मराठी व्याकरण आधारित टेस्ट

▼

महाराष्ट्र राज्यावर आधारित टेस्ट..

▼

खंडांची माहिती..

▼

ग्रहांची माहिती..

▼

सामान्य ज्ञान

▼

नोकरीसाठी उपयुक्त जनरल नॉलेज

▼

स्पर्धा परीक्षा टेस्ट

▼

blog ...

▼

भारत देशावर आधारित टेस्ट

▼

खेळांची माहिती..

▼

गणित महत्त्वाचे

▼

संताची माहिती

▼

सणांची माहिती..

▼

जगातील खंडे

▼

जगातील ग्रह

▼

सहकार महर्षि स्व. तात्यासाहेब कोरे

                                     


  *सहकार महर्षि स्व. तात्यासाहेब कोरे*

   (सहकार महर्षितथा स्वातंत्र्य सैनिक)

             *जन्म : १७ आॕक्टोबर १९१४*

                

             *मृत्यू : १३ डिसेंबर १९९४*                                      

वारणा नगरी म्हणजे एका सामान्य माणसाचं पाहिलेलं स्वप्न लोक म्हणतात शून्यातून विश्व निर्माण करणं सोपं नाही, परंतु याच उत्तम उदाहरण म्हणजे वारणा नगरी एवढी मोठी वारणानगरी वसवणे म्हणजे चेष्टा नव्हे आज वारणा नगरीचे नाव पंचक्रोशीत गाजत आहे. त्याचे विधाते म्हणजे स्वर्गीय तात्यासाहेब कोरे. तात्यासाहेब कोरे यांचा जन्म १७ ऑक्टोंबर १९१४ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव आण्णासाहेब व आईचे नाव भागीरथी असे होते, प्लेगच्या साथीमुळे तात्यासाहेबांच्या आई त्यांच्या लहानपणीच वारल्या कृष्णा काकूनी त्यांचा सांभाळ केला. १९२१ साली त्यांना कोडोली प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला. संख्या, लेखन, आणि अंकगणित हे तात्यासाहेबांच्या आवडीचे विषय तात्यासाहेब लहानपणापासूनच मेहनत व अथक परिश्रम करत होते. जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी विद्यानगरी उभारली त्यांचे गुरुवर्य रामचंद्र राजमाने यांनी त्यांना अनुशासन आणि आदर्श वर्तन याच्या सोबत खेळ आणि शिक्षेची जीवन मूल्य शिकवली गुरुजी श्रीधरपंत कुलकर्णी यांनी त्यांना संस्कृत इंग्रजी मराठीचे ज्ञान दिलं गुरु जणांकडून राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती, सुख, त्याग याची समर्पकता तात्यासाहेबांना समजली. १९२९ पासून तात्यासाहेबांचे शिक्षण सांगलीत झाले. तिथे त्यांची मैत्री केशवराव पाटील कामेरी, डॉक्टर मगदूम आणि बी. ए. चौगुले यांच्याशी झाली परंतु म्हणतात ना कधीकधी जबाबदारी आपली परीक्षा घेते तसं काहीच तात्यासाहेबांच झालं, जबाबदारीमुळे त्यांना शिक्षण सोडून परंपरागत तराजू घेऊन घरचा व्यवसाय सांभाळायला लागला.

                घरची जबाबदारी खांद्यावर असतानाच विसाव्या वर्षी म्हणजेच २२ डिसेंबर १९३४  मध्ये बेडग गावच्या वीर संगाप्पा आवटी यांची मुलगी सावित्रीबाई यांच्याशी तात्यासाहेब यांचा विवाह झाला. तात्यासाहेबांच्या म्हणण्यानुसार सावित्रीबाई अत्यंत समजूतदार सुसंस्कृत मनमिळावू होत्या, ते सावित्रीबाईंना प्रोफेसर असेही म्हणत. सावित्रीबाई वर्षातून दोन ते तीन मुलं आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळत या कारणामुळे त्यांना सगळे आक्का म्हणत असत. तात्यासाहेबांनी सन १९४२ साली  भारत छोडो आणि चले जाओ आंदोलनामध्ये सक्रीय सहभाग घेतला. इन्कलाब जिंदाबाद करेंगे या मरेंगे परंतु चाळीस करोड लोक नाही दबणार अशा घोषणा सुद्धा दिल्या. वारणा नदीकाठचा डाग मळा तात्यासाहेबांनी भूमिगत कार्यकर्ते व प्रतिसरकार चालवण्यासाठी दिला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत पुढे तात्यासाहेबांनी गांधीजी व साने गुरुजी यांच्या तत्वावर चालण्याचा निर्णय घेतला.

                सन १९५१ मध्ये गुळाच्या व्यवसायात होणारा तोटा चिंताजनक होता यादरम्यान शेतकरी सहकारी संघ यांचे तात्यासाहेब मोहिते यांचा सहकारी साखर कारखाना तात्यासाहेबांनी पाहिला त्याची माहिती घेतली. त्यांना समजलं परंपरागत शेतीपेक्षा शास्त्रीय व आधुनिक यांत्रिक शेती करणे गरजेचे आहे. बाजारात गुळा पेक्षा  साखरेला जास्त किंमत आहे. सन १९५२ मध्ये तात्यासाहेबांनी गावागावात घराघरात जाऊन कारखान्यासाठी सभासद तयार केले. या कार्यात लोकांचा चांगला सहभाग त्यांना मिळाला, आणि सहकारी तत्त्वावर तात्यासाहेबांनी कारखाना सुरू केला. दिनांक २६ ऑगस्ट १९५४ साली वारणानगर ची निर्मिती झाली. अनेक संकटांना सामोरे जात परदेशातून तात्यासाहेबांनी यंत्रसामग्री मिळवली. कारखान्याचा पहिला बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ १६ फेब्रुवारी १९५९ ला सावित्री अक्कांच्या शुभहस्ते हा समारंभ झाला. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिवाळीचा पाडवा होता. हा तात्यासाहेबांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस होता. या दरम्यान मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई चव्हाण यांच्या हस्ते यंत्रसामग्रीची पूजा केली. आणि वारणा सहकारी साखर कारखान्याचा शुभारंभ झाला.

               तात्यासाहेबांनी १९६४ मध्ये वारणा विभाग शिक्षण मंडळाची स्थापना केली. आणि २० जून १९६४  च्या दिवशी प्राचार्य भा.शं. भणगे यांच्या हस्ते शारदा पूजन करून वारणा महाविद्यालयाचा शुभारंभ केला. १२८  विद्यार्थी आणि १२ शिक्षक यांच्यासमवेत या महाविद्यालयालाचा शुभारंभ झाला. यावरून तात्यासाहेबांची दूरदृष्टी दिसून येते. आज वारणेच्या मुलांना जवळ शिक्षण सुविधा उपलब्ध झाल्यामुळे क्लर्क पासून कलेक्टर पर्यंत मुलांनी झेप घेतली, तात्यासाहेबांनी सर्वप्रथम उच्च शिक्षणाची सोय केली. आज सुद्धा वारणामहाविद्यालय तात्यासाहेबांच्या तत्त्वावर कार्य करत आहे. वारणा साखर कारखाना व महाविद्यालयाच्या स्थापने नंतर रोजगार करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, म्हणून १९६९ मध्ये तात्यासाहेबांनी वारणा विद्यामंदिर ची स्थापना केली. कर्मचाऱ्यांच्या पैशाची बचत व्हावी व गरजेच्या वेळी पैसे उपलब्ध व्हावेत, म्हणून तात्यांनी वारणा सहकारी बँकेची स्थापना केली. घरातल्या महिलांना सुद्धा काम मिळावं म्हणून जनावरांपासून मिळणारे दूध विकून त्यांना चार पैसे मिळावे. या हेतूने तात्यासाहेबांनी २० जुलै १९६८ रोजी श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लि., ची स्थापना केली.


         सावित्री आक्कांच्या म्हणण्यानुसार येथील महिलांना सुद्धा घरबसल्या काम मिळावे, म्हणून वारणा भगिनी मंडळ व महिला गृह उद्योग लिज्जत पापड केंद्र १९७४ ला सुरू केले. याच हेतूने लोकांना दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर जावं लागू नये म्हणून १९७६ मध्ये वारणा ग्राहक मंडळ म्हणजेच वारणा बजार ची स्थापना केली. १९८३ मध्ये आय.टी.आय कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज तर १९८४ मध्ये ट्रेनिंग आणि प्रोडक्शन सेंटर सोबतच कुकुट पालन केंद्र व महात्मा गांधी हॉस्पिटल सुरू केले. त्यांनी साखर कारखान्या सोबतच अन्य मुख्य लघु तथा सहायक उद्योग सुरू केले, तात्यासाहेबांचे स्वप्न होतं की आपल्या माणसांनी इथेच मेहनत करावी, इथेच कमवा व इथेच खर्चावा अर्थात इथे जो पैसा येईल तो इथेच राहावा लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दुसरीकडे जावे लागू नये. रोजगारासाठी भटकंती होऊ नये, व सर्वांचे जीवन सुखकर व सोयीस्कर व्हावे या विचाराने तात्यासाहेबांनी या संस्थांची स्थापना केली.

                आणि अखेर १३ डिसेंबर १९९४ रोजी या महामानवाची प्राणज्योत मावळली. आजही १३ डिसेंबर हा त्यांचा स्मृतीदिन मोठ्या समारंभाने साजरा केला जातो. विद्यमान आमदार आणि तात्यांसाहेबांचे नातू डॉ. विनयरावजी कोरे सावकर या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, कृषिप्रदर्शन या आणि अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात आजही वारणा समूहाशी संबंधित शंभर हून अधिक गावातून लोक पहाटेचा अंधार चिरत हातात मशाली घेऊन तात्यांच्या स्मृतींचा जागर करत येतात, म्हणतात तात्यासाहेब कोरे अमर रहे! अमर रहे! अमर रहे! तात्यासाहेब कोरे अमर रहे!        

         

No comments:

Post a Comment