मराठी व्याकरण आधारित टेस्ट

महाराष्ट्र राज्यावर आधारित टेस्ट..

खंडांची माहिती..

ग्रहांची माहिती..

सामान्य ज्ञान

नोकरीसाठी उपयुक्त जनरल नॉलेज

भारत देशावर आधारित टेस्ट

खेळांची माहिती..

गणित महत्त्वाचे

संताची माहिती

blog ...

स्पर्धा परीक्षा टेस्ट

सणांची माहिती..

जगातील खंडे

जगातील ग्रह

शरद पवार इन्सपायर फेलोशिप : शिक्षण 2026

 




*शरद पवार इन्सपायर फेलोशिप : शिक्षण*


   शिक्षण उद्यासाठी असते. उद्याचे सुजाण, सतर्क, सर्जनशील, कर्तबगार व सुसंस्कृत नागरिक घडविणे हे शिक्षणातून अपेक्षित असते. शिकावे कसे, शिकण्याचा आनंद कसा घ्यावा-द्यावा आणि आजन्म शिकत कसे राहावे हे शिकविते ते खरे शिक्षण. शिकता-शिकता जे उद्याची आव्हाने पेलायला सज्ज करते, उद्याच्या संधींचे सोने करायला शिकवते ते खरे शिक्षण.

     शिक्षण क्षेत्रात नवे काही करु पाहणाऱ्या, ध्येयाने झपाटलेल्या व त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या होतकरु गुणवंत शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्याना हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण काम व्हावे तसेच मुलभूत संशोधनास वाव मिळावा हा या फेलोशीपचा हेतू आहे.यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने २० प्राथमिक शिक्षक आणि १० माध्यमिक शिक्षकांना ही फेलोशिप दिली जाणार आहे. 

       सध्या देशभर आणि राज्यभर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०च्या अंमलबजावणीचे काम सुरू आहे.त्या संदर्भाने या धोरणात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची प्रभावी अंमलबजावणी, त्यामधील साधने व तंत्राचा परिणामकारक रीतीने उपयोग ह्या बाबी अंतर्भूत आहेत. ही मूल्यांकन प्रक्रिया सातत्यपूर्ण आणि आकारिक क्षमता आधारित आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर, शिक्षण विकास मंच यांच्यावतीने यावर्षी शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी शिक्षकांकडून *राष्ट्रीय शिक्षण धोरण -२०२० शालेय शिक्षणातील मूल्यांकन* प्रक्रियेला केंद्रस्थानी मानून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यासाठी- https://www.sharadpawarfellowship.com/fellowships/education-fellowship/education-fellowship-primary-secondary-education या वेबसाईटवर *भूमिका, फेलोशिपचे तपशील, फेलोशिपची नियमावली* यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. 

       २०२६- २७च्या फेलोशिपसाठीची अर्ज प्रक्रिया १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरु झाली आहे. तरी इच्छुक शिक्षकांनी दिनांक १२ऑक्टोबर २०२५ अखेर *https://www.sharadpawarfellowship.com/ या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करताना वेबसाईटवर फेलोशिपबाबत सविस्तर माहितीचे टीपण* दिले आहे.ते टीपण काळजीपूर्वक वाचावे, फार्म भरण्यासाठी,विषय निवडीसाठी त्याचा उपयोग होईल. 


टीप : प्रस्ताव लेखन कसे करावे? याकरिता हा खालील व्हिडिओ पहा- 


*https://youtu.be/agPkuW4MnVI?si=RWZFv8OU3_FRbDKl*

No comments:

Post a Comment