RRB NTPC अंतर्गत १२ हजार जागांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध, १३ सप्टेंबरपासून अर्ज सुरू
रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRB) ने RRB NTPC 2024 भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 13 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. भरतीद्वारे एकूण 11 हजार 558 पदांची नियुक्ती केली जाणार आहे.
रेल्वेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरूणांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRB) ने RRB NTPC 2024 भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना प्रसिद्ध (Notification released) केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 13 सप्टेंबरपासून सुरू (Application process starts from 14th September) होणार आहे. भरतीद्वारे एकूण 11 हजार 558 पदांची नियुक्ती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्रता पूर्ण करणारे सर्व उमेदवार अर्ज सुरू होताच RRB indianrailways.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर 2024 निश्चित करण्यात आली आहे.
भरतीची अधिसूचना संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली असून त्यात परीक्षेशी संबंधित महत्त्वाचे तपशील देण्यात आले आहेत. RRB NTPC पात्रतेनुसार, पदवीपूर्व पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे आहे. तर पदवीधर पदांसाठी ती 18 ते 30 वर्षे आहे. पदवीपूर्व पदांसाठी विहित शैक्षणिक पात्रता पदवी आहे, तर पदवीधर पदांसाठी ती १२वी उत्तीर्ण आहे. RRB NTPC परीक्षेच्या निवड प्रक्रियेमध्ये CBT 1, CBT 2, टायपिंग कौशल्य चाचणी / संगणक आधारित अभियोग्यता चाचणी आणि दस्तऐवज पडताळणी / वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश होतो.
रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRB) ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार या भरतीद्वारे एकूण 11 हजार 558 पदांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये अंडर ग्रॅज्युएट पोस्ट अंतर्गत एकूण 3 हजार 445 पदांची नियुक्ती केली जाईल. तर पदवीधर पोस्ट अंतर्गत 8 हजार 113 पदांवर नियुक्ती केली जाईल. भरतीचा पोस्ट निहाय तपशील प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेत देण्यात आला आहे. त्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ indianrailways.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आलेली अधिसूचना वाचावी लागेल.