WEL COME MY JOB....... BLOG आपले सर्वांचे सहर्ष स्वागत ... माझ्या WEBSITE ला भेट दिल्या बद्दल मी मनापासून आभारी आहे

नोकरीसाठी उपयुक्त जनरल नॉलेज

Tuesday, August 27, 2024

इंडियन बँकेत विविध पदांसाठी ३०० जागांची भरती

 

इंडियन बँकेत विविध पदांसाठी ३०० जागांची भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात देखील झाली आहे.

१३ तारखेपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही बँकेत नोकरी शोधत असाल, तर तुम्ही इंडियन बँकेत या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकता. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया 

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २ सप्टेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया एकून ३०० पदांसाठी सुरू आहे. हे करण्यासाठी तुम्हाला इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइट, indianbank.in वर जावे लागेल. येथून तुम्ही अर्ज देखील करू शकता, रिक्त पदांबद्दल तपशीलवार माहिती मिळवू शकता


या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. यासोबतच उमेदवाराचे वय २० ते ३० वयोगटातील उमेदवार हे आरामात भरतीसाठी अर्ज करू शकतात.


निवड कशी होईल?


या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा ही द्यावी लागणार आहे. त्यानंतर मुलाखत होईल आणि मगच उमेदवाराची निवड ही केली जाईल.


फी किती असेल?


या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १००० रुपये फीस ही द्यावी लागेल. आरक्षित श्रेणीमध्ये येणाऱ्या उमेदवारांना १७५ रुपये फीस लागेल. पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात

अर्ज करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा, म्हणजेच indianbank.in.



जागतिक ध्यान दिवस

  २१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला जावा हा लिकटेंस्टिन या देशाने मांडलेला व भारतासह अनेक देशांनी अनुमोदन दिलेला प्रस्ताव सं...