सामान्य ज्ञान

नोकरीसाठी उपयुक्त जनरल नॉलेज

खेळांची माहिती..

गणित महत्त्वाचे

संताची माहिती

blog ...

स्पर्धा परीक्षा टेस्ट

सणांची माहिती..

महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

 महाराष्ट्र रत्नागिरी

आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.

१२ वी पास आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही भरती सुरु आहे. याबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. 

आरोग्य विभागात डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक आणि इतर पदांची भरती सुरु आहे. यासाठी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. नोकरीसाठी १२ वी पास आणि पदवीधर उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन १८००० ते २८००० रुपये मिळणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. २१ ते ३८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. कंत्राटी पद्धतीने ही पदे भरण्यात येणार आहे. मेडिकल कोऑर्डिनेटर या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS/BAMS/BHMS/Dentist पदवी प्राप्त असावी. 


अकाउंटंट/ बिलिंग क्लर्क या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. त्यांना अकाउंटिगचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. डेटा एन्ट्री या पदासाठी १२ वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात.रत्नागिरी जिल्ह्यात यासाठी नोकरीचे ठिकाण असेल.


१ ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज अधिक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी येथे पाठवायचा आहे

.

No comments:

Post a Comment