाललेल्या सद्‍भावना व असद्‍भावना यांच्या संघर्षाला काव्यमय बनवण्साठी योजलेले मानवी सशस्त्र युद्धाचे कविकल्पित रूपक गीतेने योजिलेले आहे; महाभारत हा इतिहासग्रंथ नाही म्हणून त्यातील योद्धे आणि युद्धात गुंतलेले शत्रुमित्रपक्ष हे केवळ कविकल्पित होत; असे महत्मा गांधी अनासक्ति योग या पुस्तकात प्रतिपादितात. विनोबा आणि गांधी हे दोघेही निरपवाद अहिंसा तत्त्वाचे पुरस्कर्ते. भगवद्‍गीता वाचत असताना विनोबा भगवद्‍गीता हा युद्धोपदेश नाही असे सांगतात आणि महत्मा. गांधी ते आध्यात्मिक भावनांचे युद्ध होय, असे सांगतात. हा युद्धाचा मुद्दा सोडला, तर सगळ्या एकेश्वरवादी धार्मिकांना प्रेरणा देणारे अत्युच्च जीवनविषयक व विश्वविषयक तत्त्वज्ञान अतिशय सुंदर रीतीने गीतेमध्ये सांगितले असल्यामुळे गीता हा हिंदूंनाच नव्हे तर जगातील अध्यात्मवाद्यांना मोहून टाकणारा ग्रंथ आहे, यात शंका नाही. म्हणूनच, गीता जरी सशस्त्र हिंसात्मक युद्धाचा पुरस्कार करत असली, तरी गांधींना आणि विनोबांना या गीतेने कायम मोहून टाकले आहे. म्हणून गांधींनी आणि विनोबांनी जन्मभर सकाळ-संध्याकाळ चालविलेल्या प्रार्थनासंगीतात भगवद्‍गीता ही कायमची अंतर्भूत केली होती.


वैयक्तिक सत्याग्रहानंतर ७ मार्च १९५१ पर्यंत पवनार येथील परंधाम आश्रमातच विनोबांनी शारीरिक आणि मानसिक तपश्चर्येत जीवन व्यतीत केले. १९३६ पासून म. गांधी साबरमतीचा आश्रम सोडून सेवाग्रामला म्हणजे पवनारजवळच येऊन राहिले. त्यामुळे गांधी आणि विनोबा यांचा चिरकाल संवाद चालू राहिला. गांधीच्या देहान्तानंतर सर्वसेवासंघ व सर्वोदय समाज या संस्थांची स्थापना झाली. मार्च १९४८ मध्ये विनोबा दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू यांच्या विनंतीवरून गेले. भारत-पाक फाळणी झाल्यानंतर परागंदा झालेले लक्षावधी शरणार्थी (सर्व बाजूंनी जीवन उद्‍ध्वस्त झालेले) दिल्ली, पंजाब, राजस्थान यांमध्ये आले. त्यांना धीर देण्याकरता विनोबांना पंडितजींनी बोलावून घेतले. या दौऱ्यात सर्वधर्मसमभावाचा आदेश देऊन प्रेम आणि सद्‍भावना निर्माण करण्याचा प्रयत्‍न विनोबांनी केला.


दिनांक १५ नोव्हेंबर १९८२ रोजी सकाळी ९.४० वाजता पवनार येथे परंधाम आश्रमात सतत सात दिवस प्रायोपवेशन करून भूदाननेते आचार्य विनोबा भावे यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी प्राणत्याग केला. त्यांच्या निधनाची वार्ता त्यांनी प्रायोपवेशन सुरू केल्यानंतर केव्हाही अपेक्षित होती. ५ नोव्हेंबर रोजी विनोबांना ताप आला, त्याबरोबरच हृदयविकारही उद्‍भवला आणि प्रकृती चिंताजनक झाली. उपचार त्वरित सुरू झाले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्‍णालयात उपचार करण्याकरता नेण्याचा विचार तज्‍ज्ञ डॉक्‍टरांनी विनोबांना सांगितला; परंतु त्यांनी परंधाम आश्रम सोडण्यास नकार दिला व तेथेच उपचार सुरू झाले. मुंबई येथील जसलोक हॉस्पिटलचे तज्‍ज्ञ डॉ. मेहता मुंबईहून आले. हळूहळू प्रकृती सुधारेल अशी आशा उत्पन्न झाली. अ‍ॅलोपथीचे उपचारही विनोबांनी स्वीकारले, परंतु ८ नोव्हेंबर रोजी रात्री अन्नपाणी आणि औषधे या तिन्ही गोष्टी घेण्यास त्यांनी नकार दिला. आचार्यांचे बंधू शिवाजीराव भावे, मित्र दादा धर्माधिकारी इत्यादी मंडळींनी व आश्रमस्थ भक्तजनांनी आचार्यांना परोपरीने काकुळतीस येऊन, अन्नपाणी व औषधे घेण्याची विनंती केली. ती त्यांनी नाकारली. इंदिरा गांधी विनोबाजींना १० नोव्हेंबर रोजी भेटल्या. अन्नपाणी, औषधे घेण्याची विनंती त्यांनीही केली. प्रायोपवेशनाचा संकल्प करण्याचे कारण आचार्यांनी श्री. त्र्यं. गो. देशमुख व इतर भक्तांना स्पष्ट करून सांगितले. ते म्हणाले- " आता देह आत्म्याला साथ देत नाही. रखडत जगण्यात अर्थ नाही. जराजर्जर शरीर टाकणेच ठीक !"


🏛️ *विनोबांची समाधी, परंधाम आश्रम, पवनार, वर्धा*

                 आचार्यांच्या निधनाची वार्ता भारतभर व जगभर सर्व प्रचारमाध्यमांतून विद्युतवेगाने पसरली. या निधनाला कोणी महानिर्वाण म्‍हणाले, कोणी युगपुरुषाची समाधी म्‍हणाले. महात्‍मा गांधींच्या आध्यात्मिक परंपरेचे ते एक श्रेष्ठ वारस होते. त्यांचे हे प्रायोपवेशनाचे तंत्र हिंदू धर्म, बौद्ध व विशेषतः जैन धर्म या तिन्ही धर्मांना प्राचीन कालापासून मान्य असलेले तंत्र आहे. जैन धर्मात या तंत्रास 'सल्लेखना' अशी संस्कृत संज्ञा आणि 'संथारा' ही प्राकृत संज्ञा आहे. हिंदु धर्मात यास 'प्रायोपवेशन' म्हणतात. प्राय म्हणजे तप. तपाचा एक मुख्य अर्थ ' अनशन ' असा आहे. देहाचे दुर्घर व्याधी बरे होऊ शकत नाहीत, असे निश्चित झाल्यावर रूग्णाला जलप्रवेशाने, अग्‍निप्रवेशाने, भृगुपतनाने (उंच कड्यावरून उडी मारून), अनशनाने (अन्नपाणी वर्ज्य करून) किंवा अन्य कोणत्याही इष्ट मार्गाने देहविसर्जन करण्याची हिंदुधर्मशास्त्राने अनुमती दिली आहे. ज्ञानदेवादी संतांनी योगमार्गाने देहत्याग केला आहे. हा योगमार्ग गुरूगम्यच आहे. त्याचे वर्णन गीतेच्या आठव्या अध्यायात केले आहे. तात्पर्य, प्रायोपवेशन किंवा योगशास्त्रातील देहत्यागाची युक्ती हिंदुधर्मशास्त्राने मान्य केली आहे. विनोबांनी प्रायोपवेशनाच्या द्वारे देहत्याग केला. अनेक जैन साधू आणि साध्वी स्त्रिया आजही प्रतिवर्षी अशा प्रकारे देहत्याग करीत असतात आणि त्याची वार्ता वृत्तपत्रांतही केव्हा केव्हा येते. स्वातंत्र्यवीर सावरकर, धर्मानंद कोसंबी यांनी अशाच प्रकारे देहत्याग केला आहे.


⛲ *विनोबांचे विचार*

१) वर्तमानाला बंधन असावे म्हणजे वृत्ति मोकळी राहते. २) सत्य, संयम, सेवा ही पारमार्थिक जीवनाची त्रिसूत्री आहे . [१] ३) आध्यात्मिक व्यवहार म्हणजे स्वाभाविक व्यवहार म्हणजे शुद्ध व्यवहार . ४) हिंदुधर्माचे स्वरूप : आचार-सहिष्णुता, विचारस्वातंत्र्य, नीति- धर्माविषयी दृढता. ५) प्राप्तांची सेवा, संतांची सेवा, द्वेष कर्त्याची सेवा ही सर्वोत्तम सेवा. ६) असत्यात शक्ति नाही. आपल्या अस्तित्वासाठी हि त्याला सत्याचा आश्रय घेणे भाग आहे. ७) सत्य , संयम, सेवा ही पारमार्थिक जीवनाची त्रिसूत्री आहे. ८) ईश्वर, गुरु ,आत्मा, धर्म, आणि संत ही पाच पूजास्थाने . ९) इतिहास म्हणजे अनदिकालापासून आत्तापर्यंत चे सर्व जीवन. पुराण म्हणजे अनदिकालापासून आत्तापर्यंत टिकलेला अनुभवाचा अमर अंश.


🗽 *विनोबांचे स्मारक*

          विनोबांसह नरहर कुरुंदकर, वसंतदादा पटील, बालगंधर्व, जी.डी. बापू लाड, नागनाथ‍अण्णा नायकवाडी, बाळासाहेब देसाई (सातारा), भाई सावंत, बाळासाहेब सावंत (रत्‍नागिरी), चिंतामणराव देशमुख, संताजी घोरपडे, मारोतराव कन्नमवार, आदी व्यक्तीची स्मारके उभारण्याचे महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने ठरवले होते, पण यांतील एकही स्मारक पूर्णत्वास गेले नाही.


📙✍️ *पुस्तके*

अष्टादशी (सार्थ)

ईशावास्यवृत्ति

उपनिषदांचा अभ्यास

गीताई

गीताई-चिंतनिका

गीता प्रवचने

गुरुबोध सार (सार्थ)

जीवनदृष्टी

भागवत धर्म-सार

मधुकर

मनुशासनम्‌ (निवडक मनुस्मृती - मराठी)

लोकनीती

विचार पोथी

साम्यसूत्र वृत्ति

साम्यसूत्रे

स्थितप्रज्ञ-दर्शन

📚 *चरित्रग्रंथ*

आमचे विनोबा (राम शेवाळकर आणि इतर)

गांधी, विनोबा आणि जयप्रकाश (मिलिंद बोकील)

दर्शन विनोबांचे (राम शेवाळकर)

ब्रह्मर्षी विनोबा (बालसाहित्य, लेखक - विठ्ठल लांजेवार)

महर्षी विनोवा (राम शेवाळकर)

महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार विनोबा भावे (लेखक : किसन चोपडे.) (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन)

विनोबांचे धर्मसंकीर्तन (राम शेवाळकर आणि इतर))

विनोबासारस्वत (राम शेवाळकर आणि इतर)

साम्ययोगी विनोबा (राम शेवाळकर)

         



Sentences for Kids' Good Habits.

 51. Help your friends when they need. (हेल्प युवर फ्रेंड्स व्हेन दे नीड)

✦ मित्रांना गरज असेल तेव्हा मदत करा.

52. Help your parents at home. (हेल्प युवर पॅरंट्स अॅट होम)

✦ घरात आई-वडिलांना मदत करा.

53. Help your classmates in studies. (हेल्प युवर क्लासमेट्स इन स्टडीज)

✦ वर्गमित्रांना अभ्यासात मदत करा.

54. Give food to hungry people. (गिव फूड टू हंग्री पीपल)

✦ भुकेल्यांना अन्न द्या.

55. Don’t hurt anyone’s feelings. (डोन्ट हर्ट एनीवन्स फीलिंग्स)

✦ कुणाच्याही भावना दुखावू नका.

56. Share your knowledge with others. (शेअर युवर नॉलेज विथ ऑदर्स)

✦ तुमची माहिती इतरांसोबत शेअर करा.

57. Encourage others when they are sad. (एनकरेज ऑदर्स व्हेन दे आर सॅड)

✦ जे उदास आहेत त्यांना प्रोत्साहित करा.

58. Help clean the classroom. (हेल्प क्लीन द क्लासरूम)

✦ वर्ग स्वच्छ करण्यात मदत करा.

59. Stand up for someone in need. (स्टँड अप फॉर समवन इन नीड)

✦ गरज असलेल्या व्यक्तीसाठी उभे रहा.

60. Share your umbrella in rain. (शेअर युवर अंब्रेला इन रेन)

✦ पावसात तुमचा छत्री शेअर करा.

🌱 Environmental Habits (पर्यावरणासाठी चांगल्या सवयी)

61. Don’t litter anywhere. (डोन्ट लिटर एनीव्हेअर)

✦ कुठेही कचरा फेकू नका.

62. Plant more trees. (प्लांट मोअर ट्रीज)

✦ अधिक झाडे लावा.

63. Save water. (सेव वॉटर)

✦ पाणी वाचवा.

64. Save electricity. (सेव इलेक्ट्रिसिटी)

✦ विजेची बचत करा.

65. Don’t waste paper. (डोन्ट वेस्ट पेपर)

✦ कागद वाया घालवू नका.

66. Recycle waste materials. (रिसायकल वेस्ट मटेरियल्स)

✦ टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करा.

67. Use dustbin properly. (यूज डस्टबिन प्रॉपरली)

✦ कचरापेटीचा योग्य वापर करा.

68. Don’t pluck flowers unnecessarily. (डोन्ट प्लक फ्लावर्स अननेसेसरीली)

✦ फुले उगाच तोडू नका.

69. Protect animals and birds. (प्रोटेक्ट अ‍ॅनिमल्स अँड बर्ड्स)

✦ प्राणी आणि पक्ष्यांचे रक्षण करा.

70. Keep your surroundings clean. (कीप युवर सराऊंडिंग्ज क्लीन)

✦ आपला परिसर स्वच्छ ठेवा.

🏃 Exercise & Health Habits (व्यायाम आणि आरोग्यासाठी)

71. Exercise daily. (एक्सरसाइज डेली)

✦ रोज व्यायाम करा.

72. Drink plenty of water. (ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर)

✦ भरपूर पाणी प्या.

73. Eat healthy food. (ईट हेल्दी फूड)

✦ आरोग्यदायी अन्न खा.

74. Sleep well at night. (स्लीप वेल अॅट नाईट)

✦ रात्री चांगली झोप घ्या.

75. Walk in the morning. (वॉक इन द मॉर्निंग)

✦ सकाळी चालायला जा.

76. Play outdoor games. (प्ले आउटडोर गेम्स)

✦ मैदानी खेळ खेळा.

77. Don’t eat too much sweets. (डोन्ट ईट टू मच स्वीट्स)

✦ जास्त गोड खाऊ नका.

78. Wash hands before and after meals. (वॉश हॅण्ड्स बिफोर अँड आफ्टर मील्स)

✦ जेवण्यापूर्वी आणि नंतर हात धुवा.

79. Keep your body clean. (कीप युवर बॉडी क्लीन)

✦ आपले शरीर स्वच्छ ठेवा.

80. Avoid junk food. (अव्हॉइड जंक फूड)

✦ जंक फूड टाळा.

🛡️ Safety Habits (सुरक्षेसाठी)

81. Don’t talk to strangers. (डोन्ट टॉक टू स्ट्रेंजर्स)

✦ अनोळखी व्यक्तीशी बोलू नका.

82. Cross the road carefully. (क्रॉस द रोड केअरफुल्ली)

✦ रस्ता सुरक्षितपणे ओलांडा.

83. Don’t play near the road. (डोन्ट प्ले नियर द रोड)

✦ रस्त्याजवळ खेळू नका.

84. Wear a helmet while cycling. (वेअर अ हेल्मेट व्हाईल सायकलिंग)

✦ सायकल चालवताना हेल्मेट घाला.

85. Follow traffic rules. (फॉलो ट्रॅफिक रूल्स)

✦ वाहतुकीचे नियम पाळा.

86. Don’t touch electrical wires. (डोन्ट टच इलेक्ट्रिकल वायर्स)

✦ विजेच्या तारांना स्पर्श करू नका.

87. Keep sharp objects away. (कीप शार्प ऑब्जेक्ट्स अवे)

✦ धारदार /तीक्ष्ण वस्तू दूर ठेवा.

88. Don’t run in school corridors. (डोन्ट रन इन स्कूल कॉरिडॉर्स)

✦ शाळेत धावू नका.

89. Inform elders in case of danger. (इन्फॉर्म एल्डर्स इन केस ऑफ डेंजर)

✦ धोका असल्यास मोठ्यांना सांगा.

90. Don’t play with fire. (डोन्ट प्ले विथ फायर)

✦ आगीसोबत खेळू नका.

💡 Other Useful Daily Habits (इतर उपयोगी सवयी)

91. Keep your bag organized. (कीप युवर बॅग ऑर्गनाइज्ड)

✦ बॅग व्यवस्थित ठेवा.

92. Don’t shout indoors. (डोन्ट शाउट इंडोअर्स)

✦ घरात ओरडू नका.

93. Respect your teachers. (रिस्पेक्ट युवर टीचर्स)

✦ शिक्षकांचा आदर करा.

94. Share your pen and pencil. (शेअर युवर पेन अँड पेंसिल)

✦ पेन-पेन्सिल शेअर करा.

95. Keep your shoes in proper place. (कीप युवर शूज इन प्रॉपर प्लेस)

✦ तुमचे बूट योग्य जागी ठेवा.

96. Don’t make noise unnecessarily. (डोन्ट मेक नॉईज अननेसेसरीली)

✦ नको ते आवाज करू नका.

97. Take care of your pets. (टेक केअर ऑफ युवर पेट्स)

✦ तुमच्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या.

98. Speak softly. (स्पीक सॉफ्टली)

✦ मृदू आवाजात/हळूवारपणे बोला.

99. Always be honest. (ऑलवेज बी ऑनिस्ट)

✦ नेहमी प्रामाणिक रहा.

100. Help someone in need. (हेल्प समवन इन नीड)

✦ गरज असलेल्या व्यक्तीस मदत करा.

Sentences for Kids' Good Habits. .

 100 इंग्रजी वाक्ये मुलांच्या चांगल्या सवयींसाठी.100 English Sentences for Kids' Good Habits. 

🧼 Personal Hygiene (वैयक्तिक स्वच्छतेसाठी वाक्ये)

1.  Brush your teeth twice a day. (ब्रश युवर टीथ ट्वाइस अ डे)

✦ दिवसातून दोन वेळा दात घास.

2.  Wash your hands before eating. (वॉश युवर हॅण्ड्स बिफोर ईटिंग)

✦ जेवण्यापूर्वी हात धुवा.

3.  Take a bath daily. (टेक अ बाथ डेली)

✦ रोज अंघोळ करा.

4.  Keep your nails clean. (कीप युवर नेल्स क्लीन)

✦ नखे स्वच्छ ठेवा.

5.  Comb your hair every morning. (कोम युवर हेअर एव्हरी मॉर्निंग)

✦ रोज सकाळी केस विंचरा.

6.  Wash your face regularly. (वॉश युवर फेस रेग्युलर्ली)

✦ चेहरा नियमित धुवा.

7.  Use a handkerchief. (यूज अ हॅन्करचिफ)

✦ रुमाल वापरा.

8.  Cover your mouth while sneezing. (कव्हर युवर माउथ व्हाईल स्नीझिंग)

✦ शिंकी देताना तोंड झाका.

9.  Keep your clothes clean. (कीप युवर क्लोथ्स क्लीन)

✦ कपडे स्वच्छ ठेवा.

10. Take care of your shoes. (टेक केअर ऑफ युवर शूज)

✦ आपले बूट सांभाळा.

🏠 Home & Room Habits (घर आणि खोलीसाठी)

11. Make your bed every morning. (मेक युवर बेड एव्हरी मॉर्निंग)

✦ रोज सकाळी अंथरुण आवरा.

12. Keep your room tidy. (कीप युवर रूम टायडी)

✦ खोली स्वच्छ ठेवा.

13. Put things back in place. (पुट थिंग्स बॅक इन प्लेस)

✦ वस्तू परत जागी ठेवा.

14. Switch off the lights when not needed. (स्विच ऑफ द लाईट्स व्हेन नॉट नीडेड)

✦ गरज नसताना लाईट बंद करा.

15. Don’t waste water. (डोन्ट वेस्ट वॉटर)

✦ पाणी वाया घालवू नका.

16. Don’t waste electricity. (डोन्ट वेस्ट इलेक्ट्रिसिटी)

✦ वीज वाया घालवू नका.

17. Take care of your toys. (टेक केअर ऑफ युवर टॉइज)

✦ तुमच्या खेळण्यांची काळजी घ्या.

18. Help your parents at home. (हेल्प युवर पॅरंट्स अॅट होम)

✦ घरात आई-वडिलांना मदत करा.

19. Don’t break things carelessly. (डोन्ट ब्रेक थिंग्स केअरलेस्ली)

✦ निष्काळजीपणे वस्तू तोडू नका.

20. Keep your study table clean. (कीप युवर स्टडी टेबल क्लीन)

✦ अभ्यासाची टेबल स्वच्छ ठेवा.

📚 Study & Learning Habits (अभ्यासाच्या सवयीसाठी वाक्ये)

21. Do your homework on time. (डू युवर होमवर्क ऑन टाइम)

✦ गृहपाठ वेळेत करा.

22. Revise your lessons daily. (रिव्हाईज युवर लेसन्स डेली)

✦ रोज पाठाचे पुनरावलोकन करा.

23. Listen carefully in class. (लिसन केअरफुल्ली इन क्लास)

✦ वर्गात नीट लक्षपूर्वक ऐका.

24. Read books every day. (रीड बुक्स एव्हरी डे)

✦ दररोज पुस्तके वाचा.

25. Ask questions if you don’t understand. (आस्क क्वेश्चन्स इफ यू डोन्ट अंडरस्टँड)

✦ काही समजले नाही तर प्रश्न विचारा.

26. Take notes while studying. (टेक नोट्स व्हाईल स्टडीइंग)

✦ अभ्यास करताना नोट्स घ्या.

27. Don’t copy from others. (डोन्ट कॉपी फ्रॉम ऑदर्स)

✦ दुसऱ्यांकडून कॉपी करू नका.

28. Keep your books organized. (कीप युवर बुक्स ऑर्गनाइज्ड)

✦ तुमची पुस्तके व्यवस्थित ठेवा.

29. Learn something new every day. (लर्न समथिंग न्यू एव्हरी डे)

✦ रोज काहीतरी नवीन शिका.

30. Be punctual for school. (बी पंक्चुअल फॉर स्कूल)

✦ शाळेत वेळेवर या.

🍎 Food & Eating Habits (अन्न आणि खाण्याच्या सवयी)

31. Eat fresh fruits daily. (ईट फ्रेश फ्रूट्स डेली)

✦ रोज ताजी फळे खा.

32. Drink milk every day. (ड्रिंक मिल्क एव्हरी डे)

✦ रोज दूध प्या.

33. Don’t eat junk food often. (डोन्ट ईट जंक फूड ऑफन)

✦ खारट/तळलेले अन्न जास्त खाऊ नका.

34. Wash fruits before eating. (वॉश फ्रूट्स बिफोर ईटिंग)

✦ फळं खाण्यापूर्वी धुवा.

35. Eat your meals on time. (ईट युवर मील्स ऑन टाइम)

✦ जेवण वेळेवर खा.

36. Chew your food properly. (च्यू युवर फूड प्रॉपरली)

✦ अन्न नीट चावून खा.

37. Don’t talk while eating. (डोन्ट टॉक व्हाईल ईटिंग)

✦ जेवत असताना बोलू नका.

38. Share your food with friends. (शेअर युवर फूड विथ फ्रेंड्स)

✦ तुमचे जेवण मित्रांसोबत शेअर करा.

39. Say “thank you” after receiving food. (से थॅंक यू आफ्टर रिसीविंग फूड)

✦ अन्न मिळाल्यावर “धन्यवाद” म्हणा.

40. Don’t waste food. (डोन्ट वेस्ट फूड)

✦ अन्न वाया घालवू नका.

🙏 Good Manners / Politeness (चांगले शिष्टाचार / सभ्य वर्तन)

41. Say “please” when asking for something. (से “प्लीज” व्हेन आस्किंग फॉर समथिंग)

✦ काही विचारताना “कृपया” म्हणा.

42. Say “thank you” after getting help. (से “थँक यू” आफ्टर गेटिंग हेल्प)

✦ मदत मिळाल्यावर “धन्यवाद” म्हणा.

43. Say “sorry” if you make a mistake. (से “सॉरी” इफ यू मेक अ मिस्टेक)

✦ चूक झाली तर “सॉरी” म्हणा.

44. Greet everyone politely. (ग्रीट एव्हरीवन पलाइटली)

✦ सर्वांना नम्रतेने अभिवादन करा.

45. Listen before speaking. (लिसन बिफोर स्पीकिंग)

✦ बोलण्यापूर्वी ऐका.

46. Don’t interrupt others. (डोन्ट इंटरप्ट ऑदर्स)

✦ इतरांना व्यत्यय आणू नका.

47. Share your toys with friends. (शेअर युअर टॉइज विथ फ्रेंड्स)

✦ मित्रांसोबत खेळणी शेअर करा.

48. Be kind to everyone. (बी काइंड टू एव्हरीवन)

✦ सर्वांसोबत नम्र राहा.

49. Say “excuse me” politely. (से “एक्सक्यूज मी” पलाइटली)

✦ एखाद्या वेळेस रस्ता मागताना “माफ करा” म्हणा.

50. Respect your elders. (रिस्पेक्ट युवर एल्डर्स)

✦ मोठ्यांचा आदर करा.

🤝 Helping Others (इतरांना मदत करणे)


9000 पेक्षा जास्त पदे

 २०२५ साठी एकूण 9000 पेक्षा जास्त पद भरणार आहेत. यामध्ये PGT, TGT, PRT तसेच प्राचार्य, उपप्राचार्य आणि विविध नॉन-टीचिंग पदांचा समावेश आहे. अर्ज प्रक्रिया १४ नोव्हेंबर पासून सुरु झाली असून 4 डिसेंबर 2025 ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी navodaya.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाणून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अधिक माहितीसाठी तुम्ही KVS pfd डाउनलोड करू शकतात.

या भरतीमध्ये कोणती पदे आहेत?

१. पीजीटी - १४६५ पदे

केंद्रीय विद्यालयात पदव्युत्तर शिक्षकांच्या १४६५ पदे उपलब्ध आहेत. विषयानुसार, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, वाणिज्य, संगणक विज्ञान इत्यादी विषयांमध्ये भरती केली जाईल.

२. TGT (टीजीटी) - २७९४ पदे

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदांसाठी, हिंदी, इंग्रजी, सामाजिक विज्ञान, संस्कृत, गणित, विज्ञान आणि विशेष शिक्षक यासारख्या विषयांमध्ये २७९४ पदे जाहीर करण्यात आली आहेत.

३. PRT (पीआरटी) - ३३६५ पदे

प्राथमिक शिक्षक (पीआरटी) भरतीमध्ये, सामान्य पीआरटी, विशेष शिक्षण पीआरटी आणि पीआरटी संगीत या पदांमध्ये ३३६५ रिक्त जागा भरायच्या आहेत.

४. प्राचार्य आणि उपप्राचार्य - १९२ पदे

प्राचार्य - १३४ पदे

उपप्राचार्य - ५८ पदे

सहाय्यक आयुक्त - ८ पदे

५. शिक्षकेतर - १३०२ पदे

विभागाच्या रचनेत ग्रंथपाल, वित्त अधिकारी, प्रशासन अधिकारी, कनिष्ठ/वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, स्टेनो, अनुवादक, सहाय्यक विभाग अधिकारी इत्यादींचा समावेश आहे.

अर्ज कसा करायचा?

- अधिकृत KVS/CBSE वेबसाइट उघडा.

- मुख्य पानावर दिसणाऱ्या "Recruitment 2025" किंवा "Apply Online" लिंकवर .

- आपले नवीन रजिस्ट्रेशन करा (मोबाईल नंबर व ईमेल आयडी आवश्यक).

- योग्य पद निवडा - PGT/TGT/PRT/Non-Teaching.

- अर्ज फॉर्म पूर्णपणे भरा

- वैयक्तिक माहिती

- शैक्षणिक पात्रता

- अनुभव (लागू असल्यास)

- आवश्यक कागदपत्रांचे स्कॅन अपलोड करा.

- फी ऑनलाइन पद्धतीने भरा (डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग).

- अर्ज सबमिट करा व त्याची प्रिंट कॉपी जतन करा.

बटुकेश्वर दत्त..

 


        *विस्मृतीत गेलेला क्रांतिकारक*

                 *बटुकेश्वर दत्त*

            

*जन्म: १८ नोव्हेंबर, १९१०*

      ( ओरी, पूर्व बर्दमान जिल्हा,     

             बंगाल, ब्रिटिश भारत )

*मृत्यू: २० जुलै, १९६५*

         ( नवी दिल्ली, भारत )

चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना: हिंदुस्थान सोशालिस्ट  

          रिपब्लिकन असोसिएशन, 

          नौजवान भारत सभा

धर्म: हिंदू

वडील: गोठा बिहारी दत्त

पत्नी : अंजली दत्त

नागरिकता : भारतीय

विशेष माहीती : ८ एप्रिल १९२९ ला भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी प्रेक्षक दिर्घिकेमधून केंद्रिय असेंब्लीमध्ये मोकळ्या जागी बाँम्ब फेकला.

                      १५ ऑगस्ट १९४७ ला भारताने अगणित बलिदानं, अगणित वार झेलत स्वातंत्र्य मिळवलं. या स्वातंत्र्याच्या संग्रामात न जाणो कित्येक तरुणांच्या, कित्येक क्रांतिकारकांच्या, कित्येक देशभक्तांच्या प्राण्यांच्या आहुत्या दिल्या गेल्या आणि जे वाचलेले त्यांचं संपूर्ण आयुष्यही दिलं गेलं होतं.

                     पण १९४७ नंतर या सगळ्या स्वातंत्र्यसमरात सहभागी झालेले आणि हयात असलेले क्रांतिकारी जे जहाल गटातले होते त्यांचं पुढे काय झालं हे फारसे लोकांना माहिती नाही.

          स्वतंत्र भारतासाठी आपलं आयुष्य वेचलेल्या अशा कितीतरी क्रांतिकारकांनी अक्षरशः वैमनस्य आणि अत्यंत हलाखीच्या गरिबीत दिवस काढले. बरेच जण या गरीबीतच वारले. 

                   अशाच एका सरकारी उदासीन वागणुकीचा बळी पडलेल्या शहीद-ए- आझम असणाऱ्या भगतसिंगांचा सगळ्यात जवळचा मित्र बटुकेश्वर दत्त.

             ८ एप्रिल १९२९ ही घटना सगळ्यांच्या लक्षात आहे. आजही ब-याचशा पाठ्यपुस्तकातून शिकवली जाते की भगतसिंग आणि त्यांचे सहकारी बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतल्या असेंब्लीमध्ये खाली जागेत दोन बॉम्ब टाकले. ‘इन्कलाब जिंदाबाद’चे नारे दिले.

            सगळ्या गदारोळात तिथून पळून जाणं शक्य असतानाही दोघांनी आत्मसमर्पण केलं. कारण होतं निदान खटल्याच्या निमित्ताने का होईना संपूर्ण देशासमोर आपले विचार ठेवता येतील. पुढे काळानुसार (साण्डर्स वधाचा खटला) राजगुरू, सुखदेव यांना फाशी झाली मात्र दत्त यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली.

                  १९२९- १९४२ इतकी वर्षे त्यांनी अंदमानात अत्यंत हलाखीच्या दिवसात काढली. १९४२ ला अंदमानातून सुटल्यानंतर सुद्धा शांत न बसता ‘छोडो भारत’ अभियानात सुद्धा ते सहभागी झाले आणि त्यांना पुन्हा अटक झाली. या अटकेतुन ते सुटले, मात्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर.

             बटुकेश्वर दत्त यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९०६ ला ओवारी नावाच्या गावात जे आत्ता पश्चिम बंगालमध्ये आहे तिथे झाला. बटुकेश्वर दत्त यांना जवळचे मित्र बिके, बट्टू अशा नावांनी हाक मारायचे. तिथल्याच पीपीएम हायस्कूलमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.

       महाविद्यालयीन काळातच ते आझाद आणि भगतसिंगांसारख्या तरुणांच्या संपर्कात आले. ‘हिंदुस्तान सोशल रिपब्लिक असोसिएशन’ या जहाल क्रांतिकारी संघटनेच्या संपर्कात येऊन आपापल्या पद्धतीने का होईना पण भारताला स्वातंत्र्य मिळवायचे यासाठी ते काम करू लागले. 

          १९२९ या बॉम्ब हल्ल्याच्या प्रकरणानंतर काही काळासाठी त्यांना लाहोर जेलमध्ये भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह ठेवण्यात आले. तेथे त्यांनी आणि भगतसिंगांनी एक गोष्ट सरकारच्या निदर्शनास आणून दिली की आम्ही राजकीय कैदी असताना सुद्धा आम्हाला गुन्हेगारासारखं वागवले जात आहे.

             ते बंद व्हावं म्हणून त्यांनी जवळजवळ ४० दिवसांचं उपोषण केलं. त्यांच्या बऱ्याचशा मागण्या मान्य झाल्या पण पुढे भगतसिंग यांना फाशीची शिक्षा दिली गेली आणि बटुकेश्‍वर दत्त यांची रवानगी अंदमानात झाली.

               एक वेळ मृत्यू परवडला पण अंदमान नको अशी परिस्थिती असणाऱ्या या अंदमानात १९४२ पर्यंतची वर्ष अत्यंत हलाखीत, अत्यंत हाल अपेष्टा सहन करत त्यांनी काढली. वीर सावरकरांच्या चरित्रात सुद्धा काही वेळा या दत्तांचा उल्लेख येतो.

                १९४२ ला अंदमानातून सुटल्यानंतर ताबडतोब महात्मा गांधींनी सुरू केलेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. दिल्लीत निदर्शने करत असताना त्यांना पुन्हा अटक झाली ती चार वर्षांसाठी.

      १९४७ ला भारत वसाहतवादी सत्तेच्या तडाख्यातून मुक्त झाला आणि दत्त सारख्या अनेकांची सुटका झाली. ज्याच्यासाठी आतापर्यंत आपण आपले आयुष्य वेचले निदान त्या स्वतंत्र भारतात तरी क्रांतिकारकांना, देशभक्तांना योग्य स्थान, योग्य मान मिळेल ही अपेक्षा मात्र फोल ठरली.

              याचाच अर्थ या तरुणांनी क्रांतिकारकांनी आपले शरीर आणि आपले आयुष्य या स्वांतत्र्य कार्यात वाहून घेतलं, आपलं समर्पण दिले आहे, आपलं बलिदान दिले त्या सगळ्यांचे बलिदान व्यर्थ होते.

              अर्थात या सगळ्या शिक्षा भोगून राहिलेले क्रांतिकारक स्वतंत्र भारतात सुद्धा काही मान किंवा जगण्याला पुरेल अशी व्यवस्था सुद्धा मिळवू शकले नाहीत.

                इंग्रजांनी “मोस्ट डेंजरस मॅन” ठरवलेला हा मराठी क्रांतिकारक आपण साफ विसरलो आहोत.

🌞 *क्रांतिकारकांची अतुल्य देशभक्ती: स्वातंत्र्य सूर्य बघण्यासाठी मृत्यूलाही रोखून ठेवले!*

                  बटुकेश्वर दत्त सारख्या क्रांतिकारकांना सरकारच्या कार्यालयांमध्ये जगण्याला पुरतील एवढे पैसे मिळवणारी नोकरी मिळावी म्हणून कित्येक वर्षे हेलपाटे घालावे लागले. अर्थात तत्कालीन सरकारच्या धोरणानुसार ती काही त्यांना मिळाली नाही हे उघड आहे.

       अशातच त्यांनी लग्न केलं आणि अनेक व्यवसाय करून बघण्याचे अपयशी प्रयत्न केले. सतत चरितार्थादाखल होणारी उपासमार आणि हाल अपेष्टा यातून त्यांना बरेच आजार झाले. या आजारातूनच त्यांनी एक १९६५ ला दिल्लीच्या ए आय आय एम एस हॉस्पिटल मध्ये प्राण सोडला.

            त्यांचे दहन त्याच ठिकाणी करण्यात आलं ज्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी त्यांचे सहकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे करण्यात आलं होतं.

                    १९२९ मधला बॉम्ब फेकण्याचा प्रसंग आणि भारताचं मिळालेले स्वातंत्र्य या सगळ्या गडबडीत कुठेतरी अनेक क्रांतिकारकांच्या, अनेक देशभक्तांच्या कथा लुप्त झाल्या, हरवल्या.

                   दत्ताचं आयुष्य असंच कुठेतरी गायब झालं. दुर्लक्ष केलं केलं. 

         बॉम्बफेकीच्या प्रकरणानंतर बटुकेश्वर दत्तांच्या वकील असलेल्या असफ अली यांनी सांगितलं होतं की मुळात बटूकेश्वर दत्तांनी बॉम्ब फेकला नव्हता. बॉम्ब फेकला तर फक्त भगतसिंग यांनी पण अटक होत असताना बटुकेश्वर दत्त खोटं म्हणाले की, होय मी बॉम्ब फेकला आहे आणि त्यांना अटक झाली.

         एक सच्चा मित्र जो मित्राच्या शब्दाखातर त्याच्या बरोबर एका आत्मघातकी कटात सहभागी झाला, खोटे बोलून त्याच्या बरोबर आयुष्यभर पुरतील एवढ्या यातना सहन केल्या, अखंड भारत स्वतंत्र व्हावा हे स्वप्न बघितलं, त्याला काय मिळालं तर दुर्लक्षित दुर्दैवी आणि दारिद्र्य भरलेलं आयुष्य.

          आज आपण अशा अनेक क्रांतिवीरांच्या आठवणी काढल्या काय व त्यांच्यासाठी त्यांच्या नावाने कार्यक्रम पुरस्कार दिले गेले काय पण त्यांनी जगलेला आयुष्य आणि त्यांना स्वतंत्र भारतात मिळालेली वागणूक बदलू शकत नाही. 

 *...ते अमर हुतात्मे झाले....!!*


          

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे

 

     

    *डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे*

        *(क्रांती - हरीतक्रांती)*

 


    *जन्म : 7 नोव्हेंबर 1883*

               (वर्धा , महाराष्ट्र)

    *मृत्यू : 22 जानेवारी 1967*

                   (वय 83)

             (नागपूर , महाराष्ट्र)


संघटना : गदर पार्टी, 

              बर्लिन समिती, भारतीय 

              कम्युनिस्ट पार्टी

हालचाल : हिंदू-जर्मन षड्यंत्र , भारतीय कम्युनिझम


गदर क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिकोच्या शेतीतले जादूगार असा भन्नाट प्रवास करणाऱ्या डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे सारे आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेले आहे. सात नोव्हेंबर या त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने, त्यांच्या कार्याचा धावता आढावा..


परकीय भूमीवरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी मोलाची कामगिरी केलेल्या एका क्रांतिकारकाची ही कहाणी आहे. डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे हे त्यांचे नाव. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा अक्षरश: होम केला. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयाने त्यांनी जगभर वणवण केली. इंडो-चायना, जपान, अमेरिका, कॅनडा, ग्रीस, तुर्कस्तान, इराण, बलुचिस्तानची सीमा, फ्रान्स, जर्मनी, रशिया, मेक्सिको अशी ही भ्रमंती १८ जानेवारी १९६७ ला शांत झाली.


७ नोव्हेंबर १८८६ रोजी वध्र्यात जन्मलेल्या या भारतमातेच्या सुपुत्राचा आयुष्यपट चक्रावून टाकणारा आहे. वयाच्या २० व्या वर्षी मातृभूमीला पारखे झालेल्या या वीराची स्वातंत्र्यप्राप्तीची दुर्दम्य आकांक्षा, परकीय ब्रिटिश सत्तेला शस्त्रास्त्रांच्या साहाय्यानेच देशाबाहेर घालवता येईल, ही पक्की मनोधारणा त्यांच्या जीवनप्रवासात जागोजागी दृष्टोत्पत्तीस येते. गदर चळवळींच्या प्रणेत्या खानखोजेंकडे प्रयोगशीलता होती. गदर चळवळीत, मेक्सिकोत शेती संशोधनांतही ती कामी आली; पण या प्रयोगशीलतेचा योग्य उपयोग आमचे शासनकर्ते करून घेऊ शकले नाहीत.

               लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून १९०६ साली खानखोजेंनी मायदेश सोडला. अमेरिकेत कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी क्रांतिकेंद्रे काढली. गदर उठावणीच्या आखणीत ते आघाडीवर होते. लाला हरदयाळ, पंडित काशिराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चटोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त आदी क्रांतिकारक त्यांच्याबरोबर होते. ब्रिटिश सरकारविरुद्ध सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी अर्धे जग पालथे घातले, पृथ्वीप्रदक्षिणा केली, अपार साहसे अंगावर घेतली. डॉ. सन्यत सेन, जॉर्ज वॉशिंग्टन काव्‍‌र्हर हे त्यांचे आदर्श होते. दोघेही शेती क्रांतीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळेच मेक्सिकोत त्यांनी कृषिक्रांती घडवून आणली. हे सगळे करीत असताना मायभूमीच्या ओढीने ते तीन वेळा भारतात आले. पैकी एकदा इराणी नाव, इराणी पासपोर्ट आणि इराणी वेश धारण करून १० जून १९१९ ला मुंबईत आले. लोकमान्य टिळकांना गुप्तपणे भेटले. त्यांनी भारतात न राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे परत पॅरिस, बर्लिन, मॉस्को असा प्रवास करून मेक्सिकोत स्थायिक झाले. मॉस्कोत लेनिनशी दोनदा भेट झाली. त्याअगोदर सन्यत सेनशी भेट झाली होती. १९२४ ते १९४९ असे २५ वर्षे भारताबाहेर मेक्सिकोत राहून ते कृषी सल्लागार म्हणून भारतात आले; पण पाच महिन्यांनंतर परत गेले. त्यानंतर फेब्रुवारी १९५० ते ऑगस्ट १९५१ असे दीड वर्षे ते भारतात राहिले; पण इथल्या शासनकर्त्यांनी त्यांना स्वीकारले नाही. अखेर नोव्हेंबर १९५५ मध्ये नागपूरला कायमच्या वास्तव्यासाठी आले ते केवळ मायभूमीत अखेरचा श्वास घ्यायचा म्हणून.

               खानखोजे हे कधी काळी तेलंगणातून आलेले कुटुंब असावे. त्यांच्या एका पूर्वजाने पुंडावा करणाऱ्या एका खानाला शोधून काढले होते. म्हणून त्यांचे नाव खानखोजे असे पडले. त्यांचे मातुल घराण्याचे आडनाव फत्तेखानी. एका पुंडावा करणाऱ्या खानाला त्यांनी पकडले म्हणून ते फत्तेखानी झाले. त्यांचे आजोबा व्यंकटेश हे १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात सहभागी झाले होते. त्यांची भेट तंटय़ा भिल्लाशी झाली होती. त्याने त्यांना ब्रिटिशांशी लढा देण्यास सांगितले होते.

                    डॉ. खानखोजे माध्यमिक शिक्षणासाठी नागपूर येथे आले. नील सिटी हायस्कूलचे ते विद्यार्थी. वयाच्या अठराव्या वर्षी या मुलाचे लग्न केले तर तो मार्गावर येईल या धारणेने त्याच्या आईवडिलांनी त्याचे लग्न ठरवले, पण त्याने लग्नाच्या मांडवातून पलायन केले. बंगाली क्रांतिकारकांशी त्यांचा या सुमारास संपर्क आला. सखाराम देऊस्कर, ब्रह्मबांधव बंडोपाध्याय यांच्याशी भेट झाली. एक वेगळा प्रयोग म्हणून सर्कस चालू केली, पण हा प्रयोग फसला. सर्कस वादळात सापडली आणि अक्षरश: कोलमडली. हा त्यांच्या आयुष्यातील टर्निग पॉइंट ठरला. ते पुण्यास टिळकांना भेटले. (१९०५) टिळकांनी त्यांना जपानला जाण्याचे सुचवले. १६ ऑक्टोबर १९०५ला लॉर्ड कर्झन यांनी वंगभंगाचा आदेश काढला आणि संपूर्ण बंगाल पेटून उठला. ब्रिटिशांची दडपशाही वाढत होती. अशा वातावरणात हा सल्ला टिळकांनी त्यांना दिला होता.


खानखोजेंना भाऊ म्हटले जात असे. भाऊ प्रथम बनारसला जाऊन स्वामी रामतीर्थाना भेटले. रामतीर्थानी त्यांना एक पत्र दिले. भाऊंना मोबासा येथे टाइमकीपरची नोकरी मिळाली, पण जायला मिळाले नाही. अमेरिकन वकिलातीने मदत केली, पण अमेरिकन जहाजाच्या ब्रिटिश कप्तानाने त्यांना प्रवेश नाकारला. नंतर मेसेंजर मेरिटाइम या जहाज कंपनीचे येरा हे जहाज कोलंबोपर्यंत जाणार होते, त्यावर ते हरकाम्या म्हणून नोकरीस लागले. पोलिसांनी कोलंबो येथे चौकशी केली, पण त्यातून ते सुटले. सायगाव येथे उतरल्यावर रिक्षावाल्याने त्यांना हिंदू देवळांत नेले. तेथील पुजारी तेलगू भाषिक. त्याच्याकडून बरीच माहिती मिळवली. पुढील प्रवासात हाँगकाँग, शांघाय येथे उतरू न दिल्याने योकोहामा येथे उतरले. कॅप्टनने त्यांच्यासाठी रदबदली केली. ते जपानी भाषेचे विद्यार्थी झाले. इथे त्यांना गोविंदराव पोतदारांची खूप मदत झाली. इंग्लिशचे वर्ग चालवले. जेवणखाण्याचे हाल होते. इथे त्यांनी इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली. जहाजावर मित्र झालेल्या चिनी मित्रांच्या ओळखीने त्यांची सन्यत् सेनशी भेट झाली. भारतीय स्वातंत्र्य, भारतीय शेती यावर त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.


खानखोजे यांनी या काळात स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले. २ नोव्हेंबर १९०७ रोजी त्यांनी कोबे चेंबर ऑफ कॉमर्सपुढे भाषण दिले. याच काळात त्यांनी हिंदी विद्यार्थ्यांची क्रांती सेना स्थापन केली. १९०६ला सॅनफ्रान्सिस्को येथे भीषण भूकंप झाला होता. पुनर्वसनाच्या कामासाठी मजुरांची आवश्यकता होती. खानखोजे मजूर म्हणून खालच्या डेकचे स्वस्त तिकीट घेऊन सॅनफ्रान्सिस्को येथे गेले. सॅनफ्रान्सिस्को बंदरात त्यांना अडवण्यात आले. तू काय करणार आहेस? खानखोजे उत्तरले. ‘विद्यार्जन’. त्यांना अमेरिकेत प्रवेश मिळाला. बर्कलेला त्यांचे मित्र (सर्व बंगाली) भेटले. एका हॉटेलात भांडी विसळण्याचे काम मिळाले, पण ते नीट होईना म्हणून मालकाने त्यांना काढून टाकले. नंतर एका रुग्णालयात बशा धुण्याचे काम मिळाले. पगार नव्हता, पण राहायला जागा आणि तीन वेळ खाना होता. त्यांनी ‘इंडिया इंडिपेंडन्स लीग’ची स्थापना केली. बर्कले विद्यापीठात त्यांनी शेतीचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. आठवडाअखेर रेल्वेरुळांवर खडी वाहून नेण्याचे हे काम केले. हॉम नावाची सुगंधी फुले वेचली. ही हिरव्या रंगाची फुले बीअरमध्ये वापरत असत.


तिथून ते सॅक्रोमेंटोला पोहोचले. त्यांनी शेतात काम केले. त्यांचा अनेक पंजाब्यांशी परिचय झाला. मेक्सिकन क्रातिकारकांशी घनिष्ठ परिचय झाला. तो पुढे उपयोगी पडला. पोर्टलंड येथे अशिक्षितपणाचे सोंग आणून लाकूड फॅक्टरीत काम मिळवले. १९१०मध्ये त्यांनी शेतीशास्त्राची कॉर्नवालिसची पदवी मिळाली. राफेल येथील मिलिटरी अ‍ॅकॅडमीत वेटरचे काम मिळाले. तेथे सैनिक प्रशिक्षणही घेतले. इंडिया इंडिपेंडन्स लीग स्थापन केली. पीरखान या नावाने सीएटल, सॅक्रोमेंटो, सॅनफ्रान्सिस्को येथे शाखा काढल्या. वॉशिंग्टन स्टार विद्यापीठात जेनेटिक्सचा अभ्यास केला. स्पोकेन येथे स्ट्रॉबेरीच्या मळ्यांत काम केले. पिंगळे, हरदयाळ यांच्या संपर्कात आले. आझाद हिंद पक्षाचे गदर पार्टी असे नामकरण झाले. त्यांना स्वत:ला गदर हे नाव पसंत नव्हते. (१९१३) युगांतर आश्रमाची स्थापना झाली. जर्मनीने उघड पाठिंबा दिला.


याच काळात सम फॅक्टर्स विच इनफ्लुएन्स द वॉटर रिक्वायरमेंट ऑफ प्लान्टस् हा प्रबंध त्यांनी विद्यापीठाला सादर केला. (दुर्जल कृषीशास्त्र) एम.एस. पदवी मिळवली. पुलमन येथे सॉइल फिजिक्स प्रयोगशाळेत काम केले. अमेरिकन ब्रीडर्स असोसिएशनची लाइफ मेंबरशिप मिळवली. भारतावर सिनेस्लाइड्सच्या साहाय्याने व्याख्याने देणे चालू केले. हिंदू असोसिएशन ऑफ पॅसिफिक कोस्ट या संस्थेची स्थापना केली. गनिमी युद्धाची तयारी सुरू झाली. जुलै १३मध्ये कॉव्‍‌र्हरची भेट झाली. मिनेसोटा विद्यापीठांत पीएच.डी.साठी त्यांनी नाव नोंदवले. पण पहिले महायुद्ध चालू झाले. खानखोजे आणि त्यांचे सहकारी सशस्त्र क्रांतीचा पाठपुरावा करू लागले. पीएच.डी. मागे पडली. याच वेळेला कोमागाटा मारू प्रकरण झाले.


कोमागोटा मारूचा गदर चळवळीशी प्रत्यक्ष संबंध नव्हता, पण खानखोजे आणि त्यांचे सहकारी यांनी सर्वतोपरी साहाय्य केले. चळवळीच्या प्रहारक विभागाचे खानखोजे प्रमुख होते. दहा हजार स्वयंसेवक लढण्यासाठी तयार होते. त्यांच्या वेगवेगळय़ा तुकडय़ा करून भारतात शिरण्याची योजना होती. जर्मनीचा उघड पाठिंबा होता. भारतीय जनतेस जागे करण्यासाठी एम्डेनने पूर्व किनाऱ्यावर हल्ला केला, पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. खानखोजे पीएच.डी. अर्धवट टाकून निघाले. न्यूयॉर्कला भारतीय पासपोर्ट मिळाला नाही तेव्हा तुर्कस्तान, इराण, बलुचिस्तानमार्गे शिरण्याची योजना झाली. सप्टेंबर १९१४ मध्ये तिघे जण निघाले. आगाशे (मिर्झा महमद अली), खानखोजे (महमदखान), कोचर (दाऊदखान) यापैकी आगाशे यांच्याकडे इराणीयन पासपोर्ट होता. इराणी जेन्डार्मीत ते मोठय़ा हुद्दय़ावर होते. न्यूयॉर्क, अथेन्स, पिरओस- वेगवेगळ्या जहाजांनी, स्मर्नास रेल्वेने आले. कोचर यास प्रचार साहित्यासह जहाजाने मुंबईत पाठवले. पण त्यास पंजाबात पकडण्यात आले. खानखोजे यांचा पुढचा प्रवास इस्तंबुल (सप्टेंबर १९१४), बगदाद (डिसेंबर १९१४), पुस्तइकुत (फेब्रवारी १९१५), बुशायर (मार्च १९१५) असा झाला. इस्कोनडेरेन येथे रेल्वेवर ब्रिटिश विमानांनी हल्ला केला. ते थोडक्यात बचावले. पर्शियात त्यांनी महमदखान हे नाव घेतले होते. पर्शियन सीमेपर्यंत जाण्यासाठी रात्रीच्या वेळी होडीतून २०० मैल जावे लागले. पर्शिया जर्मनीच्या बाजूने होता. देशफुल येथे ब्रिटिश हल्ल्यामुळे रातोरात पळावे लागले. बुशायर येथे जनानखान्यात लपावे लागले. नंतर जनान्याबरोबरच ते शहराच्या बाहेर पडले. शिराजला एप्रिल १९१५, निरीज ऑगस्ट १९१५, केरमान नोव्हेंबर १९१५, ३५० मैल वाळवंटी प्रवास करून बलुचिस्तान सीमेपर्यंत आले. गदरचे हंगामी सरकार १ डिसेंबर १९१५ ला स्थापन केले. जर्मनी, तुर्की, हंगेरी या सरकारांनी मान्यता दिली, पण फासे उलटे पडू लागले होते. स्थानिक सुलतान दगाबाज निघाला. खानखोजे यांना उंटावरून पळ काढावा लागला. काही गदर सैनिक मेले. बाफ्त येथे बर्फाच्छादित पर्वतराजींतून प्रवास  झाला. इथे ते इंग्रजांचे कैदी झाले. पण ते बहाई सुन्नी शिपायांत स्वातंत्र्याचा प्रचार करीत राहिले. त्यांनी खानखोजेंची साखळदंडांतून मुक्तता केली. रात्री त्यांनी छावणीतून पलायन केले. एका गुहेत राहिले. पोट बिघडले होते. उपाशी, खोकला, ताप होता असताना बर्फाळ उतारावरून स्वत:ला खाली झोकून दिले. दोन टोळीवाल्यांनी त्यांना पकडले. त्यांच्या प्रमुखाने त्यांना आश्रय दिला, पण तो त्यांनी स्वीकारला नाही. त्यांनी दरवेशाचा वेश घातला आणि पळाले. नाही तर युद्धकैदी झाले असते. बलुची टोळीत वर्षभर राहिले. याच काळात त्यांना व्हर्टिगोचा त्रास सुरू झाला. पर्शियन युद्ध थांबले होते. ब्रिटिशांनी पर्शियन सरदाराने खानखोजे यांना स्वाधीन करावे असे सांगितले होते. खानखोजे काशघईच्या वेषांत पळाले म्हणून वाचले. उरुजान येथे प्रयाण केले. काशगई प्रमुख सहामे याचे ते स्वीय सहायक बनले. १ डिसेंबर १९१५ ते ११ नोव्हेंबर १९१८ या काळात स्वतंत्र हिंदुस्थानाचे सरकार अस्तित्वात होते. इराणी बलुचिस्तानच्या भागात ते होते. उरुजान येथे ते इंग्लिश आणि शेतीशास्त्र शिकवू लागले. याच सुमारास सुलतान आजारी झाला आणि उपचारासाठी त्याला मुंबईमार्गे युरोपला जायचे होते. खानखोजे त्याच्याबरोबरच मुंबईत आले. गिरगावात पोतदार यांच्यामार्फत टिळकांना भेटले.


टिळकांनी खानखोजे यांना पर्शियात परत जायला सांगितले. गदर चळवळ संपली होती. त्याची अनेक कारणे होती. १) भारतीय जनतेचा अनुत्साह. २) एम्डेन प्रकरणांनंतर जर्मनीचा भारतीय स्वातंत्र्य लढय़ांतील उत्साह कमी झाला होता. ब्रिटिश सरकारने ४३ फरारी क्रांतिकारकांची नावे घोषित केली. त्यांच्यावर मृत्यूचा हुकूमनामा होता. खानखोजे यांचे नाव त्यात होते. काळ्या यादीतले नाव स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काढले गेले नव्हते. ३) महायुद्धात हरल्याने जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी याचा पाठिंबा गेला. ४) खुद्द पंजाबमध्ये या चळवळीला फारसा पाठिंबा मिळाला नाही. ५) कोमागाटा मारूच्या प्रकरणातील एकही जण पंजाबपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे जनजागृती झाली नाही. ६) गदर चळवळीला खालसा दिवाणचा पाठिंबा नव्हता. ७) किरपालसिंग फितूर झाला. ४२ जण फांशी गेले, ११४ ना काळेपाणी, ९३ सश्रम कारावास, कर्तारसिंग, पिंगळे हे फाशी गेले.


नोव्हेंबर १९२१ मध्ये सुलतानचे प्रमाणपत्र घेऊन खानखोजे जर्मनीत गेले. रशियास भेट दिली. गदर चळवळीत तीन गट झाले होते. एम्. एन्. रॉय उघडपणे लेनिनवादी होते. कम्युनिझम प्रथम, स्वातंत्र्य नंतर, अशी त्यांची भूमिका होती. खानखोजे आधी स्वातंत्र्य, मग साम्यवाद अशी भूमिका मांडत होते. लेनिनशी त्यांची दोनदा भेट झाली होती. रॉय गट गदर क्रांतिकारकांविरुद्ध जात होता, अशी शंका होती. त्यामुळे रशिया वा जर्मनीत वावरणे धोक्याचे झाले होते. काही गदर कार्यकर्त्यांचा रहस्यमय शेवट झाला होता. बर्लिनमध्येही राहणे धोक्याचे होते. अमेरिका ब्रिटनच्या बाजूने उतरली होती. अमेरिकेतील सर्व गदर मालमत्ता जप्त करण्यात आली होती.


खानखोजे यांनी सर्व विचारांती मेक्सिकोत जाण्याचा निर्णय घेतला. ज्या मेक्सिकन क्रांतिकारकांबरोबर मोलमजुरी केली होती, त्यापैकी काही आता स्वतंत्र मेक्सिकोत मोठय़ा पदावर होते. रोमन नेग्री हे शेतीमंत्री झाले होते. जानेवारी १९२४ मध्ये खानखोजा मेक्सिकोत दाखल झाले. स्कूल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरमध्ये प्रोफेसर म्हणून शिकवू लागले. त्यांना आठ भाषा येत होत्या. पण स्पॅनिश येत नव्हती. प्रस्तुत लेखकाला १९५६-५७ मध्ये नागपूरला नोकरीनिमित्ताने मादाम जान खानखोजेंकडून फ्रेंच शिकण्याची संधी मिळाली.


खानखोजे यांनी जेनेटिक्समध्ये संशोधन केले. गव्हाची अनेक नवीन वाणे तयार केली. मक्याच्या जनुकांत मूलभूत फेरफार करून मक्याच्या एका कणसाचे उत्पन्न पाचपट केले. खानखोजे शेतकऱ्यांचे देव बनले. ख्रिस्ताच्या बरोबरीने त्यांची छायाचित्रे घराघरांतून लागली. मक्याच्या एकेका ताटावर तीस-तीस कणसे. मक्याची निर्यात वाढली. शेतकऱ्याकडे पैसा आला. खानखोजे यांना चापिंगोचा जादूगार असे नांव मिळाले. चापिंगो त्यांचे राहण्याचे गाव. तूर, चवळी, जंगली वाल, सोया डाळ, शेवगा यावर त्यांनी संशोधन केले. अगदी निवडुंगावरसुद्धा. मेक्सिकन रेल्वेने त्यांना दहा हजार एकर पडीक जमीन लागवडीसाठी दिली. त्यांनी ‘जेनेटिक्स’ हा विषय शिकवला. १९३१-३२ मध्ये मेक्सिकन सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते पॅरिस, बेल्जियम, जर्मनी येथे गेले. परत आल्यावर त्यांनी व्हेराक्रूझ येथे डाळिंबाची नवी जात विकसित केली. १९३६ मध्ये वयाच्या ५२ व्या वर्षी २७ वर्षांनी तरुण असलेल्या जान सिंड्रिक तरुणीशी विवाहबद्ध झाले. जानची जानकी झाली. मेक्सिकोतील बेल्जियम कॉन्सलरची ती मेव्हणी होती. तिने त्यांना मागणी घातली. खानखोजे रेल्वेचे शेतीखातेप्रमुख झाले. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी रबरावर संशोधन करून त्याचे उत्पन्न वाढवले.  १९२७ मध्ये खानखोजे यांच्यावरील बंदी उठवावी, असा प्रयत्न माधव अणे यांनी केला, पण त्यांना यश आले नाही. दरम्यान, मेक्सिकोतील खाणधंद्यात गुंतलेली त्यांची सगळी रक्कम बुडाली. १९१९ च्या गुप्त भेटीनंतर एप्रिल १९४९ मध्ये मध्य प्रदेश सरकारचे पाहुणे म्हणून आले. पण विमानतळावर त्यांना १२ तास थांबावे लागले. कारण त्यांचे नाव काळ्या यादीत होते. सप्टेंबर १९४९ मध्ये ते परत गेले. मार्च १९५० ला परत आले. जून १९५१ ला परत गेले. ३० नोव्हेंबर १९५५ ला वयाच्या ७० व्या वर्षी ते भारतात कायमसाठी आले.


ते नागपूर वसतिगृहात सुपिरटेंडेंट होते. लक्ष्मी नारायण इन्टिटय़ूटमध्ये ते जर्मन शिकवीत, नागपूर रेडिओवर व्याख्याने देत. भारत सरकारने १९६३ पासून त्यांना २५० रुपये पेन्शन म्हणून चालू केले. त्यांचा मृत्यू २२ जानेवारी १९६७ ला झाला. १९६१ मध्ये त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले. त्यांच्या पत्नीने फ्रेंच ट्रान्सलेटर म्हणून काम केले. फ्रेंच भाषेचे वर्ग चालवले. त्यांना १९८१ मध्ये नागरिकत्व मिळाले. त्यांचा मृत्यू जुलै १९९१ ला दिल्ली येथे झाला. त्यांची मोठी मुलगी सावित्री भारतात स्थायिक झाली. धाकटी कॅनडात स्थायिक झाली.


(संदर्भ -खानखोजे यांच्या कार्याचा उल्लेख अनेक पुस्तकांतून आलेला आहे. ‘रणझुंजार डॉ. पां. स. खानखोजे यांचे चरित्र’ (ग. वि. केतकर), ‘कथा एका क्रांतिकारकाची’ (म. ना. काळे) ही पुस्तके अनेक वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली. क्रांतिकार्यविषयक अनेक पुस्तकांतून त्यांच्या कार्याचा उल्लेख झाला आहे. 


📚 *अलीकडील तीन पुस्तके आहेत.*


१. नाही चिरा- वीणा गवाणकर १९९७ राजहंस


२. आय शाॕल नॉट आस्क फॉर पार्डन – सावित्री साहनी २०११ (पेंग्विन)


३. क्रांती आणि हरित क्रांती- उपरोक्तचा मराठी अनुवाद.

    

          🇮🇳 *जयहिंद*🇮🇳



बिपिनचन्द्र पाल..

 

         *बिपिनचन्द्र पाल*                                                                                                                            (भारतीय क्रांतिकारी) 

      *जन्म : 7 नवंबर, 1858*

(हबीबगंज ज़िला, (वर्तमान बांग्लादेश)

      *मृत्यु : 20 मई, 1932*

नागरिकता : भारतीय

प्रसिद्धि : स्वतन्त्रता सेनानी, शिक्षक, पत्रकार, लेखक

पार्टी : भारतीय राष्ट्रीय कांग्रेस, ब्रह्म समाज

विशेष योगदान : विपिन चन्द्र कांग्रेस के क्रान्तिकारी देशभक्तों लाला लाजपत राय, बाल गंगाधर तिलक और विपिन चन्द्र पाल (लाल बाल पाल) की तिकड़ी का हिस्सा थे।

आंदोलन : भारतीय स्वतंत्रता संग्राम

अन्य जानकारी : 'वंदे मातरम्' पत्रिका के संस्थापक रहे बिपिन चंद्र पाल एक समाज सुधारक भी थे, जिन्होंने परिवार के विरोध के बावज़ूद एक विधवा से विवाह किया था।

             बिपिन चंद्र पाल  का नाम भारत के स्वाधीनता संग्राम के इतिहास में 'क्रान्तिकारी विचारों के जनक' के रूप में आता है, जो अंग्रेज़ों की चूलें हिला देने वाली 'लाल' 'बाल' 'पाल' तिकड़ी का एक हिस्सा थे।


👱‍♂️ *जन्म*

         बंगाल में हबीबगंज ज़िले के पोइल गाँव (वर्तमान में बांग्लादेश) में 7 नवम्बर 1858 को जन्मे विपिन चन्द्र पाल बहुमुखी प्रतिभा के धनी थे। वह शिक्षक और पत्रकार होने के साथ-साथ एक कुशल वक्ता और लेखक भी थे। इतिहासकार वी. सी. साहू के अनुसार विपिन चन्द्र कांग्रेस के क्रान्तिकारी देशभक्तों लाला लाजपत राय, बाल गंगाधर तिलक और विपिन चन्द्र पाल (लाल बाल पाल) की तिकड़ी का हिस्सा थे, जिन्होंने 1905 में बंगाल विभाजन के विरोध में ज़बर्दस्त आंदोलन चलाया था।      💁‍♂️ *जीवन परिचय*

                'वंदे मातरम्' पत्रिका के संस्थापक रहे पाल एक बड़े समाज सुधारक भी थे, जिन्होंने परिवार के विरोध के बावज़ूद एक विधवा से शादी की। बाल गंगाधर तिलक की गिरफ़्तारी और 1907 में ब्रितानिया हुकूमत द्वारा चलाए गए दमन के समय पाल इंग्लैंण्ड गए। वह वहाँ क्रान्तिकारी विधार धारा वाले 'इंडिया हाउस' से जुड़ गए और 'स्वराज पत्रिका' की शुरुआत की। मदन लाल ढींगरा के द्वारा 1909 में कर्ज़न वाइली की हत्या कर दिये जाने के कारण उनकी इस पत्रिका का प्रकाशन बंद हो गया और लंदन में उन्हें काफ़ी मानसिक तनाव से गुज़रना पड़ा। इस घटना के बाद वह उग्र विचारधारा से अलग हो गए और स्वतंत्र देशों के संघ की परिकल्पना पेश की। पाल ने कई मौक़ों पर महात्मा गांधी की आलोचना भी की। 1921 में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अधिवेशन में पाल ने अध्यक्षीय भाषण में गांधीजी की आलोचना करते हुए कहा था-

आप जादू चाहते हैं, लेकिन मैं तर्क में विश्वास करता हूँ। आप मंत्रम चाहते हैं, लेकिन मैं कोई ऋषि नहीं हूँ और मंत्रम नहीं दे सकता।

🇮🇳 *आजादी में योगदान*

                    वंदे मातरम् राजद्रोह मामले में भी अरबिंदो घोष के ख़िलाफ़ गवाही देने से इंकार करने के कारण वह छह महीने जेल में रहे। देश के प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहर लाल नेहरू ने 1958 में पाल की जन्मशती के मौक़े पर अपने सम्बोधन में उन्हें एक ऐसा महान् व्यक्तित्व क़रार दिया, जिसने धार्मिक और राजनीतिक मोर्चों पर उच्चस्तरीय भूमिका निभाई। पाल ने आज़ादी की लड़ाई के दौरान विदेशी कपड़ों की होली जलाने और हड़ताल जैसे आंदोलनों में बढ़-चढ़कर भूमिका निभाई।


🪔  *निधन*

               विपिनचन्द्र पाल 1922 में राजनीतिक जीवन से अलग हो गए और 20 मई, 1932 में अपने निधन तक राजनीति से अलग ही रहे।

                                                                                               

         

हवाई दल कॉमन अॅडमिशन टेस्ट (AFCAT)

 AFCAT २०२६-१ साठी अर्ज प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ डिसेंबर आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ९ डिसेंबरपर्यंत AFCAT च्या अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.


AFCAT म्हणजे काय याबद्दल अधिक जाणून घेऊया. AFCAT द्वारे कोणती पदे उपलब्ध आहेत? AFCAT साठी कोण अर्ज करू शकते? उदाहरणार्थ, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय आहेत? चला याबद्दल जाणून घेऊया.

AFCAT म्हणजे काय?

हवाई दल कॉमन अॅडमिशन टेस्ट (AFCAT) दरवर्षी दोनदा घेतली जाते. ही एक राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे जी यशस्वी उमेदवारांना हवाई दलाच्या विविध शाखांमध्ये रोजगाराच्या संधी प्रदान करते. भारतीय हवाई दलात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी AFCAT ही अनिवार्य प्रवेश परीक्षा आहे. जानेवारी २०२७ मध्ये AFCAT भरतीसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

AFCAT साठी पात्र उमेदवारांना भारतीय हवाई दलात फ्लाइंग ब्रांच, ग्राउंड ड्यूटी (टेक्निकल ब्रांच) आणि ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल ब्रांच) सारख्या पदांवर नियुक्त केले जाते.

कसा करावा अर्ज
AFCAT २०२६-१ साठी अर्ज करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in ला भेट द्या.

वेबसाइटच्या होमपेजवरील AFCAT १ २०२६ ऑनलाइन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

एक वेबपेज उघडेल. तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करा.

पुढील नोंदणी प्रक्रियेत तुमची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती प्रविष्ट करा.

शुल्क भरून फॉर्म सबमिट करा आणि तो प्रिंट करा.

काय आहे पात्रता
AFCAT साठी वयोमर्यादेबाबत, १८ ते २४ वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रतेबाबत, ६०% गुणांसह पदवीधर फ्लाइंग ब्रांचसाठी अर्ज करू शकतात, परंतु त्यांच्याकडे १२ व्या वर्गात भौतिकशास्त्र आणि गणित असणे आवश्यक आहे.

अभियांत्रिकी पदवीधर ग्राउंड ड्यूटी (टेक्निकल) साठी अर्ज करू शकतात आणि ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल) साठी कोणत्याही प्रवाहात ६०% गुणांसह पदवीधर झालेले उमेदवार अर्ज करू शकतात.

भारतरत्न इंदिरा गांधी

          *भारतरत्न इंदिरा गांधी*   (५ वी व ८ वी भारतीय पंतप्रधान)      *जन्म : १९ नोव्हेंबर १९१७*             (मुघलसराई)    *मृत्यू : ३१ ऑक...