जाहिरात क्रमांक-01/2025
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचे कडील शासन निर्णय क्रमांक प्रनिमं 1222/प्र.क्र.54/का. 13 अ दिनांक 4 में 2022, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्रानिमं 1222/प्र.क्र. 136/का-13 दिनांक 21 नोव्हेंबर 2022, महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग यांचेकडील पत्र क्रमांक आस्थाप-2021/448/प्र.क्र.92/म-1 दिनांक 19.05.2022, दिनांक 22.11.2022 आणि दिनांक 07.12.2022, महसूल व वनविभाग यांचेकडील पत्र क्रमूकि आस्थाप-2023/1030/प्र.क्र.211/म-1 दिनांक 24.06.2024 आणि दिनांक 22.11.2022 अन्वये विहित तरतुदी आणि निर्देशानुसार नोंदणी व मुद्रांक विभागात गट ङ (शिपाई) संवर्गाची नोंदणी व मुद्रांक विभागाकडील सरळसेवेने भरावयाची रिक्त पदांची भरती करीता प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सरळसेवेने भरावयाच्या पदाकरीता https://ibpsonline.ibps.in/igrosfeb25 या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी www.igrmaharashtra.gov.in या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विहित मुदतीत अर्ज सादर करावेत. ऑनलाईन भरलेल्या अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे भरलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
सरळसेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात www.igrmaharashtra.gov.in या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असुन उमेदवारांनी जाहिरातीत नमूद संपुर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन (Online) पद्धतीनेच https://ibpsonline.ibps.in/igrosfeb25 या संकेतस्थळावर आपले अर्ज सादर करावेत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रिये संबंधित आवश्यक अद्यावत माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1P4S-FdFD-P42n_AgIqx-pKtGKXgb-BPW/view?usp=drivesdk
No comments:
Post a Comment