मराठी व्याकरण आधारित टेस्ट

महाराष्ट्र राज्यावर आधारित टेस्ट..

खंडांची माहिती..

ग्रहांची माहिती..

सामान्य ज्ञान

नोकरीसाठी उपयुक्त जनरल नॉलेज

भारत देशावर आधारित टेस्ट

खेळांची माहिती..

गणित महत्त्वाचे

संताची माहिती

blog ...

स्पर्धा परीक्षा टेस्ट

सणांची माहिती..

जगातील खंडे

जगातील ग्रह

ग्रामीण डाक सेवक भरती 2025

 

डाक सेवक भरतीला सुरुवात झाली आहे. GDS ने या भरतीचे आयोजन केले आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती एक सुवर्णसंधी आहे. 


ग्रामीण डाक सेवक पदासाठी आयोजित ही भरती ३ मार्च २०२५ पासून सुरु होणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी

  indiapostgdsonline.gov.in

या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. मुळात, उमेदवारांना एका ठराविक मुदतीपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीतही २८ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात, या भरतीच्या संदर्भात पात्रता निकषांसंदर्भात:

भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र कराव्या लागणार आहेत. या अटी शर्ती शैक्षणिक असावेत, तसेच उमेदवारांना वयोमर्यादेसंदर्भात अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. या अटी शर्ती जाहीर अधिसूचनेमध्ये नमूद आहेत. एकंदरीत, किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त ४० वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांच्या वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अधिक ३ वर्षांची सूट दिली जाईल, तर SC आणि ST प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अधिक ५ वर्षांची सूट देण्यात येईल. तसेच दिव्यांग उमेदवारांना अधिक १० वर्षे सूट देण्यात येईल.

जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू पाहत आहात तर तुम्ही SSC उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. तसेच तुमच्या गुणपत्रिकेत गणित आणि इंग्रजी या दोन्ही विषयांचा समावेश हवा. संगणकाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. तसेच संगणकासंबंधित बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे.


No comments:

Post a Comment