ITBP Constable Recruitment 2024: इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्सद्वारे (ITBP) कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार ITBP च्या अधिकृत वेबसाइट recruitment.itbpolice.nic.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील ८१९ पदे भरण्यात येणार आहेत.
ITBP Constable Recruitment 2024: केव्हा सुरू होईल नोंदणी?
नोंदणी प्रक्रिया 2 सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि १ ऑक्टोबर 2024 रोजी समाप्त होईल
ITBP Constable Recruitment 2024 रिक्त जागा तपशील
पुरुष : ६९७ पदे
महिला: १२२ पदे
ITBP Constable Recruitment 2024 पात्रता निकष
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांच्याकडे मान्यता प्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा इयत्ता दहावी पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा १८ ते२५ वर्षांच्या दरम्यान असावी.
ITBP Constable Recruitment 2024 निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेमध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST), लेखी परीक्षा, मूळ कागदपत्रांची पडताळणी आणि तपशीलवार वैद्यकीय परीक्षा (Detailed Medical Examination )/ पुनरावलोकन वैद्यकीय परीक्षा (Review Medical examination ) यांचा समावेश असेल. उमेदवारांच्या तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्यासाठी वैद्यकीय तपासणी CAPF आणि AR मध्ये GO आणि NGO साठी भरतीसाठी एकसमान मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात घेतली जाईल.
अर्जाची फी ₹१००/- आहे. महिला, माजी सैनिक आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये सूट देण्यात आली आहे.