मराठी व्याकरण आधारित टेस्ट

महाराष्ट्र राज्यावर आधारित टेस्ट..

खंडांची माहिती..

ग्रहांची माहिती..

सामान्य ज्ञान

नोकरीसाठी उपयुक्त जनरल नॉलेज

स्पर्धा परीक्षा टेस्ट

blog ...

भारत देशावर आधारित टेस्ट

खेळांची माहिती..

गणित महत्त्वाचे

संताची माहिती

सणांची माहिती..

जगातील खंडे

जगातील ग्रह

रेल्वे नोकरी 2026

 रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाकडून (RRB) टेक्निकल भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यासाठी 6 हजारांपेक्षा अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे


मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये ग्रेड-1 साठी 352 तर ग्रेड-2 साठी 6242 पदांची भरती होणार आहे. पुढील महिन्यात म्हणजेच 30 जून 2026 पासून या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून 29 जुलै 2026 ही अंतिम मुदत असेल. म्हणजेच इच्छकांना अर्जासाठी तब्बल 1 महीना मुदत मिळमार आहे.


या भरतीमध्ये ग्रेड-1 आणि ग्रेड-2 या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ग्रेड 1 पदांसाठी 18 ते 33 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. त्यांच्याकडे फिजिक्स , कॉम्प्युटर किंवा आयटीमध्ये पदव्युत्तर (ग्रॅज्युएशन) पदवी असणे आवश्यक आहे. तर ग्रेड 2 पदांसाठी 18 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.


झोनवाईज रिक्त पदांची संख्या


सेंट्रल रेल्वे, मुंबई - 870


साउदर्न रेल्वे, चेन्नई - 785


नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे, गुवाहाटी - 701


साउथ ईस्टर्न रेल्वे, कोलकाता - 576


नॉर्दर्न रेल्वे, नवी दिल्ली - 548


वेस्टर्न रेल्वे, मुंबई - 544


साउथ सेंट्रल रेल्वे, सिकंदराबाद - 368


ईस्टर्न रेल्वे, कोलकाता - 291


नॉर्थ सेंट्रल रेल्वे - 268


साउथ वेस्टर्न रेल्वे, हुबळी - 240


वेस्ट सेंट्रल रेल्वे, जबलपूर - 231


नॉर्थ वेस्टर्न रेल्वे, जयपूर - 199


ईस्ट सेंट्रल रेल्वे, हाजीपूर - 186


नॉर्थ ईस्टर्न रेल्वे, गोरखपूर - 169


साउथ ईस्ट रेल्वे, बिलासपूर - 90


प्रोडक्शन युनिट (BLW/CLW/ICF) - 499


अर्ज शुल्क किती ?


रेल्वे टेक्निशियन पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य प्रवर्ग, EWS आणि OBC उमेदवारांसाठी शुल्क 500 रुपये असेल. तर SC/ST उमेदवारांसाठी शुल्क - 250 रुपये आणि सर्व महिला उमेदवारांसाठी शुल्क - 250 रुपये इतकी फी असेल.


अर्जामध्ये काही चूक झाल्यास दुरुस्तीसाठी 250 रुपयांचे अतिरिक्तशुल्क आकारले जाईल. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.


या रेल्वे पदाच्या भरतीसंदर्भात, अर्ज केल्यानंतर यशस्वी उमेदवारांची सीबीटी (CBT) चाचणी घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी घेऊन प्रक्रिया पूर्ण केली जाईल. शेवटी, अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.


कशी असेल सिलेक्शन प्रोसेस ?


रेल्वे पदाच्या भरतीसंदर्भात सांगायचं झालं तर अर्ज केल्यानंतर यशस्वी उमेदवारांची सीबीटी (CBT) चाचणी घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी घेऊन प्रक्रिया पूर्ण केली जाईल. शेवटी, अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) तयार केली जाईल.

No comments:

Post a Comment