एकूण २२ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. तुम्ही या पदांसाठी पात्र आणि इच्छुक असाल तर आपला अर्ज दाखल करु शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे तात्काळ अर्ज दाखल करा. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या bankofmaharashtra.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. उमेदवारांना अर्ज १५ मार्च २०२५ पर्यंत करता येणार आहे. अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अधिसूचनेमध्ये काही पात्रता निकष नमूद करण्यात आले आहे. अर्ज करण्यास इच्छुक असणारा उमेदवार या निकषांना पात्र असणे आवश्यक आहे. अन्यथा, उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
Bank of Maharashtra Recruitment 2025: पात्रता निकष
बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२५ साठी उमेदवारांनी खालील पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत:
शैक्षणिक पात्रता
स्केल VII & VI: वित्त/बँकिंग/आंतरराष्ट्रीय व्यवसाय किंवा सीए मध्ये २ वर्षे पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी (एमबीए/पीजीडीएम/पीजीडीबीएफ). प्राधान्य: सीएफए/एफआरएम/पीआरएम.
स्केल V: वित्त/बँकिंग/आंतरराष्ट्रीय व्यवसाय मध्ये एमबीए/पीजीडीएम/पीजीडीबीएफ किंवा सीए/सीएफए. सीटीपी/सीएफएम/सीटीएफ/सीडीसीएस सारखी व्यावसायिक प्रमाणपत्रे.
स्केल IV: वित्त/बँकिंग/आंतरराष्ट्रीय व्यवसाय मध्ये एमबीए/पीजीडीएम/पीजीडीबीएफ किंवा सीए/सीएफए. फॉरेक्स/ट्रेड फायनान्समध्ये व्यावसायिक प्रमाणपत्रे.
स्केल III: विक्री/मार्केटिंग/बँकिंग/वित्त/आंतरराष्ट्रीय व्यवसाय मध्ये एमबीए/पीजीडीएम.
Bank of Maharashtra Recruitment 2025: वयोमर्यादा
स्केल VII: कमाल ५५ वर्षे
स्केल VI: कमाल ५० वर्षे
स्केल V: कमाल ४५ वर्षे
स्केल IV: कमाल ४० वर्षे
स्केल III: २५ ते ३८ वर्षे
Bank of Maharashtra Recruitment 2025: अर्ज शुल्क
उमेदवारांना अर्ज करताना काही रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरायची आहे. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ₹११८० रुपये भरायचे आहे. EWS आणि OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ₹११८० अशी सारखीच रक्कम भरायची आहे. SC / ST / PWD या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना एकूण ११८ रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे.
Post a Comment